Friday 30 September 2011

कठोर वाटणारा बाप इतका हलका असतो का हो?


          ३० तारखेची सकाळ. मला हॉस्पिटल मधून आईचा फोन आला "असशील तसा निघून ये!"
"का काय झाला ?" मी थोडे घाबरत विचारले.
"तू बाप झाला आहेस." आई.
"काय सांगतेस? मी तयार होवून येतो. मी गावाला फोन करून सांगतो." माझ्या मनात हर्ष  मावत नवता.
पण पलीकडून आईचा आवाज थोडा गंभीर होता. "नको अगोदर हॉस्पिटल ला ये" "काय झाले?
सोनाली(माझी बायको) बरी आहे ना?" मी जरा काळजीत म्हणालो.
"हो ती बरी आहे.तुला दोन जुळी मुले झाली. एक मुलगा आणि एक मुलगी त्यातली मुलगी दगावली आहे " आई अटकळत बोलली. आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. जुळी मुल होती याची मला कल्पना होती पण असे काही होईल असे मला स्वप्नातही वाटले नवते.
         मी माझे मन घट्ट केले.लगेचच हॉस्पिटल ला गेलो डॉक्टरांनी माझ्याकडून काही प्रोशिजार करून ते बाळ दाखवले काळजावर दगड ठेवून मी त्या मृत बाळाला पहिले. ते सुंदर गोंडस बाळ एका कुशीवर कायमचे झोपले होते गोरेपण शरीर,गोल चेहरा असे ते सुंदर बाळ एका कुशीवर झोपले होते. त्या बाळाला पाहून माझ्या मनाने तिला प्रश्न विचारले "का ग तुझा हा बाप तुला सुखात ठेवले असते कि नाही माहित नाही पण दोन वेळचे जेवण तुला आपल्या पोटाला चिमटा काढून नक्की दिले असते. मला सोडून जायचे अगोदर मला एक संधी तरी द्यायची होतीस. मला माझ्या घरी तुझ्या पावलाने झाशीची राणी हवी होती माझ्या बाळा"  आणि माझ्या गालावरून दोन अश्रू आपोआप खाली पडले. मला दाखवल्या नंतर नर्स नी ते कोवळे बाळ सफेद कापडात गुंडाळले आणि मला देण्यासाठी पुढे केले क्षणभर वाटले, तिला जवळ घ्यावे  प्रेमाने कवटाळावे पण पुढे गेलेले हातात कापरे भरले. मी माझे हात मागे घेतले आणि माझ्या सासर्याना तिला घ्यायला सांगितले. त्यांना माझी दुविधा कळली असावी. त्यांनी तिला दोन हातावर घेतले आणि आम्ही हॉस्पिटलची इमारत सोडून खाली रस्त्यावर आलो पण कोणताही रिक्षावाला स्मशान भूमीकडे जाण्यास तयार होई ना एक रिक्षावाला थांबला त्याने आम्हास स्मशान भूमी कडे नेले पण रिक्षाचा भाडे  देण्याचा प्रयत्न करताच त्याने घेण्यास नकार दिला.
            ज्या प्रशांत ने  आयुष्यात कधी स्मशान भूमीची पायरी चढली नवती त्याला आपल्याच काळजाच्या तुकड्याला स्मशानात दफन करायला जावे लागत होते. २६ व्या वर्षी देवाने माझी परीक्षा पहिली होती. आज हि त्या गोंडस तुकड्याची आठवण मला येते.असा एक हि दिवस माझा जात नाही तिची आठवण आल्या शिवाय 'कठोर वाटणारा प्रत्तेक बाप मनाने माझ्यासारखा हलवा असतो का हो?'मला माफ करा माझे दुख सांगून मला तुम्हाला नक्की दुखी नाही करायचे आहे पण आपले दुख वाटल्याने थोडे हलके होते असे म्हणतात म्हणून तुमच्या सारक्या मित्रांना थोडा त्रास देत आहे.

Sunday 11 September 2011

ते तीन दिवस .........सुखद आठवणींचे ......!

गावातल्या बाजारपेठेत माझा tvरिपेरिंग चा दुकान होता. समोरच्या घरात ती राहायची दिसायला सुंदर थोडीशी सावली अशी ती होती.तिच्या वडिलांचा खूप मोठा बिजनेस होता. सुरवातीला मी तिच्यावर प्रेम नवतो करत कारण एवड्या मोठ्या बापाची मुलगी मला कशी काय भाव देवू शकते हाच मी विचार करून मी दुर्लक्ष करत असे.आणि मी लहानापासून कधी आई वडिलांचे प्रेम काय असते हे माहित नसलेला प्रशांत एक आजी आजोबा सोडले तर कुणीही प्रेमाने पाठीवर हात न फिरवलेला हा प्रशांत यावर कोण प्रेम करेल ? कधीच नाही प्रेम काय असते हे मलाही माहित नव्हते.पण नियतीने माझ्या आयुष्यात वेगळेच लिहून ठेवले होते.
ती शाळेत जायची एकता तिने शाळेतील विविध गुणदर्शन कार्य क्रम होते तिने माझ्याशी पहिल्यांदा एका चित्रपटाची ओडीओ केसेट मागितली. मी तिला दिली पण आजू बाजूला असणारे माझे मित्र मला चिडवू लागले पहिला पहिला मी त्यांना हसून विषय सोडून दिला. आता हळू हळू तीही माझ्याशी कधी कधी हसून बोलू लागली पण न जाणो का मी तिच्या प्रेमात ओढला जावू लागलो
       तिच्या वर्गात माझी गावातली मैत्रीण होतीमी तिला सांगितले मी नेहा वर प्रेम करतो तू तिला विचार ना तिच्या मानात काय आहे?पण तिने तिला विचारायचे सोडून साऱ्या वर्गात केले आणि हळू हळू हि गोष्ठ गावात चर्चेचा विषय झाली.पण नेहाच्या मानात काय आहे हे मला समजले नाही. मी तिच्यावर खूप प्रेम करू लागलो.
       एक दिवस मला समजले अझे प्रेम एकतर्फी आहे ती माझ्यावर प्रेम करतच नाही खूप वाईट वाटले.मी माझ्या मनाला समजावले. काही दिवस मी तिला विसरो हि शाळेत मुलीच्या क्रिकेट च्या स्पर्धा होत्या.नेहाचा सामना होता मी कोरे सरांना मी अंपायर म्हणून राहतो असे सांगितले त्यांनी मला परवानगी दिली पण जाधव सरांनी नाकारली मग काय प्रेक्षकांत बसून म्याच पाहणे हेच माझ्या नशिबी! मी म्याच पाहू लागलो सर्व मुली आप आपल्या ओढणी खांद्यावरून तिरक्या बांधल्या होत्या नेहाने आपली ओढणी कमरेला बांधली होती. काही मुले तिला अश्लील शब्दात बोलू लागली मला राहवले नाही मी तडक वूथून दुकानात गेलो पण माझ्या हरकतीवर कोणीतरी नजर ठेवून होते.
        राणी नेहाची मैत्रीण तिला जेव्हा समजले कि मी तिथून निघून गेलो.संध्याकाळी ती माझ्या दुकानात आली. मला म्हणाली "तू का निघून आलास तिथून."
"राणी हि ओढणी या ड्रेस सोबत कश्याला दिली जाते?" मी विचारले.
"मुलीच्या लाजेचे रक्षण करायला." राणी.
"मग आज नेहाने तिला कमरेला कश्याला बांधली होती?"मी.
"हे बघ तुला तिची काळजी का वाटते? ती तुझ्यावर प्रेम नाही करत."राणी.
"मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून मी नाही बोलत आहे.तिच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती ना तरीही मी तिला हेच म्हणालो असतो.कारण अश्या वागण्याने मुलांकडून अतिप्रसंगासारखे घटना घडतात."मी तिच्याकडे न पाहताच म्हणालो.
         राणी काही नं बोलतच निघून गेली. मी माझा काम करू लागलो.दुसरा दिवस उजाडला राणी परत माझ्या दुकानात आली मला म्हणाली "प्रशांत, नेहा तुला हो म्हणाली आहे."
"काय?" मी आच्यार्याने तिच्याकडे पहिले.
"हो तिने तुला होकार दिला आहे." राणी.
मला माझ्यावर विश्वासच बसत नवता.तिने आपल्या शाळेच्या ब्यागेतून एक चिट्ठी काढली आणि मला दिली
प्रिय प्रशांत,
            तू आणलेले ग्रीत्तीन कार्ड लग्नापर्यंत  खराब होतील ते तू मला माझ्या वाढ दिवसाला दिलेस तरी चालतील.माझा वाढ दिवस १८ एप्रिल ला असतो.
                                                                                                                     तुझी आणि फक्त तुझीच
                                                                                                                              नेहा.
दोन ओळींची चिट्ठी पण माझ्यासाठी ती अनमोल होती कित्ती खुश होतो मी पण १८ एप्रिल ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो ते आलेच नाही तिने मला ३ दिवसानंतर नकार दिला होता.का नकार दिला याचे कारण मला आजही मिळाले नाही मी खूप वेळा तिला कारण विचारण्याचा प्रयत्न केला पण तिने मला कधी उत्तरच दिले नाही.मी आजही तिच्या नकाराचे कारण शोधतो आहे.
       तिच्या नकाराचे कारण कोणतेही असो तिने माझ्या प्रेमाचा साथ सोडला असेल पण ती माझ्या आठवणी त्या तीन दिवसाच्या आठवणी माझी साथ नाही सोडू शकत.मी तिचा आभारच मानतो माझ्यावर प्रेम करून त्या स्वर्गाहून सुंदर आठवण माझ्या जीवनात सोडून गेली.कधी मला निराशेने ग्रासले तर मी त्या आठवणी आठवतो.कदाचित ती मला विसरली असेल.मी तिला नाही विसरलो आणि नाही विसरू शकत मी तिला माझे प्रेम नाही समजावू शकलो याची मला जाणीव लास्ट पर्यंत राहील.
       नेहा कदाचित हा लेख तुझ्या वाचनात पडला तर नक्कीच तू मला समाजशील मला माहित आहे आत्ता खूप उशीरही झाला आहे मी माझा संसार सुरु केला आहे .तू तुझा सुखाचा संसार  चालू होवो हीच ईश्वर  चरणी प्रार्थना!   















Saturday 10 September 2011

अम्या.......

मी कोई मिल गया हा चित्रपट पहिला एका मतिमंद मुलावर होणारे प्रत्तेक प्रसंग त्यात दाखवले आहेत हा चित्रपट पाहून मला आमच्या गावातील अम्या आठवला.
        नाव अमरीश पण गावातील सारे लोक त्याला अम्या म्हणतात लहानपसुनच मतिमंद असल्याने प्रत्तेक जन त्याची चेष्ठा करण्याची कोणतीही संधी सोडत नसत. तसा तो माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा तो हि प्राथमिक शाळेत जायचा पण मतिमंद  असल्याने त्याला पुढच्या वर्गात टाकले जायचे नाही. मला तो शाळेत ४ थी च्या वर्गात असताना संपर्कात आला.या वर्गात मला वाटते तो ३/४ वर्ष होता सर्वात शेवटला कोपऱ्यात बसायचा.
       या अम्याला सारे पाढे पाठ .शाळेची प्रार्थना तोंड पाठ . पण कोई मिल गया या चित्रपटात त्या मतिमंद हिरोचे खूप मित्र दाखवले आहेत. पण अम्याला  कोणी मित्र नव्हताच. त्याला वर्गातील सारे व्हिलन समजायचे कोणालाही त्याला मारायचा चान्स मिळाला कि कुणीही सोडायचा नाही.एक गुरुजी सोडले तर कुणीही त्याला प्रेमाने समजून घेणारा नव्हता.
       असेच एकदा काय झाले हि घटना मला आठवत नाही आहे पण मला अचानक राग आला आणी मी पट्टी घेऊन अम्याच्या मांडीवर जोरात मारली. 'फट' करून जोरात आवाज आला सारा वर्ग अचानक शांत झाला आणि अम्या जोराने रडायला लागला तो खूप वेळ आपली मांडी जोराने पकडून कळवळत होता सारा वर्ग त्याला हसत होता कोणी म्हणत होता "असेच मारायला पाहिजे त्याला."मीही माझा राग त्याच्यावर काढला म्हणून खुश होतो.अचानक गुरुजी आले अम्या रडतच होता.गुरुजींनी त्याला विचारले अम्या काय झाले ?अम्या अजूनही आपली मांडी चोळत होता.मला वाटले आता माझा काही खरे नाही आज गुरुजी मला खूप मरतील किव्हा वर्गाच्या बाहेर अंगठे पकडून उभे करतील मी माझ्या मनाची तयारी केली शिक्षा भोगण्याची पण पुढे जे झाले ते पाहून पहिला मला विश्वासच बसले नाही.
अम्याने पाणावलेल्या डोळ्यांनी गुरुजींकडे पहिले नंतर माझ्याकडे आणि म्हणाला "काही नाही गुरुजी ,मी पडलो." त्याने हे उत्तर देताच साऱ्या वर्गातील मुले त्याच्याकडे पाहू लागली माझी मान आपोआप खाली गेली.त्यानंतर माझ्या मानात खूप आदर वाढला मी घरी येवून खूप रडलो.आजोबांनी मला विचारले मी शाळेत घडलेली गोष्ठ सांगितली त्यांना हि वाईट वाटले मला म्हणाले "पोरा आपण केलेली वाईट गोष्ट काही काळाने समोरचा माणूस विसरूनही जातो. मोठ्या मानाने माफ हि करतो. पण आपण आयुष्यभर त्यासाठी पश्चाताप करत बसतो आणि पश्त्याताप हि देवाने केलेली शिक्षा असते जी माणसाला दीर्घ काल भोगावी लागते."
       मी त्या वेळी खूप लहान होतो त्यामुळे आजोबा जे बोलले ते मला त्यावेळी लक्ष्यात नाही आले. पण तो अम्या ने  माझा नाव गुरुजींना का सांगितला नाही या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळाले नाही मी खूप वेळा विचारले त्याला पण तो मतिमंद असल्याने त्याने मला एवडेच उत्तर दिले "शिगवण तू माझा दोस्त आहेस ना म्हणून मी गुरुजींना नाही सांगितले." प्रसंग आठवला कि आजही मी रडतो.
खरच पाच्याताप करणे हि देवाने दिलेली मला शिक्षा आहे.