Sunday 22 April 2012

पान नंबर १५ वरून पुढे ................

"पण महादेव असा काही करेल यावर माझा अजिबात विस्वास बसत नाही ." आनंदीबाई.
" या हाताने अग्नी द्यायचे  सोडून मुठ माती देवून आलो आहे आनंदीबाई, आणि याला फक्त आणि फक्त जबाबदार महादेव आहे." दामोदरपंत हताश होऊन खाटेवर बसतात आनंदीबाई त्यांचे सात्वन करू लागतात इतक्यात दारावर टक- टक होते. आनंदीबाई डोळ्यातील अश्रू पुसून कोण आहे म्हणून विचारतात
" आई मी महादेव दरवाजा खोल आई "
आनंदीबाई दरवाजा खोलायला निघतात इतक्यात दामोदरपंत त्यांना थांबवतात.
"आता कशाला आला आहे अजून काय शिल्लक राहिले आहे का?" दामोदरपंत.
" बाबा ,अगोदर दरवाजा उघडा मी सांगतो सगळे." महादेव बाहेरून विनवू लागतो.
" तू काय सांगणार आहेस हे मला पक्के ठावूक आहे आता तू इथे आम्हाला आमच्या हालावर ठेवून निघून गेलास तर खूप उपकार होतील." दामोदरपंत
" अहो पण तो काय म्हणतो आहे ते एकून तर घेवू या " आनंदीबाई विनवणी करतात.
" आम्हाला नदीवर खूप ऐकवला आता तुम्हाला ऐकायची इच्छा असेल तर जरूर ऐका."
" बाबा, कृपा करून दरवाजा उघडा मला तुमच्याशी बोलायचे आहे." महादेव विनंती करू लागतो.
" अहो उघडा  ना कदाचित त्याला महात्व्हाचे बोलायचे असेल."आनंदीबाई .
" उघडा दरवाजा पण शेवटचा या पुढे त्याला या हाराचे दरवाजा बंद असेल ." दामोदरपंत परवानगी तर देतात पण दरवाजाकडे पाठ फिरवतात आनंदी बाई दरवाजा उघडतात महादेव केळीच्या पानात जेवणाची झाकलेली दोन ताटे घेवून आत येतो. ताटे khali कोपर्यात ठेवून पाठमोऱ्या दामोदार्पन्तांचे आणि आनंदी बाईंचे पाया पडतो.

" बाबा , मला माहित आहे आज तुम्ही माझ्यावर रागावला असाल आणि आज झालेल्या प्रकाराबद्दल तुम्ही मला कधीच माफ करणार नाही. पण प्रत्तेक आरोपीला आपली बाजू मांडण्याचा दरबारात अधिकार असतो मीही माझी बाजू मांडतो कदाचित तुम्ही मला माफ करालाही. काल  झालेला प्रकार मला समाजाला तसा मी लगेचच परत निघालो रस्त्यात आपल्या घराची परस्थिती समजली मला माहित होते काळाच्या दिवशी तुम्ही दोघांनी काही खाल्ले नसेल म्हणून पहिला शेतावरच्या घरात जाऊन मऊ भात बनवला पण इतक्यात लोक नदीच्या दिशेने धाव पळ करत असल्याचे समजले रस्त्यातून जाणाऱ्या मोरोपंतांची भेट घडली त्यांनी सांगितले तुम्ही म्हणे नदीवर अधर्म करायला जात आहात तुम्हाला रोखण्यासाठी ते भट वाडीतील काही ब्राम्हणांना घेवून तुम्हाला दगडाने मारण्यासाठी जात आहे असे सांगितले जर मी तुम्हला रोखले नसते तर सार्या ब्राम्हणांनी तुम्हाला दगडाने ठेचून मारले आसते आणि हे drushya मी कसे पाहू शकलो असतो बाबा ? वाहिनी तर या जगातून निघून गेली होती पण तुम्ही मला हवे होतात लहानपणी सक्ख्या बापाला गमावली होती आता परत त्याचे दुक्ख नाही आहे पण ज्याने पाळले पोसले ज्याची जागा माझ्या ह्रिदयात देवाची आहे त्याचे मृत्यू हे डोळे कसे काय पाहू शकतात बाबा ?"

"मी तुम्हाला म्हटले होते ना आपला महादेव असे करूच शकत नाही " आनंदीबाई महादेवच्या तोंडावर हात फिरवत म्हणतात.

" निघतो बाबा संध्याकाळी परत येईन सोबत जेवण घेवून आलो आहे कृपया जेवून घ्यावे आणि परस्थितीला तिच्या हालावर सोडा कारण प्रत्येक दुख नंतर सुख ह येतातच म्हणून माणसाने सुखाची अपेक्षा न करता दुक्खाचा सामना करावा असे तुम्हीच मला सांगितले होते ना?" असे म्हणून महादेव जाऊ लागतो
क्रमश .......................................

Thursday 5 April 2012

पान नं १४ वरून पुढे ..................

             सकाळी दामोदर पंत उठतात अचानक आपले  कोपर्यात ठेवलेली काठी उचलून बाहेर जाऊ लागतात आनंदी बाई ते पाहतात आनंदी बाईना माहित असते कि कुठे लांबचा प्रवासासाठी दामोदरपंत चालले आहेत नाहीतर ते कधी काठी वापरत नाहीत. अंगणात पायरीच्या खाली ठेवलेले कोल्हापुरी चप्पल पायात सरकवतात एवढ्यात आनंदी बाई त्यांना थांबवतात.
        " कुठे चाललात ? "
        " सून बाईंच्या गावी जावून येतो पाहतो पोर व्यवस्थित घरी पोचली कि नाही. " दामोदरपंत असे म्हणून निघतात.
      " लवकर या मला एकटीला घर खायला उठेल नाहीतर." आनंदीबाई.
      " हो सून बीची खुशाली पाहून लगेचच घराचा रस्ता पकडेन कारण आता आपण धर्म भ्रष्ट  पाणीही मिळणार नाही त्या घरात ."दामोदरपंत असे म्हणतात आणि आनंदी बाईंच्या डोळ्यातील अश्रू टपकन गालावर ओघळतात.
     " अहो आता आपल्या काळजावर दगड ठेवायला लागणार आहे अजून खूप काही सहन करायचे डोळे पुसा आता "
               दामोदरपंत निघून जातात.  दुपार निघून जाते संध्याकाळचे वेध लागतात पण दामोदरपंत परत येत नाहीत. आता मात्र आनंदी बाई चा धीर सुटू लागतो आत्ता पर्यंत तर दामोदरपंत परत यायला हवे होते  आनंदी बाई घरातून अंगणाकडे फेर्या मारून दामोदार्पन्तांची वाट पाहू लागतात अचानक दामोदरपंत येतात त्यांना पाहून आनंदी बाईंचे जीव भांड्यात पडतो.
      " भेटली सून बाई ?  कशी आहे व्यवस्थित घरी पोचली आहे ना ?" आनंदी बाई दोन वेळा विचारतात पण दामोदर पंतांच्या तोंडातून कोणतेच वाक्य निघत नाही ते सरळ अंगणात चप्पल काढून घरात प्रवेश करतात अंगातील सदरा काढून खुंटीवर टांगतात. सुम्भाने विणलेल्या बादाल्यावर बसतात आनंदीबाई स्वयंपाक घरात जाऊन पाणी घेवून येतात पाण्याने भरलेला गाडगा दामोदरपंतांच्या हातात देवून परत विचारतात
     " सुनबाई मिळाली का ?" पाण्याचा एक घोट घेत ते तांब्या जमिनीवर ठेवतात.
     "हा प्रश्न तुम्ही नाही विचारलात तर बरे होईल आणि ऐकायचे असेल तर काळजावर दगड ठेवा मग सांगतो. दामोदरपंत
   " माझे मन मी कधीच मारले आहे आता फक्त त्या जागी दगड भरला आहे ज्याच्यावर कसलाच परिणाम होणार नाही काय घडले ते व्यवस्तीत सांगा.
   " हो मिळाली , पण तिच्या माहेरी नव्हे कृष्णेच्या काठावर निर्वस्त्र  पडली होती ज्या वयात मुलांचे संसार पाहायचे होते त्या वयात नको ते पाहायला लागले." दामोदरपंत .
     " काय झाले ते व्यवस्तीत सांगाल का ?" आनंदीबाई.
     " सकाळी मी सून बाईंच्या गावी निघालो पण वाटले असे पारवसे सोयार्यांकडे जाने योग्य नाही नदीवर आंघोळ करून जावे म्हणून नदीच्या मार्गाकडे वळलो नदीवर गेलो तर सगळीकडे मुर्दे पडले होते कोल्ही कुत्री  मेलेल्या माणसाचा मांस ओरबाडून खात होती. उबळ यावी असे दृश्य होते. नदीच्या काठी मुर्द्यांचा खच पडला होता. आपला शील भ्रष्ट होऊ नये म्हणून हजारो स्त्रियांनी नदीचे उदार जवळ केले होते. अचानक माझी नजर एका स्त्रीच्या मृत देहाकडे गेली अंगावर एकही वस्त्र नवते ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून आपली सुनबाई होती. माझ्या अंगावरचे उपरणे काढून मी ते तिच्या अंगावर घातले. आणि मृत देहाला अग्नी देण्यासाठी लाकडांचा बंदोबस्त करण्यासाठी गावात सदुकडे आलो मी लाकडे घेवून नदीवर अंतिम क्रियेची तयारी करताच होतो इतक्यात आपला त्याला विरोध करायला गावकर्यांना घेवून आपला महादेव आला."दामोदर पंत .
" आपला महादेव ....?"
" हो आपला महादेव . " दामोदरपंत .
"नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल आपला महादेव असे नाही करू शकत." आनंदी बाई.
" आनंदीबाई गैरसमज दुसर्यांनी सांगितल्यावर होतो आपल्या डोळ्यांनी पाहिलेली घटना आणि कानांनी ऐकलेल्या घटना खर्या असतात." दामोदरपंत
" मला नाही वाटत तो महादेव असेल तो माझा मुलगा नसला म्हणून काय झाले त्याला मी माझ्या पोटाच्या मुलाप्रमाणे वाढवले आहे.एक वेळ अम्बजीवर विश्वास नाही ठेवणार पण महादेव असे अरेल असे म्हणाल तर मला नाही पटत. " आनंदीबाई .
" तुम्हाला तुमच्या नवऱ्यावर विश्वास आहे ना?" दामोदरपंत.
क्रमश ...............................