Tuesday 28 February 2012

पान नं ६ वरून पुढे...........................

        रात्री जेवणाची वेळ असते. आनंदीबाई केळीच्या पानावर सर्वाना जेवण वाढतात. महादेव आणि अंबाजी माज घरात बसलेले असतात. आनंदीबाई जेवायला हाक मारतात. दोघे हाथ धुवून जेवायला बसतात. एवढ्यात बाहेरून दामोदरपंत येतात. अम्बजीला जेवताना पाहून ते खवळतात.
            " याला जेवायला कोणी वाढला?" दामोदरपंत अम्बजीकडे बोट दाखवत विचारतात. अंबाजी समजून चुकतो आता आपल्याला जेवण तर मिळणार नाही पण पोटभर मार नक्की मिळणार आहे तो दोन मोठ मोठे घास मारतो ते पाहून दामोदरपंत पुढे होतात. त्याच्या पुढ्यातील जेवणाचे पान काढून घेतात आणि बाहेर असलेल्या कुत्र्याला टाकतात.
            " अहो काय करता आहात त्याने काय केले आहे?" आनंदीबाई गोंधळून विचारतात .
            " तोंड दाखवायला जागा ठेवली नाही आहे त्याने. चोरी केली आहे माझ्या बटव्यातील २० होण् काढले आहेत त्याने." दामोदरपंत.
           " ते पैसे मी नववारी घेण्यासाठी काढले होते. मला विचारायचे." आनंदीबाई अम्बजीला वाचवण्याच्या प्रयत्नात बोलतात.
           " आज तुमचे पुत्र प्रेम खुपच ओतू जात आहे. खोटे बोलण्याची काही हद्द असते.खरे काय आहे हे मला समजले आहे या नालायाकाने फक्त पैसेच नाही चोरले आहेत तर त्या पैश्याचा जुगार हि खेळला आहे हा आणि आज जर तुम्ही त्याला पाठीशी घातलेत तर पुढे पाछतावण्याची वेळ येईल आपल्यावर " दामोदर पंत.
          " काय जुगार........" आनंदीबाई
          " हो नालायक जुगार खेळला त्या पैश्याचा  "दामोदरपंत.
          " अरे देवा......." आनंदीबाई.
          " आता याला उद्या दुपारचे जेवणही देवू नका नाहीतर माझ्याशी गाठ आहे ."
अंबाजी तेथून लगेच बाहेर पडतो कारण जेवण तर गेले आता मार हि पडतील हे त्याला चांगले माहित असते महादेव नि बाबांना सांगितले त्या महादेवाला मी कधीच माफ करायचे नाही हा विचार पक्का करतो. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याचा सूड घ्यायचा  हे तो पक्के मनाशी ठरवतो.आज घरात जायचे नाही कारण आज जर आपण घरी गेलो तर आपली काही धडगत नाही म्हणून तो पाटलाच्या गोठ्यात झोपतो.
          सकाळ होते पाटलाचा गडी म्हादू   गोठा झाडायला येतो गोठ्यात तो अम्बजीला झोपलेला पाहून त्याला आश्चर्य होतो.
           " अम्बजीपंत आज गोठ्यात सत्यनारायण सांगता व्हय वाटते." अम्बजीला हलवून उठवतो.
           " काल  माझ्या बाबांनी माझा सत्यनारायण केला. म्हणून इथे झोपायला लागले. " डोळे चोळत अंबाजी म्हादू ला सांगतो.
           "आता काय केलेत नवीन भानगड?" म्हादू.
           " काही नाही रे थोडे पैसे घेतले म्हणून रात्री जेवण नाही दिले." अंबाजी म्हादू ला सांगतो आणि तेवढ्यात महादेव पाटलांच्या वाड्यात येतो त्याला पाहून अंबाजी निघून जाऊ लागतो
           " अंब्या कुठे निघालास?" महादेव.
           " तुला काय करायचे आहे आणि तू कोण मला विचारणारा ?" अंबाजी
           "तुझा मोठा भाऊ ठावूक नाही आहे होय तुला " महादेव
           " मला कोणी मोठा भाऊ नाही आहे. "
           " असे तू म्हटलेस तरी मी मानणार आहे का? " महादेव.
           " काम काय आहे ते सांग आणि निग इथून " अंबाजी रागाने म्हणतो.
           " आईने तुला शोधून आणायला सांगितली आहे आणि बाबा दूरच्या गावात उपचारासाठी गेले आहेत ते उद्याच येतील चल रात्री जेवलास नाही  आहेस " महादेव त्याचा हात पकडतो अंबाजी त्याचा हात झटकून टाकतो
          "बाबांना मी पैसे चोरले असे का सांगितलेस?" अंबाजी
          " कारण बाबांनी मला शप्पथ घातली होती.म्हणून सांगावेच लागले. " महादेव
          " आणि मी घातलेली शपथ , तिचे काहीच नाही ?" अंबाजी.
          " बाबांची शपथ मी नाही मोडू शकलो " महादेव.
          " मी उपाशी राहिलो रात्रभर त्याचा काय ?" अंबाजी
          " आईने साजूक तुपातील मऊ भात  केला आहे ठीक आहे तू नसशील येत तर मी जातो. " महादेव असे म्हणून चालू लागतो.
           " ये थांब , सारा मऊ भात  एकटा खायचा विचार आहे वाटते तुझा. " असे म्हणून अंबाजी त्याच्यासोबत चालू लागतो.
           हळू हळू दिवस निघून जातात अंबाजी १५ वर्षाचा तर महादेव २० वर्षाचा होतो. दोघांच्या लग्नाची वेळ जवळ येते दामोदर पंताना जानकीने दिलेल्या पत्राची आठवण होते. लग्ना अगोदर ते पत्र महादेवला  द्यायचे असते. खूप वेळा त्या पत्रात काय लिहिले आहे याची उसुक्ता त्यांना असते खूप वेळा ते वाचण्याचा मोह हि त्यांना होतो पण त्यांना ते पत्र वाचण्याची हिम्मत होत नाही. एकदा संध्याकाळी बाहेर नारळाच्या कात्यापासून सुंभ वळणाऱ्या महादेव ला आवाज देवून माजघरात बोलावतात.
         " मला बोलावलेत बाबा ." महादेव.
          " हो"
        " काही महात्व्हाचे काम होते का ?" महादेव
        " हो महात्व्हाचेच काम होते. तुझे लग्नाचे वय निघून जात आहे मला ते तू १२ वर्ष्याचा असतानाच करायला हवे होते पण एका कोड्यामुळे लांबवले ते लाम्बवालेच " दामोदरपंत
        " कसला कोडा ?"
        तुझ्या आईने तुझ्यासाठी एक पत्र लिहून ठेवले आहे. ते तू वयात आल्यावर तुझ्या लग्नाच्या आधी तुझ्या हाती द्यावे असे सांगितले होते." दामोदरपंत आपल्या बटव्यातील एक गुंडाळलेले पत्र काढून त्याला देतात.
क्रमश.................




पान नं ५ वरून पुढे...........................

       महादेव देवळाच्या पायऱ्या चढून देवळात प्रवेश करतो सर्वात प्रथम तो दामोदर पंतांच्या पायाला हात लावून  पाया पडतो. दामोदर पंत त्याला मधेच थांबवण्याचा एक असफल प्रयत्न करतात.
               " महादेव किती वेळा तुला सांगितले आहे माझ्या पाया पडायच्या अगोदर देवाच्या पाया पडत जा म्हणून." दामोदरपंत.
               " बाबा माता पित्याचे जागा देवाच्या जागी असते मग तुमच्या पाया पडलो काय आणि देवाच्या पाया पडलो काय शेवटी एकच नाही." महादेव देवळातील गणपतीच्या पाया पडत म्हणतो.
               " तुझ्यापुढे शब्दात जिंकणे मला शक्य नाही." दामोदरपंत त्याला आपल्या छातीशी कवटाळत म्हणतात.
               " बाबा शेवटी माझे गुरु तुम्हीच आहात, आणि गुरु असा एक डाव आपल्या शिष्याला शिकवत नाही जो ब्रम्हास्त्र असतो. " महादेव.
               " खरे आहे पण आज तू माझा गुरु निघालास धोंड्याच्या मुलीला असा कोणता पाला खायला दिलास ज्यामुळे ती मोठ्या विष बाधेबासून वाचली. तू माझापण गुरु निघालास."
               " बाबा मला सांगा एखादी विषारी वस्तू आपल्या पोटात गेल्यावर जर ती वेळेत बाहेर आली तर माणूस वाचू शकतो नाही. एकदा मी एका माकडाला पहिले तो कित्तेक वेळा अस्वस्त होऊन इकडे तिकडे उड्या मारत होता मग तो दोन झाडे सोडून एका झाडावर गेला त्या झाडाचा पाला खाल्ला मग काही वेळाने चक्क त्याने उलटी केली . आणि लगेच स्वस्थ झाला . मला लगेच समजले त्याने अशी काही वस्तू खाल्ली होती जी त्याला पचवणे अवघड झाली होती म्हणून ती वस्तू पोटातून उलटी मार्फत काढून टाकण्यासाठी त्याने तो पाला खाल्ला. आणि तोच पाला मी मंगलाला खायला दिला.बाबा तुम्हीच तर मला शिकवले आहे ना माणसापेक्षा जनावरांना झाड-पाल्याची माहिती जास्त असते. त्यांचे व्यवस्तीत निरीक्षण केल्याने आपल्याला खूप सारे औषधी सापडू शकते. " महादेव.
           " महादेवा एवढ्या कमी वयात तुला किती समज आहे रे."
           " बाबा माझ्याकडून एक चूक झाली आहे." महादेव.
           " चूक आणि तुझ्याकडून झाली असेल, मला नाही वाटत." दामोदर पंत.
           " पण माझ्याकडून ती झाली आहे बाबा, मी न विचारता तुमच्या बटव्यातील २० होण् घेतले."
           " अरे ते पैसे वाण्याला द्यायचे होते. नाहीतर तो जिन्नस नाही देणार यापुढे."दामोदरपंत.
           " माफ करा बाबा, पण मी ते  पैसे लवकरच तुम्हाला परत करेन."
           " मला सांग एवढ्या पैश्याची गरज तुला कशाला पडली?" दामोदर पंत.
           " तो डोंगरावरचा आदिवशी पाडा आहे ना तिथल्या एका आदिवाश्याच्या मुलीच्या लग्नाला पैसे कमी पडत होते म्हणून त्याला मदत करण्यासाठी काढले."महादेव.
           " बर केलास पोरा आपल्या पेक्षा त्या गरिबाला त्याची गरज होती. आणि पैसा काय आज ना उद्या आपण कामावूच" असे म्हणून दामोदर पंत देवापुढे असणारा प्रसाद महादेवला द्यायला उचलतात.......
           " महादेव तू माझ्या बटव्यातील पैसे कधी काढलेस?" दामोदरपंत.
           " अ..न ....परवा ....रानात वनौषधी आणायला गेलो त्या दिवशी."महादेव अडखळत बोलतो.
           " पोरा देवाच्या दरबारात तरी खोटे बोलू नकोस मला सांग अम्बजीने ते पैसे काय केले." दामोदरपंत
           " नाही बाबा ते पैसे अम्बजीने नाही मी काढले तुम्हाला............." महादेव.
           " महादेव तू मला म्हणालास ना तुम्ही माझे गुरु आहात आणि गुरु असा एक डाव असतो जो आपल्या शिष्याला कधी शिकवत नाही. आणि मी हि तो डाव तुला नाही शिकवला आहे. कोणता डाव माहित आहे .......खोटे बोलण्याचा डाव जो मी तुला कधीच शिकवला नाही. आणि त्यामुळेच तू व्यवस्तीत खोटे बोलू शकत नाहीस . मला माहित आहे ते पैसे तू नाही माझ्या बटव्यातून काढलेस अम्बजीने काढले आहेत आणि मला हे हि माहित आहे त्याने त्या पैश्याचे काय केले. " दामोदरपंत.
          " पण तुम्हाला कसे समजले ते पैसे मी नाही अम्बजीने घेतले." महादेव आश्यार्याने विचारतो.
          " कारण ते पैसे मी माझ्या बटव्यात परवा नाही काल ठेवले होते. आणि काल तर तू पूर्ण दिवस आदिवशी पाड्यात होतास. राहिली गोष्ट मला न विचारात पैसे घेण्याची  असे तू कधीच करणार नाहीस माझ्या परवानगीशिवाय . मला तुझ्यावर पूर्ण भरवसा आहे. पण तू अम्बजीला पाठीशी घालून त्याला मदत नाही करत आहेस चुकून वाईट दिशेला जाण्यास मदत करत आहेस. अंबाजी पेक्षा पैसे नक्कीच मोठे नाहीत पण त्याने कोणत्या कारणासाठी वापरले हे पाहणे जरुरी आहे. मला तुझ्याकडून खरे ऐकायचे आहे कृपया माझा विश्वासघात करू नकोस." दामोदरपंत त्याचे दोन्ही खांद्यावर हात ठेवत बोलतात. न राहून महादेव अम्बजीने पैसे कोणत्या कारणासाठी वापरले हे सांगून टाकतो.

Sunday 26 February 2012

पान नं ४ वरून पुढे........................

    संध्याकाळी महादेव घरी परततो. आणलेली औषधी देवापुढे ठेवतो. आनंदीबाई चहा देतात.
          " महादेव यांनी तुला देवळात बोलावली आहे." संतीबाई रिकामा चहाचा कप परत घेत म्हणतात.
          " ठीक आहे आई मग मी निघतो त्या निम्मित्ताने सांज आरतीही मिळेल." महादेव असे म्हणून देवळांकडे चालू लागतो. रस्त्यात त्याला अंबाजी भेटतो.
         " काय रे अंब्या कुठे निघाला आहेस धावत धावत?" महादेव.
        " दादा मला थोडे पैसे पाहिजे होते."
        " कशाला? " महादेव.
        " तू देणार आहेस कि नाही ते सांग."
        " तुला किती आणि कशाला पैसे हवे आहेत ते सांग तरच मी देईन" महादेव.
        " सांगतो पण मला वचन दे तू बाबांना सांगणार नाहीस "
        " अंब्या आता तू काय नवीन भानगड केली आहेस."
        " दादा पहिले तू वचन दे."
        " ठीक आहे नाही सांगणार आता सांग." महादेव.
        " मला २० होण् हवे आहेत."
       " एवढे पैसे ? एवडे पैसे माझ्याकडे नाही आहेत आणि एवढे पैसे तुला कशाला हवे आहेत. "महादेव.
       " दादा मी जुगारात हरलो. " अंबाजी खाली मान घालून म्हणाला.
       " तू जुगार खेळलास? "
       " त्याचे काय आहे बाजूच्या गावात जत्रा भरणार आहे उद्या म्हणून मी बाबांच्या बटव्यातील २० होण् काढले मला वाटले हे पैसे जुगारात लावून दुप्पट करेन आणि मग ते पैसे बाबांच्या किशात ठेवून  वरच्या पैश्यात जत्रा फिरीन." अंबाजी .
       " तू बाबांच्या किशातील पैसे चोरलेस, आणि तुला काय वाटले जुगारात तू जिंकशील ?" महादेव रागाने म्हणाला
        " या अगोदर हि मी एकदा असे केले होते त्यावेळी जिंकलो होतो." अंबाजी.
        " जुगारात प्रत्तेक वेळी नाही जिकू शकत कारण ते पैसे कोणाच्यातरी कास्थाचे असतात. त्या माणसाची हाय असते." महादेव.
         " दादा काहीतरी कर नाहीतर आज बाबा माझी पाठ सोलून काढतील मला वाचव दादा परत मी असे नाही करणार." अंबाजी विनवणी करू लागला.
         " अरे पण मी काय करू शकतो माझ्याकडे फक्त ५ होण् आहेत बाकीचे होण् कुठून आणू?" महादेव.
         " तुझ्याकडे तेवढे पैसे नसतील तर माझ्याकडे २ उपाय आहेत." अंबाजी.
         " मग ते उपाय तूच का नाही करू शकत ?" महादेव.
         " कारण ते उपाय फक्त तूच करू शकतोस ." अंबाजी.
          " ठीक आहे सांग लवकर नाहीतर माझी सांज आरती चुकेल मला माहित आहे तुझ्या डोक्यात घानेरडेच उपाय असणार." महादेव.
         " पहिला उपाय ...........तुझ्याकडचे ५ होण् आपण परत जुगारात लावू या कदाचित आपल्या नशिबात जीत असेल." अंबाजी.
         " अंब्या तुझे डोके ठिकाणावर आहे कारे मी माझे पैसे जुगारात लावेन हे तू म्हणूच कसे शकतोस?" महादेव रागाने त्याच्यावर ओरडतो.
         " मग दुसरा उपाय तो तुझ्या सिद्धांतात बसतो. ........" अंबाजी.
          " आता सांगतोस कि जावू मी."
        " तू बाबांना सांग ना मला काही काम पडले म्हणून तुम्ही नव्हतात तेव्हा त्यातले २० होण् मी घेतले एका गरजू गरीब माणसाला मदत करायला . ते तुला काही नाही बोलणार  आणि तुझे ५ होण् हि वाचतील " अंबाजी.
        " अंब्या तुला काय वाटते असे मी करेन.?" महादेव.
         " वाटते नाही मला खात्री आहे तू माझ्यासाठी देव आहेस आणि आज तुझा हा भक्त तुला पाण्यात ठेवत आहे मग तू तुझ्या भक्ताची नक्की मदत करणार?" अंबाजी.
        " मला तू पाण्यात ठेवली आहेस ?" महादेव.
         " हो बघ ना तू एका पाण्याने साचलेल्या डबक्यात उभा आहेस." अंबाजी त्याला खाली बोट दाखवत सांगतो. महादेव खाली पाहतो तर खरेच त्याच्या पायाखाली एक पाण्याने भरलेले छोटेशे डबके असते. तो थोडा बाजूला होतो.
          " दादा करशील ना रे माझी मदत?" अंबाजी केविलवाणा होऊन बोलतो आणि महादेवालाही त्याला नाही म्हणवत नाही.
          " ठीक आहे पण तू मला वचन दिले आहेस परत तू जुगार खेळणार नाहीस." महादेव.
          " तुझी शपथ , नाही खेळणार  "
          " आता माझी शपथ घेवून मला मारणार आहेस का जा घरी आई चहासाठी तुझी वाट पाहते आहे ? " असे म्हणून महादेव मंदिराची वाट धरतो. थोड्या वेळातच तो मंदिरात पोचतो. मंदिरात सांज आरती नुकतीच संपलेली असते.सारे गावकरी देवळातील गणपतीचे दर्शन घेवून निघून जात असतात.
क्रमश ...........................
                                                                                                                                                      पान नं ५

Friday 24 February 2012

पान न ३ वरून पुढे.........

                दामोदर पंत सारा गाव शोधून काढतात. पण जानकीचा काही पत्ता लागत नाही.ते  तिच्या घरीही शोधतात पण ते तिला शोधण्यास ते अपयशी ठरतात.  शेवटी हताश होऊन ते घरी परततात. घडलेली सारी हकीगत ते आनंदी बाई ना सांगतात. दुसऱ्या दिवशी ते गावातील नदीकाठ पुन्हा पालथा पण तिला शोधण्यास ते अपयशी ठरतात.
              काही महिन्यांनी  दामोदर पंताना पुत्र रत्न होते. मुलाचा नाव अंबाजी ठेवतात. अंबाजी आणि महादेव एका घरात वाढू लागतात.  अम्बजीचे अति लाड झाल्याने तो फार खट्याळ होतो पण त्याउलट महादेव अधिकाअधिक समजूतदार होऊ लागतो. महादेव प्रत्तेक वेळी आपल्या आवडीना मुरड घालून आपल्या हिस्श्यातील प्रत्तेक वस्तू अम्बजीला देत असे. दामोदर पंत आणि आनंदी बाईनी महादेव हा आपला मुलगा नाही हे अम्बजीला कळू नये म्हणून योग्य ती दक्षता घेतात. 
              महादेव आता १२ वर्षाचा झाला होता. आणि अंबाजी ८ वर्षाचा  महादेव आपला जास्तीत जास्त वेळ दामोदर पंताना वन औषधी जंगलातून आणून देण्यासाठी घालवत असे. कोणत्या डोंगरात कोणता औषध मिळेल हे त्याला चांगले माहित होते. आता तो एकटा जंगलात जात असे. जंगलातील आदिवशी पाडे त्याला चांगले ओळखत. सारे आदिवाशी त्याला दामोदर पंतांचा उत्तर अधिकारी म्हणून पहात त्याला मान देत असत.
             दामोदर पंत हे ब्राह्मण असल्याने ते सहसा कोणाच्या घरी काहीही खात नसत ते फट एखाद्या आदीवाशी च्या झोपडीत चहा घेत असत. आपला पाणी मात्र ते नदी किवा ओढ्यातील पीत असत. पण महादेव तसा नव्हता. तो कोणाच्या हि घरी जेवत असे रात्र- रात्र मुक्काम करत असे. पण कुणाकडे फुकटचे खायचे नाही हा त्याचा नियम. कोणते काम नसेल तर त्या आदिवाश्याचे गोठा झाडून द्यायलाही तो कमी करत नसे.
             एकदा एक आदिवशी पसाभर धान्य घेवून दामोदर पंतांच्या घरी आला.
               "राम राम वैद्य बुवा "
                " राम राम , कसा काय आलास धोंड्या " दामोदरपंत.
                " काय सांगू , काळ तीसंच्यानी लय मोती आफत आली व्हती "
                " माझी पोर मंगला तीन धोत्र्याचा बी खाल्ली कि हो " धोंड्या.
                " अरे देवा मग वाचली कि नाही " दामोदर पंत काळजीत म्हणाले.
                " अहो म्हध्या असल्यावर ती मारणार हाय व्हय "
                " पण त्या विषारी फळावर कायच उपाय नाही आहे धोंड्या असा असते तर कित्तेक जनावरांचे प्राण
                 मी वाचवले नसते का जे चुकून धोत्र्यचे बी खातात त्या " दामोदर पंत.
                " मला म्हयीत हाय वैद्य बुवा पण म्हध्यान कसलाश्या पाला आणला तो वाटून तिला पाजला आणि  
                 तीन ४ /५ वांत्या केल्या आणि झाली नव्ह ठणठणीत " धोंड्या
               " अरे पण मला असला कुठलाच पाला माहित नाही मग महादेव ला कसा माहित असेल ." दामोदरपंत
                आचार्याने म्हणाले.
               " आता ते म्हध्यालाच विचारा.आणि हे पसाभर धान्य ठेवा नाही म्हणू नका नाहीतर माझ्यासारख्या
               गरिबाला वायट वाटल " धोंड्या पाठीवरचे बोचके दामोदर पंताना देत म्हणाला.
याला नको म्हणून हा ऐकणार नाही हे दामोदर पंताना चांगले माहित होते म्हणून त्यांनी नकार न देताच ठेवून घेतले.     " धोंड्या महादेव कुठे आहे आता?" दामोदरपंत
               " आज म्या त्याला सकलच धनगराच्या वाड्यात झाड-लोट करताना बगीताला  मी गावात जातो
              हाय येतोस काय विचरला तर बा ला सांगा तीसंचानी येईन घराला म्हणून " धोंड्या. दामोदर पंतानी
              आनंदीला हाक मारून चहा ठेवायला सांगितली .
              " वैद्य बुवा चाय नग  कसला वैनिना तरास देताय" धोंड्या संकोचित होऊन म्हणाला.
            " धोंड्या चहा  तर तुला प्यायलाच लागेल कारण यावेळी मी तुझा ऐकणार नाही "
चहा पान झाल्यावर धोंड्या आपल्या घराचा रस्ता धरतो.
क्रामश ...............
                                                                                                                                            पान नं ०३

Thursday 23 February 2012

पान २ वरुण पुढे .......

लहानगा महादेव घरी आला. घरी येताच त्याने आपल्या हातातील दोन्ही पत्रे दामोदर पंतांकडे दिली. त्यातील एक पत्र दामोदर पंतांसाठी होते तर दुसऱ्या पत्रावर लिहिले होते पहिले पत्र वाचल्याशिवाय हे पत्र उघडू नये. दामोदर पंतानी पहिले पत्र उघडले.
 नमस्कार ,
मी जानकी माझी पूर्ण माहिती न समजून घेता आपण माझ्या मुलाला भिक्षुकी शिकवायचे कबुल केलेत माणूस इतका साधा आणि भोला असू शकतो याचा अनुभव मला पहिल्यांदा . आमच्या गावात तुमची कीर्ती मी ऐकून होते. तुम्हाला कोडे पडले असेल ना मी लिहू कशी शकते म्हणून? माझे  श्रीधरपंत यांचा संस्कृतवर चांगला प्रभाव होता त्यांना वाटे स्त्रियांनी हि शिकले पाहिजे. त्यांना जुन्या चाली रिती अजिबात मान्य नव्हत्या पण ते नास्तिक नव्हते. ते म्हणायचे जगात देव आहे कि नाही हे मी सांगू शकत नाही पण माणसाला जगायला संस्कार आवशक असतात आणि हे संस्कार तेव्हाच घडतात जेव्हा माणूस कुणा ना कुणाला तरी घाबरत असतो आणि जगात असा एकच नाव आहे ज्याला माणूस घाबरून संस्कारी बनतो आणि तो म्हणजे देव. माझ्या मुलाला मी भिक्षुकी शिकवेन कारण त्यामुळे त्याला समाजात इज्जत आणि देवाची भीती या दोन्ही गोष्ठी यामधून मिळतील.त्यांनी मला लिहायला शिकवले आणि म्हणाले जर आपल्याला मुलगी झाली कि तिलाही शिकवू पण देवाने त्यांना जास्त काल जगू दिले नाही. त्यांनी  मला लिहायला शिकवले याचा मला कधी फायदा झाला नाही पण आज त्या लेखणीचा शेवटचा प्रयोग करायचा मी ठरवले आहे. यापुढे मी महादेवला आणि तुम्हाला कधी भेटणार नाही. कारण मी आत्महत्या करायचे ठरवले आहे . तुम्हाला वाटत असेल मी कमजोर मनाची आहे पण तसे नाही आहे. जीवनात जगायला कष्ट पडतात म्हणून मी आत्महत्या नाही करत आहे त्याला मोठे कारण आहे जे मी जिवंत असताना नाही सांगू शकत  पण एका कोड्यात टाकून मेले तर कदाचित माझा आत्मा शांत होणार नाही
              माझे पती कोणत्या आजाराने मेले नाहीत तर गावातील सावकाराने त्यांना विषबाधा करून मारले. कारण त्या सावकाराचा माझ्या सौंदर्यावर डोळा होता. मी पती मेल्यानंतर केशवपन केले कदाचित त्यामुळे सावकाराच्या पाशातून मी सुटेन पण तरीही त्या नराधमाने मला सोडली नाही पती ज्या दिवशी निवर्तले त्याच रात्री सावकाराने माझ्यावर बलात्कार केला . मला गावात कुठेच काम मिळणार नाही याची दक्षता घेतली त्याला वाटले असे केल्यावर मी त्याच्या तुकड्यावर जगेन त्याची रखेल बनेन पण मी नाही ऐकले. कुणाशी वाच्यता केलीस तर तुझ्या नावार्याप्रमाणे तुझ्या मुलालाही मारेन अशी धमकी दिली. मी त्याचे अत्याचार आज पर्यंत सहन करत आले मी त्या सावकारापासून ३ महिन्याची गर्भवती आहे. यापुढे जिवंत राहिली तर जग माझ्यावर थुन्केल माझ्या मुलाची काळजी घ्या लाड करा असे नाही म्हणत आहे पण एक आश्रीत म्हणून भाकर जरूर दया मी तुमचे उपकार जन्म्हभर नाही विसरणार .
            दुसरे पत्र महादेव साठी आहे ते पत्र त्याला तो जाणता झाला कि दया माझी विनंती आहे ते पत्र फक्त महादेव साठीच आहे ते दुसऱ्या कुणाच्या हातात पडणार नाही हि माझी शेवटची इच्छा पूर्ण करा . तुमचे पांग मी या जन्म्हन नाही फेडू शकणार पण पुढच्या जन्मी मी देवाकडे तुमच्या घरी गाय बनवून फेडावे म्हणून विनंती करेन  बस पत्र पुरे करते
                                                                                                                                      जानकी
पत्र संपताच दामोदर पंत भानावर येतात. "महादेव तुझी आई कुठे आहे?"
               " मला इथेच बाहेर सोडून घरी जा म्हणून सांगून गेली " महादेव
               " अरे तुला सांगितले का कुठे जाते म्हणून ?"
               " नाही " महादेव
              "अहो लवकर माझी पगडी द्या खूप मोठा अनार्थ होणार आहे." दामोदर पंत आनंदि बाई ना ओरडत सांगतात.
              " काय झाले " आनंदी बाई पगडी घेवून येत विचारतात .
              " सांगायला वेळ नाही मी आल्यावर सांगतो " दामोदरपंत धावत धावत घराच्या बाहेर पडतात.
क्रमश ..............

Wednesday 22 February 2012

              दामोदरपंत महादेवला घेवून आपल्या घराकडे आले.
              " कोणचा हा मुलगा ?" आनंदीबाई
               " अहो  ते जोशी आहेत ना  त्यांच्या शेजाऱ्याचा आहे. याचे वडील नाही आहेत त्याच्या आईने भिक्षुकी शिकायला आपल्याकडे पाठवले आहे." दामोदरपंत
               " किती गोड आहे ना ! " आनंदीबाई.
               " लवकरच आपल्यालाही असेच गोड मुल होणार आहे." दामोदरपंत.
               " चला,  तुमचे आपले काहीतरीच." आनंदीबाई
               " अहो लाजता काय तयारी करा नव्या पाहुण्याच्या आगमनाची " दामोदरपंत.
दिवसामागून दिवस जावू लागले महादेव दामोदर पंतांच्या घरी मिळून मिसळून गेला. तीन महिने झाले अचानक सकाळी सकाळी जानकी महादेव ला भेटायला आली. दामोदर जानकीला पाहताच कडकडून बिलगला. जानकीच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या. दोघा आई मुलाचे प्रेम पाहून दामोदरपंत आणि आनंदी बाई स्थब्ध झाले. " मी याला थोडे बाहेर घेवून जाऊ " जानकी
                 " जानकीबाई मुलगा तुमचाच आहे त्यात परवानगी कसली मागता. " दामोदरपंत.
                 " पण आता तो तुमच्या पदरात टाकला आहे ना " जानकी
                 "मी चहा ठेवला आहे पहिला चहा प्या आणि नंतर जा." आनंदी बाई असे म्हणून आंत स्वयंपाक घरात गेल्या.
                 " जानकीबाई उदरनिर्वाहासाठी काही दुसरे काम मिळाले कि नाही ?" दामोदरपंत.
                  " हो , आता सारे प्रश्न सुटतील  काही दिवसाने." जानकी
                  " कोणते काम मिळाले आहे? " दामोदरपंत
                   " एका घरात भांडी घासायचे काम मिळाले आहे. " जानकी
                  " मी तुम्हाला मदत केली तर चालेल का ?" दामोदरपंत.
                  " नको, अगोदरच तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली मी दबली आहे अजून एक उपकार केलात तर कोठून फेडू मी तसेही मी माझ्या छोट्याश्या जीवनात खुश आहे." जानकी असे म्हणाली आणि आनंदी चहा घेवून आली. चहापान झाले. जानकी महादेव ला घेवून बाहेर गेली.
                  " आई आपण कुठे चाललो आहोत ?" महादेव
                  " तुझ्या आवडत्या ठिकाणी नदीवर. " जानकी
                  " नदीवर  वा , " दामोदर खुश झाला त्याला नदीवरच्या काठावर बसून नदीत दगड मारायला खूप आवडायचे आज हि तो मनोमाक्त नदीच्या पत्रात दगड मारणार होता.
                  " महादेव  आता यापुढे कधी माझी आठवण झाली तर नदीवर ये मी तुला नदीवरच भेटेन." जानकी चालत चालत म्हणाली.
                  " मग मी रोज येईन नदीवर बाबा मला घेवून येतील." महादेव .
                  " बाबा कोण बाबा ? " जानकी थांबत म्हणाली.
                  " तेच ज्यांच्याकडे तू मला राहायला पाठवली आहेस." महादेव
                  " तुला त्यांना बाबा म्हणायला कोणी सांगितले ?" जानकी
                  " त्यांनीच " महादेव
                  " आणि आनंदीबाईना काय हक मारतोस?" जानकी
                  " मोठी आई " महादेव.
जानकीच्या डोळ्यात दामोदर पंतांच्या कुटुंबाने दाखवलेल्या उदार्तेबद्दल अश्रू आले.
                  " महादेव त्या दोघांचे मन दुखावेल असे काही करू नकोस " जानकी म्हणाली.
              महादेवला ती काय म्हणते आहे हे त्याला समजले नाही तो आज नदीवर आई सोबत मानामोक्त खेळला साधारण दुपारच्या वेळेस ती  महादेवला सोडायला परत निघाली. पण घराच्या काही अंतरावर आल्यावर ती थांबली साडीच्या पदरात ठेवलेले दोन पत्र काढून तिने महादेव च्या हातात दिले.
                 " पोरा हे पत्र दामोदर पंताना दे " जानकी
                 " आई तू नाही येत  घरी ." महादेव
                 " नाही , तू जा आणि लक्षात ठेव यापुढे कधी भेटायचे झाले तर नदीवर ये " जानकीच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या. तिने त्याला कडकडून मिठी मारली.  दामोदर घराकडे निघून गेला पण यावेळी ती तो घराकडे पोहचेल याची वाट पहात नाही बसली ती तडक निघाली तिने मनाशी काही कठोर निर्णय घेतले होते त्याची लगेचच अंबलबजावणी करायची होती.

भाग पहिला -आणि दुर्दैव ओढवले ......

           १८५७ ला म्हैसूरचा नवाब हैदर आली याचा मृत्यू झाला आमी त्याच्या जागी त्याचा शूर पुत्र टिपू आला टिपू गादिवर बसला आणि येथूनच हैद्राबाद सारख्या बहुसंख्य हिंदू असलेल्या संस्थानात हिंदुच्या दुर्दैवाला सुरुवात झाली टिपू गादिवर बसला आणि गादिवर बसल्यावर लगेचच   त्याने स्वत्ताला सुलतान घोषितकेल.. सुलतान बनताच आपले पहिले कर्तव्य म्हणजे जे मुसलमान नाही आहेत त्यांना बाटवून मुसलमान बनवणे जे विरोध करतील त्यांचे शिरकाण करणे त्याच्या बायकांवर ,अल्प वयीन मुलींवर बलात्कार करणे.हे काम टिपू आनंदाने करू लागला .त्यात त्याला राक्षशी आनंद मिळत होता.पण याची झळ मैसूर सारख्या बहुसंख्य हिंदू असणाऱ्या संस्थानाला लागली.४० वर्स्यापुर्वी मैसूरच्या एका छोट्याश्या  गावात दामोदर पंतांचे कुटुंब आले ते कुटुंब हि य आगीमध्ये होरपळले. 
                      दामोदरपंत हे एक कोकणस्थ ब्राह्मण होते. ते निष्णांत वैद्य होते. २५  वर्ष्यापुर्वी   म्हैसूर मधील एका सावकाराने  त्यांची कीर्ती ऐकून आपल्या मुलाच्या उपचारासाठी कोकणातून इथे आणले. मुलगा बरा झाल्यानंतर त्या सावकाराने त्यांना  राहायला घर बांधून दिले. गावातील गणपतीच्या मंदिरात पूजा करण्यासाठी त्यांची नेमणूक केली. इथेच त्यांना अंबाजी नावाचे गोंडस मुल झाले होते. दामोदरपंत यांना गावात खूप मान होता. लोक त्यांना कशाचीही कमी पडू देत नसत पण त्याचा फायदा त्यांनी कधी उचलला नाही. घराची परस्थिती बेताची होती. पिढीजात वैद्यगिरीवर त्यांचे घर चालत असे. पण त्यांनी कधी याकडे व्यवसाय म्हणून पहिले नाही. गावातील कित्तेक गरीब लोकांवर ते विनामुल्य उपचार करत असत. त्यंच्या अश्या धोरणामुळे बायको आनंदीबाई कधी कधी खूप रागावे. पण आपल्या नवऱ्याचे कार्यय किती थोर आहे याची तिला कल्पना होती म्हणून ती लटक्या रागाशिवाय काही करत नसे. 
                   अंबाजी आता वयात आला होता गेल्याच वर्षी त्यांनी त्याचा  लग्न बाजूच्या गावातील लक्ष्मी शि लावला होता. गावात कामधंदा नाही आणि अम्बजीला देवळातील पूजेत स्वारश्य नसल्याने तो पुण्याला एका सावकाराकडे कारकुनाच्या कामासाठी निघून गेला. दुसरा मुलगा महादेव मात्र तिथेच राहत होता. पण गेल्या सहा महिन्यापूर्वीच दामोदर पंतानी त्याला त्याचा कुटुंब घेवून वेगळे राहायला सांगितले होते.
                  महादेव हा त्यांना मुलगा नव्हता. २० वर्ष्यापुर्वी बाजूच्या  गावातील जोश्यांकडे सत्यनारायण सांगायला गेले होते. सत्यनारायणाची पूजा सांगताना बाहेर वरांड्यात एक ५ वर्षाचे मुल तक लाऊन ती पूजा ऐकत होते. एका ५ वर्षाचे मुल तन ,मन , लावून पूजा ऐकतो आहे हे पाहून त्यांना आश्यर्य झाले त्यांनी पूजा संपल्यावर त्या मुलाबद्दल जोश्यांकडे चौकशी केली. " कोणाचे आहे हो ते मुल ?"
         "बाजूला एक विधवा राहते जानकी काही वर्ष्यापुर्वी तिचे पती  निवर्तले. भिक्षा मागून जगते बिचारी तिचे आहे हे मुल मुलगा फार हुशार आहे " जोशी .
       " तो घरात का येत नाही ?"दामोदरपंत.
       " आमच्या श्रीमतीना त्याचा राग येतो, " जोशी.
        " त्या मुलाने काय केल आहे पण " दामोदरपंत .
       " अहो हा जन्मला आणि सहा महिन्यातच याचे वडील वारले आमच्या यांना वाटते कि या मुलगा अपशकुनी आहे याच्यामुळे आपल्या घरातही अपशकून होईल आणि बायाकांपुढे आपले काय चालते आहे होय." जोशी
 सारे कार्यक्रम संपले तसे दामोदरपंत जाऊ लागले. तसा बाजूच्या घरातून तो मुलगा धावत आला. मागोमाग त्याची आई आली. " याने भिक्षुकी शिकावी असे आमच्या यांची खूप इच्छा होती . ते निवर्तले आणि एक स्वप्नच होऊन राहिले आहे  , माझी तेवढी ऐपत नाही तुम्ही शिकवाल?" 
            " का नाही शिकवणार ? मी याला माझ्यासोबत घेवून गेलो तर चालेल तुम्हाला ?" दामोदरपंत .
           " ठीक आहे न्या तुम्ही त्याला ."
           " तुम्हाला केव्हाही भेटायची इच्छा झाली तर या घरी  मी याला भिक्षुकी शिकाविनच पण वैद्य कला हि शिकवीन ."
           " लई उपकार होतील तुमचे " ती हात जोडत म्हणाली.
           " उपकार करणारा मी कोण बाई सर्व ते सर्व वरच्याच्या हातात मी फक्त एक निम्मित आहे. नाव काय बाळा तुझे "
           " महादेव " क्षणाचाही विलंब न करता महादेव म्हणाला.
           " येणार माझ्यासोबत ?" दामोदरपंत.
           " हो " महादेव.
           " चला जानकीबाई मी येतो. तुम्हाला मुलाला भेटायची इच्छा झाली कि या घरी." दामोदरपंत निघून गेले जानकी ते दोघे नजरेआड होईपर्यंत पहात होती. एकुलत्या एक मुलाला दूर जाताना पाहून तिची घालमेल होत होती पण आपल्या पतीच्या इच्छे साठी तिने आपल्या पुत्र प्रेमाला मुरड घातली होती.
क्रमश ...............पुढील भाग उद्या