३०
तारखेची सकाळ. मला हॉस्पिटल मधून आईचा फोन आला "असशील तसा निघून ये!"
"का काय झाला ?" मी थोडे घाबरत विचारले.
"तू बाप झाला आहेस." आई.
"काय सांगतेस? मी तयार होवून येतो. मी गावाला फोन करून सांगतो." माझ्या मनात हर्ष मावत नवता.
पण पलीकडून आईचा आवाज थोडा गंभीर होता. "नको अगोदर हॉस्पिटल ला ये" "काय झाले?
सोनाली(माझी बायको) बरी आहे ना?" मी जरा काळजीत म्हणालो.
"हो ती बरी आहे.तुला दोन जुळी मुले झाली. एक मुलगा आणि एक मुलगी त्यातली मुलगी दगावली आहे " आई अटकळत बोलली. आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. जुळी मुल होती याची मला कल्पना होती पण असे काही होईल असे मला स्वप्नातही वाटले नवते.
मी माझे मन घट्ट केले.लगेचच हॉस्पिटल ला गेलो डॉक्टरांनी माझ्याकडून काही प्रोशिजार करून ते बाळ दाखवले काळजावर दगड ठेवून मी त्या मृत बाळाला पहिले. ते सुंदर गोंडस बाळ एका कुशीवर कायमचे झोपले होते गोरेपण शरीर,गोल चेहरा असे ते सुंदर बाळ एका कुशीवर झोपले होते. त्या बाळाला पाहून माझ्या मनाने तिला प्रश्न विचारले "का ग तुझा हा बाप तुला सुखात ठेवले असते कि नाही माहित नाही पण दोन वेळचे जेवण तुला आपल्या पोटाला चिमटा काढून नक्की दिले असते. मला सोडून जायचे अगोदर मला एक संधी तरी द्यायची होतीस. मला माझ्या घरी तुझ्या पावलाने झाशीची राणी हवी होती माझ्या बाळा" आणि माझ्या गालावरून दोन अश्रू आपोआप खाली पडले. मला दाखवल्या नंतर नर्स नी ते कोवळे बाळ सफेद कापडात गुंडाळले आणि मला देण्यासाठी पुढे केले क्षणभर वाटले, तिला जवळ घ्यावे प्रेमाने कवटाळावे पण पुढे गेलेले हातात कापरे भरले. मी माझे हात मागे घेतले आणि माझ्या सासर्याना तिला घ्यायला सांगितले. त्यांना माझी दुविधा कळली असावी. त्यांनी तिला दोन हातावर घेतले आणि आम्ही हॉस्पिटलची इमारत सोडून खाली रस्त्यावर आलो पण कोणताही रिक्षावाला स्मशान भूमीकडे जाण्यास तयार होई ना एक रिक्षावाला थांबला त्याने आम्हास स्मशान भूमी कडे नेले पण रिक्षाचा भाडे देण्याचा प्रयत्न करताच त्याने घेण्यास नकार दिला.
ज्या प्रशांत ने आयुष्यात कधी स्मशान भूमीची पायरी चढली नवती त्याला आपल्याच काळजाच्या तुकड्याला स्मशानात दफन करायला जावे लागत होते. २६ व्या वर्षी देवाने माझी परीक्षा पहिली होती. आज हि त्या गोंडस तुकड्याची आठवण मला येते.असा एक हि दिवस माझा जात नाही तिची आठवण आल्या शिवाय 'कठोर वाटणारा प्रत्तेक बाप मनाने माझ्यासारखा हलवा असतो का हो?'मला माफ करा माझे दुख सांगून मला तुम्हाला नक्की दुखी नाही करायचे आहे पण आपले दुख वाटल्याने थोडे हलके होते असे म्हणतात म्हणून तुमच्या सारक्या मित्रांना थोडा त्रास देत आहे.