Saturday, 10 September 2011

अम्या.......

मी कोई मिल गया हा चित्रपट पहिला एका मतिमंद मुलावर होणारे प्रत्तेक प्रसंग त्यात दाखवले आहेत हा चित्रपट पाहून मला आमच्या गावातील अम्या आठवला.
        नाव अमरीश पण गावातील सारे लोक त्याला अम्या म्हणतात लहानपसुनच मतिमंद असल्याने प्रत्तेक जन त्याची चेष्ठा करण्याची कोणतीही संधी सोडत नसत. तसा तो माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा तो हि प्राथमिक शाळेत जायचा पण मतिमंद  असल्याने त्याला पुढच्या वर्गात टाकले जायचे नाही. मला तो शाळेत ४ थी च्या वर्गात असताना संपर्कात आला.या वर्गात मला वाटते तो ३/४ वर्ष होता सर्वात शेवटला कोपऱ्यात बसायचा.
       या अम्याला सारे पाढे पाठ .शाळेची प्रार्थना तोंड पाठ . पण कोई मिल गया या चित्रपटात त्या मतिमंद हिरोचे खूप मित्र दाखवले आहेत. पण अम्याला  कोणी मित्र नव्हताच. त्याला वर्गातील सारे व्हिलन समजायचे कोणालाही त्याला मारायचा चान्स मिळाला कि कुणीही सोडायचा नाही.एक गुरुजी सोडले तर कुणीही त्याला प्रेमाने समजून घेणारा नव्हता.
       असेच एकदा काय झाले हि घटना मला आठवत नाही आहे पण मला अचानक राग आला आणी मी पट्टी घेऊन अम्याच्या मांडीवर जोरात मारली. 'फट' करून जोरात आवाज आला सारा वर्ग अचानक शांत झाला आणि अम्या जोराने रडायला लागला तो खूप वेळ आपली मांडी जोराने पकडून कळवळत होता सारा वर्ग त्याला हसत होता कोणी म्हणत होता "असेच मारायला पाहिजे त्याला."मीही माझा राग त्याच्यावर काढला म्हणून खुश होतो.अचानक गुरुजी आले अम्या रडतच होता.गुरुजींनी त्याला विचारले अम्या काय झाले ?अम्या अजूनही आपली मांडी चोळत होता.मला वाटले आता माझा काही खरे नाही आज गुरुजी मला खूप मरतील किव्हा वर्गाच्या बाहेर अंगठे पकडून उभे करतील मी माझ्या मनाची तयारी केली शिक्षा भोगण्याची पण पुढे जे झाले ते पाहून पहिला मला विश्वासच बसले नाही.
अम्याने पाणावलेल्या डोळ्यांनी गुरुजींकडे पहिले नंतर माझ्याकडे आणि म्हणाला "काही नाही गुरुजी ,मी पडलो." त्याने हे उत्तर देताच साऱ्या वर्गातील मुले त्याच्याकडे पाहू लागली माझी मान आपोआप खाली गेली.त्यानंतर माझ्या मानात खूप आदर वाढला मी घरी येवून खूप रडलो.आजोबांनी मला विचारले मी शाळेत घडलेली गोष्ठ सांगितली त्यांना हि वाईट वाटले मला म्हणाले "पोरा आपण केलेली वाईट गोष्ट काही काळाने समोरचा माणूस विसरूनही जातो. मोठ्या मानाने माफ हि करतो. पण आपण आयुष्यभर त्यासाठी पश्चाताप करत बसतो आणि पश्त्याताप हि देवाने केलेली शिक्षा असते जी माणसाला दीर्घ काल भोगावी लागते."
       मी त्या वेळी खूप लहान होतो त्यामुळे आजोबा जे बोलले ते मला त्यावेळी लक्ष्यात नाही आले. पण तो अम्या ने  माझा नाव गुरुजींना का सांगितला नाही या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळाले नाही मी खूप वेळा विचारले त्याला पण तो मतिमंद असल्याने त्याने मला एवडेच उत्तर दिले "शिगवण तू माझा दोस्त आहेस ना म्हणून मी गुरुजींना नाही सांगितले." प्रसंग आठवला कि आजही मी रडतो.
खरच पाच्याताप करणे हि देवाने दिलेली मला शिक्षा आहे.

3 comments:

  1. वरील घटना माझ्या जीवनात घडलेली सत्य घटना आहे.

    ReplyDelete
  2. kharach hruday helavun takle. aplyakde ata hi ase khup jan ahet je durbalanna tras det astat... ani tyanni nakkich he vachle pahije.. tu tyaveli lahan hotas pan te lok ata lahan nahit..

    ReplyDelete
  3. अतिशय हृदयस्पर्शी......

    ReplyDelete