Tuesday 15 May 2012

पान नंबर १७ वरून पुढे ......................................

" थांब महादेव, तरीही तू या घरात परत यायचे नाहीस !" दामोदरपंत त्याला थांबवत म्हणतात.
"म्हणजे अजूनही तुमचा माझ्यावरचा राग गेला नाही आहे ना?" महादेव.
" नाही पोरा, माझ्या काही अपेक्षा आहेत तुझ्याकडून आपल्या गणपतीच्या मंदिराच्या पुजेची सारी सूत्रे आता तुला सांभाळायची आहेत आणि तू जर परत या घरात आलास तर तुही बाटगा आहेस असे सारे गाववाले म्हणतील आणि तुला देवळात पूजा करून दिली जाणार नाही या दामोदर पंताने सांभाळलेला वारसा तुला पुढे न्यायाचा आहे." दामोदरपंत आपल्या डोळ्यातील पाणी पुसत बोलतात.
" बाबा तुम्हाला विसरणे अशक्य आहे तुम्हाला विसरणे म्हणजे विठ्ठलाच्या भक्तांच्या मन मानी साठी विठ्ठलाला विसरणे आणि हे कसे शक्य आहे?" महादेव
" पण हि या विठ्ठलाची इच्छा आहे असे समज"दामोदरपंत.
महादेव काही न बोलता निघून जातो. बाहेर जाताना त्याच्या मनात विचार येतो लहानपणी आपले वडील कसे होते ते आपण पहिले नाही आपली आई आपल्याला इथे सोडून निघून गेली. पण आईचे छत्र हरवले असे कधी वाटले नाही. पण आज खरोखर आई वडील हरवल्यासारखे वाटू लागले. इकडे गावात हळू हळू लोक परत येवू लागली. कोणाची जनावरे दावणीला बांधलेल्या अवस्थेतच कापली होती त्यांची सडून दुर्गंधी येत होती. गावात दर 10 पावलांवर  माणसांचा किवा जनावरांचे मृत शरीरे पाहायला मिळत होती. महादेव रस्त्याने घराकडे चालू लागतो. अचानक त्याला काही लोक नदीच्या पलीकडे जाण्यासाठी जमा झालेले आढळतात. एकाला  ते कुठे चालले आहेत हे समजण्यासाठी त्यातल्या एकाला हाक मारतो.
" काय रे यशवंत कुठे चाललात ?" महादेव
" काय सांगू नशिबाचे भोग पारवा बातावाबातावी झाली मी आणि माझी साव्भाग्यावती  तावडीत सापडली. मला बतावली आणि तिला ओढून नेली त्या राक्षसांनी.
आज बापान घर बाहेर काढली. म्हणे तू इथ राहिलास तर आम्हालाही गावातील लोक बाटगे म्हणतील . आज समाजाला टिपू सुलतानांनी नदी पलीकडे रहायची आणि खायची व्यवस्था केली आहे म्हणून चाललो आहे " यशवंत बोलत असताच त्याच्या डोळ्यातील आसवे टपकन खाली पडली.
क्रमश..........................

Sunday 22 April 2012

पान नंबर १५ वरून पुढे ................

"पण महादेव असा काही करेल यावर माझा अजिबात विस्वास बसत नाही ." आनंदीबाई.
" या हाताने अग्नी द्यायचे  सोडून मुठ माती देवून आलो आहे आनंदीबाई, आणि याला फक्त आणि फक्त जबाबदार महादेव आहे." दामोदरपंत हताश होऊन खाटेवर बसतात आनंदीबाई त्यांचे सात्वन करू लागतात इतक्यात दारावर टक- टक होते. आनंदीबाई डोळ्यातील अश्रू पुसून कोण आहे म्हणून विचारतात
" आई मी महादेव दरवाजा खोल आई "
आनंदीबाई दरवाजा खोलायला निघतात इतक्यात दामोदरपंत त्यांना थांबवतात.
"आता कशाला आला आहे अजून काय शिल्लक राहिले आहे का?" दामोदरपंत.
" बाबा ,अगोदर दरवाजा उघडा मी सांगतो सगळे." महादेव बाहेरून विनवू लागतो.
" तू काय सांगणार आहेस हे मला पक्के ठावूक आहे आता तू इथे आम्हाला आमच्या हालावर ठेवून निघून गेलास तर खूप उपकार होतील." दामोदरपंत
" अहो पण तो काय म्हणतो आहे ते एकून तर घेवू या " आनंदीबाई विनवणी करतात.
" आम्हाला नदीवर खूप ऐकवला आता तुम्हाला ऐकायची इच्छा असेल तर जरूर ऐका."
" बाबा, कृपा करून दरवाजा उघडा मला तुमच्याशी बोलायचे आहे." महादेव विनंती करू लागतो.
" अहो उघडा  ना कदाचित त्याला महात्व्हाचे बोलायचे असेल."आनंदीबाई .
" उघडा दरवाजा पण शेवटचा या पुढे त्याला या हाराचे दरवाजा बंद असेल ." दामोदरपंत परवानगी तर देतात पण दरवाजाकडे पाठ फिरवतात आनंदी बाई दरवाजा उघडतात महादेव केळीच्या पानात जेवणाची झाकलेली दोन ताटे घेवून आत येतो. ताटे khali कोपर्यात ठेवून पाठमोऱ्या दामोदार्पन्तांचे आणि आनंदी बाईंचे पाया पडतो.

" बाबा , मला माहित आहे आज तुम्ही माझ्यावर रागावला असाल आणि आज झालेल्या प्रकाराबद्दल तुम्ही मला कधीच माफ करणार नाही. पण प्रत्तेक आरोपीला आपली बाजू मांडण्याचा दरबारात अधिकार असतो मीही माझी बाजू मांडतो कदाचित तुम्ही मला माफ करालाही. काल  झालेला प्रकार मला समाजाला तसा मी लगेचच परत निघालो रस्त्यात आपल्या घराची परस्थिती समजली मला माहित होते काळाच्या दिवशी तुम्ही दोघांनी काही खाल्ले नसेल म्हणून पहिला शेतावरच्या घरात जाऊन मऊ भात बनवला पण इतक्यात लोक नदीच्या दिशेने धाव पळ करत असल्याचे समजले रस्त्यातून जाणाऱ्या मोरोपंतांची भेट घडली त्यांनी सांगितले तुम्ही म्हणे नदीवर अधर्म करायला जात आहात तुम्हाला रोखण्यासाठी ते भट वाडीतील काही ब्राम्हणांना घेवून तुम्हाला दगडाने मारण्यासाठी जात आहे असे सांगितले जर मी तुम्हला रोखले नसते तर सार्या ब्राम्हणांनी तुम्हाला दगडाने ठेचून मारले आसते आणि हे drushya मी कसे पाहू शकलो असतो बाबा ? वाहिनी तर या जगातून निघून गेली होती पण तुम्ही मला हवे होतात लहानपणी सक्ख्या बापाला गमावली होती आता परत त्याचे दुक्ख नाही आहे पण ज्याने पाळले पोसले ज्याची जागा माझ्या ह्रिदयात देवाची आहे त्याचे मृत्यू हे डोळे कसे काय पाहू शकतात बाबा ?"

"मी तुम्हाला म्हटले होते ना आपला महादेव असे करूच शकत नाही " आनंदीबाई महादेवच्या तोंडावर हात फिरवत म्हणतात.

" निघतो बाबा संध्याकाळी परत येईन सोबत जेवण घेवून आलो आहे कृपया जेवून घ्यावे आणि परस्थितीला तिच्या हालावर सोडा कारण प्रत्येक दुख नंतर सुख ह येतातच म्हणून माणसाने सुखाची अपेक्षा न करता दुक्खाचा सामना करावा असे तुम्हीच मला सांगितले होते ना?" असे म्हणून महादेव जाऊ लागतो
क्रमश .......................................

Thursday 5 April 2012

पान नं १४ वरून पुढे ..................

             सकाळी दामोदर पंत उठतात अचानक आपले  कोपर्यात ठेवलेली काठी उचलून बाहेर जाऊ लागतात आनंदी बाई ते पाहतात आनंदी बाईना माहित असते कि कुठे लांबचा प्रवासासाठी दामोदरपंत चालले आहेत नाहीतर ते कधी काठी वापरत नाहीत. अंगणात पायरीच्या खाली ठेवलेले कोल्हापुरी चप्पल पायात सरकवतात एवढ्यात आनंदी बाई त्यांना थांबवतात.
        " कुठे चाललात ? "
        " सून बाईंच्या गावी जावून येतो पाहतो पोर व्यवस्थित घरी पोचली कि नाही. " दामोदरपंत असे म्हणून निघतात.
      " लवकर या मला एकटीला घर खायला उठेल नाहीतर." आनंदीबाई.
      " हो सून बीची खुशाली पाहून लगेचच घराचा रस्ता पकडेन कारण आता आपण धर्म भ्रष्ट  पाणीही मिळणार नाही त्या घरात ."दामोदरपंत असे म्हणतात आणि आनंदी बाईंच्या डोळ्यातील अश्रू टपकन गालावर ओघळतात.
     " अहो आता आपल्या काळजावर दगड ठेवायला लागणार आहे अजून खूप काही सहन करायचे डोळे पुसा आता "
               दामोदरपंत निघून जातात.  दुपार निघून जाते संध्याकाळचे वेध लागतात पण दामोदरपंत परत येत नाहीत. आता मात्र आनंदी बाई चा धीर सुटू लागतो आत्ता पर्यंत तर दामोदरपंत परत यायला हवे होते  आनंदी बाई घरातून अंगणाकडे फेर्या मारून दामोदार्पन्तांची वाट पाहू लागतात अचानक दामोदरपंत येतात त्यांना पाहून आनंदी बाईंचे जीव भांड्यात पडतो.
      " भेटली सून बाई ?  कशी आहे व्यवस्थित घरी पोचली आहे ना ?" आनंदी बाई दोन वेळा विचारतात पण दामोदर पंतांच्या तोंडातून कोणतेच वाक्य निघत नाही ते सरळ अंगणात चप्पल काढून घरात प्रवेश करतात अंगातील सदरा काढून खुंटीवर टांगतात. सुम्भाने विणलेल्या बादाल्यावर बसतात आनंदीबाई स्वयंपाक घरात जाऊन पाणी घेवून येतात पाण्याने भरलेला गाडगा दामोदरपंतांच्या हातात देवून परत विचारतात
     " सुनबाई मिळाली का ?" पाण्याचा एक घोट घेत ते तांब्या जमिनीवर ठेवतात.
     "हा प्रश्न तुम्ही नाही विचारलात तर बरे होईल आणि ऐकायचे असेल तर काळजावर दगड ठेवा मग सांगतो. दामोदरपंत
   " माझे मन मी कधीच मारले आहे आता फक्त त्या जागी दगड भरला आहे ज्याच्यावर कसलाच परिणाम होणार नाही काय घडले ते व्यवस्तीत सांगा.
   " हो मिळाली , पण तिच्या माहेरी नव्हे कृष्णेच्या काठावर निर्वस्त्र  पडली होती ज्या वयात मुलांचे संसार पाहायचे होते त्या वयात नको ते पाहायला लागले." दामोदरपंत .
     " काय झाले ते व्यवस्तीत सांगाल का ?" आनंदीबाई.
     " सकाळी मी सून बाईंच्या गावी निघालो पण वाटले असे पारवसे सोयार्यांकडे जाने योग्य नाही नदीवर आंघोळ करून जावे म्हणून नदीच्या मार्गाकडे वळलो नदीवर गेलो तर सगळीकडे मुर्दे पडले होते कोल्ही कुत्री  मेलेल्या माणसाचा मांस ओरबाडून खात होती. उबळ यावी असे दृश्य होते. नदीच्या काठी मुर्द्यांचा खच पडला होता. आपला शील भ्रष्ट होऊ नये म्हणून हजारो स्त्रियांनी नदीचे उदार जवळ केले होते. अचानक माझी नजर एका स्त्रीच्या मृत देहाकडे गेली अंगावर एकही वस्त्र नवते ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून आपली सुनबाई होती. माझ्या अंगावरचे उपरणे काढून मी ते तिच्या अंगावर घातले. आणि मृत देहाला अग्नी देण्यासाठी लाकडांचा बंदोबस्त करण्यासाठी गावात सदुकडे आलो मी लाकडे घेवून नदीवर अंतिम क्रियेची तयारी करताच होतो इतक्यात आपला त्याला विरोध करायला गावकर्यांना घेवून आपला महादेव आला."दामोदर पंत .
" आपला महादेव ....?"
" हो आपला महादेव . " दामोदरपंत .
"नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल आपला महादेव असे नाही करू शकत." आनंदी बाई.
" आनंदीबाई गैरसमज दुसर्यांनी सांगितल्यावर होतो आपल्या डोळ्यांनी पाहिलेली घटना आणि कानांनी ऐकलेल्या घटना खर्या असतात." दामोदरपंत
" मला नाही वाटत तो महादेव असेल तो माझा मुलगा नसला म्हणून काय झाले त्याला मी माझ्या पोटाच्या मुलाप्रमाणे वाढवले आहे.एक वेळ अम्बजीवर विश्वास नाही ठेवणार पण महादेव असे अरेल असे म्हणाल तर मला नाही पटत. " आनंदीबाई .
" तुम्हाला तुमच्या नवऱ्यावर विश्वास आहे ना?" दामोदरपंत.
क्रमश ...............................

Friday 30 March 2012

पान नं १३ वरून पुढे...........................

              दामोदर पंत गावात येतात पण रोज गजबजलेले गाव आज सुनसान वाटत होते. जागो- जागी घरे जाळली गेली होती. गावात कुठे कुत्रेही दिसत नव्हते. दिसत होती फक्त प्रेते. माणसांची आणि जनावरांची पण कोणाही ओळखू येत नव्हते. कारण कुणाच्याही धडावर मस्तक शिल्लक नव्हते. असह्य माणसांचे शीर कापून ते नराधम कधीच निघून गेले होते. एका झोपडीतून दामोदर पंताना एका स्त्रीचे रडणे ऐकू येत होते. पण पुढे जाऊन तिची विचार पूस करायची हिम्मत होत नव्हती. दामोदरपंत तडक मंदिरात जातात मंदिर एकदम व्यवस्तीत आहे हे पाहून त्यांना थोडे बरे वाटते ते मंदिराच्या पायऱ्या चढणार इतक्यात त्यांना आपला धर्म भ्रष्ट झाले आहे त्यामुळे देव हि बाटेल हा विचार मनात येतो अगोदर आपण आपली शुद्धी करून घेवू मग मंदिरात जावू असे ठरवतात.दामोदर पंत आपल्या शेतावर असलेल्या महादेव च्या घराकडे निघतात त्यांना माहित असते महादेव आणि सुनबाई नाही आहेत पण घर व्यवस्तीत आहे ना ते पाहू या म्हणून तिकडे निघतात. महादेव चे  घर व्यवस्तीत आहे हे पाहून त्यांचा जीव भांड्यात पडतो.
           दामोदरपंत घराकडे परत फिरतात. गावातील साऱ्या लोकांचे संसार उद्वस्थ झाले होते. जे जंगलात पळाले ते वाचले पण सारे नशीबवान नव्हते अनेक हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले एवढे होऊनही थाबले नाही त्यांना पकडून बंदी बनवून टिपू च्या कुंटणखाण्यात बंदिस्त करण्यात आले यातून नाबालिक मुली सुद्धा सुटल्या नाहीत. गोठ्यात बांधलेली जनावावरांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. गावाचा तो नजरा पाहून दामोदर पंताना काय करावे तेच समाजात नव्हते. पण गावातील ती सारी परस्थिती त्यांनी घरी येवून आनंदी बाईना सांगितली. रात्री कोणीही जेवले नाही  रात्रभर आनंदीबाई गप्प बसल्या होत्या त्यांना महित होते जर आपण रडलो तर दामोदर पंतानाचा आत्मविश्वास डगमगेल रात्री त्यांचा डोळा कधी लागला ते त्यांनाच समजले नाही.
              दुसऱ्या दिवशी आपल्या गावावर आलेल्या संकटाची बातमी महादेव ला समजते तो तडक गावाकडे निघतो. आपल्या परिवाराला कोणतीही इजा होऊ नये म्हणून वाटेत येत असताना तो देवाकडे प्रार्थना करत असतो. वाटेत त्याला गावातला विठ्ठल भेटतो. घडलेली हकीगत सविस्तर सांगतो. दामोदरपंत आणि आनंदीबाई व्यवस्तीत आहेत हे ऐकून त्याला बरे वाटते पण त्यांचा धर्म भ्रष्ट झाला आहे हे ऐकून तो तिथेच मटकन खाली बसतो. थोड्या वेळाने तो परत गावाची वाट पकडतो.
क्रमश ...............

Tuesday 20 March 2012

पान नं १२ वरून पुढे...........................

        " आज पासून तुम्ही मुसलमान झालात वैद्य मिया| " अब्दुल हसत म्हणतो.
        " गोमांस खाल्ले म्हणजे मुसलमान झालो असे कोणी सांगितले अब्दुल?" दामोदरपंत.
        " मुसलमान झाला नसाल पण लवकरच होणार आहात." अब्दुल.
        " कश्यावरून मी मुसलमान होईन? मी हिंदू आहे आणि हिंदूच राहीन."दामोदरपंत.
        " अहो वैद्यजी जरी असे तुम्ही मानता.  पण मला सांगा तुमचेच हिंदू बांधव परत तुम्हाला आपल्या धर्मात घेतील का. आता तुमचा धर्म संपला तुम्ही धर्म भ्रष्ट आहात...... धर्म भ्रष्ट! आणि धर्म भ्रष्टला हिंदू धर्माची दारे  बंद असतात हे तुम्हाला चांगलेच माहित आहे वैध मिया| " अब्दुल.
         " या गलत फैमित राहू नकोस अब्दुल तुला माहित नसेल शिवाजी महाराज्यानी नेताजी पालकरांना शुद्ध करून परत धर्मात घेतले होते." दामोदरपंत.
         " शिवाजी महाराज वा चांगला दाखला दिलात पण त्याच शिवाजी महाराज्याच्या राज्याभिषेकाला तुमच्याच ब्राम्हणांनी विरोध केला होता हे विसरलात वैद्यजी " अब्दुल हसत म्हणतो.
         " साऱ्या ब्राम्हणांनी नाही कर्मठ ब्राम्हणांनी अब्दुल !" दामोदरपंत.
         " मग आता पाहू चांगले ब्राह्मण तुम्हाला परत हिंदू धर्मात घेतात का ते "अब्दुल.
         " पहात रहा अब्दुल मी तुला परत हिंदू धर्मात जाऊन दाखवतोच." दामोदर पंत
         " असे करताना तुमचा मृत शरीर नदीच्या पत्रात मिळूदे नको म्हणजे झाले . आणि असे करण्यात तुम्ही यशस्वी झालात तर मी स्वत्त हिंदू धर्म स्वीकारेन." अब्दुल.
        "बाकी परिवार किधर है इसका" एक  सैनिक विचारतो.
        " अरे बात करते वक्त ये तो याद हि नाही राहा. सारा घर कि तलाशी लो| " अब्दुल हुकुम देतो बाकीचे शिपाई घर शोधू लागतात आतल्या खोलीत आनंदीबाई भेटतात दोन  सैनिक तिला पकडून माजघरात घेवून येतात. तिला पाहून दामोदरपंतांच्या कपाळाला आट्या पडतात ते मनातच म्हणतात संपले सारे आता. शिपाई तिलाही गोमांस भरवतात. थोडा वेळ शोधा शोध करून सारे नराधम निघून जातात. दामोदरपंत तिथेच कोपऱ्यात बसतात.
         " तुम्हाला मागच्या दाराने जायला सांगितले होते ना?" दामोदरपंत.
         " तुम्हाला अश्या अवस्थेत सोडून कशी जाऊ शकते?" आनंदीबाई .
        " चला , घर सफ करा गावात कोणालाही काही समजून देवू नका. काही झालेले नाही आहे. मी थोडे बाहेर पाहून येतो. गावात नक्की काय परस्थिती आहे ते पाहून येतो." दामोदर पंत असे म्हणून बाहेर पडतात. तोंडात गोमासाची तुरट चव अजूनही जात नसते. मनात आत्महत्येचा विचार येतो पण मुलांच्या विचाराने ते लांबवतात. आपण बाटलो असलो म्हणून काय झाले मुले तर  धर्मात आहेत. आता ती आपल्या पायावर उभी आहेत आपल्याला  आता मुलांसाठी नाही आपल्या सहचारणी आपल्या बायकोसाठी जगायचे आहे कारण आपल्याशिवाय ती अजिबात जगणार नाही
क्रमश .........................
        
 

Friday 16 March 2012

पान नं ११ वरून पुढे...........................

                                                           आभाळ कोसळते.
          ( वाचकांना विनंती आहे कि या कादंबरीचा उद्देश कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा अजिबात उद्देश नाही हे परत सांगतो आहे त्या काळी कोणत्या परस्तीतीत ओढवली होती आणि आपल्या हिंदू लोकांनी कोणती चूक केली ज्याची फळे आज हि आपण भोगत आहोत हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे. अश्या चुका आपल्या हातून परत होऊ नयेत हाच या कादंबरीचा मुळ उद्देश आहे )
सकाळी सकाळी दामोदरपंत मंदिरातील गणपतीच्या पूजेसाठी तयारी करत असतात. अनुराधा सात महिन्याची गरोदर असते. तिला बाळंतपणाला तिचे आई वडील घेवून जातात. सोबत १-२ दिवस महादेव ने हि यावे असे तिच्या वडिलांना वाटत असते. ते त्याला आपले मनोगत सांगतात मग महादेव हि त्यांचे मन नाही मोडत. अंगणात लक्ष्मी सडा काढत असते अचानक ती समोर काहीतरी पाहते आणि धावत घराच्या आतमध्ये जाते दरवाज्याचे अडसर लावते आणि जोरात दामोदार्पन्ताना हाक मारते.  काय झाले हे पाहायला दामोदर पंत आणि आनंदीबाई माजघरात येतात.
      " काय झाले पोरी ?" दामोदरपंत.
      " बाबा, बाहेर सुलतानाचे शिपाई आलेत त्यांच्या हातात गाईचे कापलेले मुंडके आहे." लक्ष्मी घाबरून सांगते.
     " काय?" आनंदीबाई.
     " हो आई, आणि हातात तलवारी आहेत ते मला पाहून आपल्या घराकडे धावले. आई- बाबा काहीतरी अपशकून होणार आहे." लक्ष्मी.
     " आनंदी तुम्ही सुनबाई ला घेवून निघा मागच्या दरवाज्याने मी पाहतो." दामोदर.
     " अहो, तुम्हीही चला ना ." आनंदीबाई.
     " माझे ऐका सून बाईला घेवून निघा नाहीतर सुनबाई चे काही बरे वाईट झाले तर अम्बजीला काय जवाब देणार आहात " दामोदरपंत.
    " बाबा तुम्हीहि चला ना !" लक्ष्मी.
    " पोरी तुम्ही दोघी निघा. जर आपण तिघेही पळालो तर पकडले जाऊ तुम्ही पळा मी त्यांना इथे काही काळ थांबवून ठेवतो." दामोदरपंत तिला समजावतात.आणि दरवाज्यावर टक टक होते बहिरून आवाज येतो
     " हम सुलतान के शिपाई है दरवाजा खोलो नाही तो तोड देंगे , और अंदर किसीको जिंदा नाही छोडेंगे "
     " पळा लवकर मी तुमच्या दोघींच्या पाया पडतो." दामोदरपंत विनवणी करतात. आता यांना समजावून काही उपयोग नाही हे समजून आनंदीबाई लक्ष्मी ला घेवून मागच्या दाराने पळतात. येवढा वेळ कोणी दरवाजा खोलत नाही म्हणून बाहेर असणारे शिपाई कमकुवत दरवाजा एका फटक्यात तोडतात. बाहेरून २०-२५ सैनिक नंग्या तलवारी घेवून आत घुसतात. काही सैनिकांच्या हातात चामड्याच्या पिशव्या असतात एक -दोन सैनिकांकडे गाईची ताजी कापलेली मुंडकी असतात.
         आत येणारा त्यांचा म्होरक्या दामोदार्पन्ताना पाहून साऱ्यांना थांबवतो.
           " अरे ये तो वैद्यजी है ,"
          " काय झाले आणि तुम्ही लोक हे सारे .........." दामोदरपंत त्यांच्याकडे भेदरून विचारतात.
         " काही नाही वैद्याजी आज खूप आनंदाचा दिवस आहे काल आमचे युवराज टिपू गादिवर बसले आणि त्यांनी घोषणा केली कि सारे हैद्राबाद संस्थान को मुसलमान करेंगे. हमारे राज्य के हित के लिये आपको मुसलमान बनना पडेगा वैध्यजी" त्यांचा म्होरक्या सांगतो इतक्यात एक सानिक ओरडतो. " इसे मार डालो सर् कलम करो इसका ."
        " खामोश .अगर ये मुसलमान बनने के लिये राजी है तो हम छोड देंगे|" म्होरक्या ओरडतो.
        " पर ये बुढ्ढा हमारे किस काम का ये हमारे इस्लाम बढानेके कोई काम नाही आयेगा इसकी उमर हो चुकी है आप को मालूम है ना सुलतान ने हमे एक सर् कलम करनेके बदलेमे ५ रुपयेका इनाम राखा है|" दुसरा शिपाई म्हणतो.
       " ये हमारे काम आयेंगे, ये बहुत बडे वैद्य है , और अच्चे वैद्य कि इस्लाम को जरुरत है मिया " म्होरक्या म्हणतो.
       " पण मी मुसलमान नाही बनणार ." दामोदरपंत रागाने म्हणतात आणि साऱ्या सैनिकांमधून अल्ला हो अकबरच्या घोषणा दम-दुमतात सारे शिपाई मारायला धावतात पण म्होरक्या त्यांना थांबवतो.
       " हे पहा वैद्य जी एके काही वर्ष्यापुर्वी तुम्ही माझे जीव वाचवले होतेत त्यामुळे अजून पर्यंत मी थांबलो आहे. नाहीतर अजूनपर्यंत तुमचे मुंडके धडावेगळे केले असते. इस्लाम कहता है कोई अगर तुम्हारी जान बचाये तो एक बार उसको माफ करके उसकी जान बक्ष दो  इसलिये मै आपको मारना नाही चाहता|" म्होरक्या.
      " अब्दुल एक वेळ जेव्हा मी कुणावर उपचार करतो ते अजिबात विसरत नाही आणि कुणी उपकार केले तर तेही अजिबात विसरत नाही. पण तुला मी केलेले उपकार दिसले पण त्या मुक्या जनावरांनी केलेले उपकार नाही दिसले ज्या गाईंचे तुम्ही मुंडके छाटले आहे त्या गाईच्या कुलाने कधीतरी तुला दुध पाजले असेल त्या गाईच्या कुळातील गाईने पाडसाला जन्मह दिला असेल जे पाडस मोठे होवून नांगर ओढून तुला दोन वेळेचे जेवण देते त्या गाईचे उपकार विसरून तिची तुम्ही कत्तल करता इस्लाम च्या नावावर तुमच्या देवा विषयी मला जास्त माहिती नाही पण  तो हि साक्षात खाली आला तरी तुमचे हे कृत्य पाहून लाजेने मान खाली घालेल." दामोदरपंत आपल्या डोळ्यातील आसू पुसत बोलतात.
      " और एक लब्ज बी जादा निकाला तो जबान काट के कुत्तेको खिला दुंगा|" अब्दुल रागाने बोलतो. साऱ्या घरात शांतता पसरते " देख क्या रहे हो इसको गो मांस खिला दो." अब्दुल हुकुम देतो.
      "या पेक्षा मला मारून टाका ." दामोदरपंतअसे म्हणतात पण त्या अगोदर २-३ सैनिक त्यांना पकडतात एक सैनिक कातडी पिसावितील गोमांस काढून दामोदर पंतांच्या तोंडात घालतो. उग्रस तुरट चव जिभेला लागते दामोदरपंत उलटी  करतात.
क्रमश...........................
       

Saturday 10 March 2012

पान नं १० वरून पुढे...........................

          " आई आज याने माझ्या कानाखाली मारली. या अश्रीताची आता इथपर्यंत मजल गेली आहे."अंबाजी.
          " अंबाजी तोंड सांभाळून बोल." आनंदीबाई रागाने म्हणतात.
          " हो बरोबर आहे आता हा आश्रीत नाही आहे मी आश्रीत आहे या घरात. ठीक आहे आज संध्याकाळ पर्यंत हा राहील या घरात किवा मी जर तुला वाटत असेल मी या घरात राहावे तर आज संध्याकाल्पर्यात  हा या घरातून निघून गेला पाहिजे नाहीतर या घरात मी परत कधीच पाऊल ठेवणार नाही सांगून ठेवतो." असे म्हणून अंबाजी बाहेर निघून जातो.
          " काय करावे अश्या अवगुणी पोराचे तेच समजात नाही. " असे म्हणून आनंदीबाई सुद्धा आतमध्ये जातात.
          " चला अनुराधा बाई आपल्याला आता निघायची तयारी करायची आहे." महादेव.
          " कुठे?" अनुराधा आश्चर्याने विचारते.
          " या घरात आज आपला शेवटचा दिवस . माझ्यामुळे अम्बजीला वाटते कि त्याचे हक्क मला मिळतात आणि त्याचे वाईट व्यसनांकडे वळण्याचे कारणही तेच आहे. जर आपण इथे राहिलो तर तो अजून वाईट व्यसनांच्या आहारी जाईल . .... चला तयारी करा. " महादेव.
         " पण कुठे जायचे? " अनुराधा.
         " बाजूच्या गावात माझे घर आहे पडक्या अवस्थेत आज तेथे जावून साधी झोपडी बांधू आणि नंतर सावकाश पक्के घर बांधू ." महादेव.
               दुपारची वेळ असते दामोदरपंत देवळातून जेवायला घरी येतात. दुपारी सारे जेवायला बसतात. महादेव आपण घर सोडून जात आहोत याची त्यांना कल्पना देतो.
         " मला न विचारता निर्णय घेतलास पण माझ्या स्वप्नांचे काय?" दामोदरपंत जेवता जेवता विचारतात.
         " बाबा तुमचे कोणतेही स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी वाट्टेल त्या प्रकारची  किंमत द्यायला तयार  आहे "
         " माझ्याने आता मंदिरातल्या पूजेची धावपळ तसेच जंगलात जावून वन औषधी आणणे झेपत नाही ती कामे तू माझ्या मागे करावीस असे मला वाटते कारण अंबाजी कडून त्या गोष्टीची अपेक्षा मी करतच नाही." दामोदरपंत.
         " पण बाबा , मी घरातून जात आहे तुमच्यापासून नाही दूर जात आहे." महादेव
         " तू बाजूच्या गावात जाणार ४ मैलाच्या अंतरावर तेथून येणार कधी परत जाणार कधी ? त्यापेक्षा आपल्या शेतावरच्या घरात का नाही राहत?" दामोदरपंत.
महादेवाला हि त्यांचे विचार  पटतात  तो शेतावरच्या घरात राहायला राजी होतो. संध्याकाळी तो आणि अनुराधा शेतावरच्या घरात निघून जातात. बघता बघता वर्ष निघून जाते दामोदरपंत अम्बजीचे हि लग्न करून देतात. अंबाजी हि काही प्रमाणात सुधारतो. गावात कमवायची व्यवस्था नसल्याने तो पुण्याला निघून जातो. महादेव रोज सकाळी उठून गणपतीच्या मंदिरात पूजा करणे आणि पूजा आटोपली कि वन औषधी आणण्यासाठी जंगलात जात असे कोणत्या आदिवशी पाड्यावर जर त्याला मुक्काम करायचा असेल तर तो अनुराधाला अगोदरच सांगून ठेवत असे मग अनुराधा दामोदार्पन्तांकडे राहायला जात असे.
            जरी महादेव आणि अम्बजीचे जमत नसले तरी अंबाजीची बायको लक्ष्मी आणि अनुराधेच खूप चांगले जमत असेकधी कधी त्यांच्यामधले नाते पाहून आनंदीबाईना वाटत असे खरेच असे जर अंबाजी आणि महादेव राहिले असते तर किती बरे झाले असते. सारे काही सुरळीत चालले होते. पण हि वादळापूर्वीची शांतता होती यानंतर दामोदरपंतच्या कुटुंबात जे वादळ घोंघावणार होते त्याची कल्पना विधात्यानेही केली नसेल.
क्रमश ...............................

      
     

पान नं ९ वरून पुढे...........................

        "अहो रोज तुम्हाला घाबरणारा हा पोर आज तुम्हाला सवाल जवाब करतो आणि तुम्ही नुसते पहात राहता" आनंदीबाई बादाल्यावर हताश बसलेल्या दामोदरपंताना म्हणतात.
       " अहो आपल्या पायातील कोल्हापुरी चप्पल मुलाच्या पायात होऊ लागल्यावर त्याला धाक देवू नये तर समजावून सांगावे असे आमचे आजोबा सांगायचे.माझ्या वडिलांना" दामोदरपंत
       " तुम्हाला नाही वाटत अंबाजी हाताबाहेर जावू लागला आहे. समजावून सांगण्याच्या पलीकडे " आनंदीबाई
       " यावर उपाय आहे " दामोदरपंत.
       " मला नाही वाटत त्याच्यावर कोणताही उपाय लागू होईल." आनंदीबाई.
       "वेळीच त्याच्या गळ्यात लोडणे घालणे हाच त्याच्यावर उपाय आहे." दामोदरपंत
       "म्हणजे त्याचे लग्न करावे असे म्हणायचे  आहे का तुम्हाला?" आनंदीबाई
       " हो, पण त्याअगोदर महादेव चे लग्न करणे आवश्यक आहे. आता आपण किती दिवस जगणार आपल्या मागे या दोघांचे जमणे कठीण आहे . म्हणून यावर एकच उपाय महादेवला या घरापासून वेगळे करणे." दामोदरपंत.
        " हे पहा, महादेव माझा मुलगा नसला तरी मी पोटाच्या पोराप्रमाणे वाढवली आहे तो माझ्या नजरेचा दूर कसे करू शकता तुम्ही" आनंदीबाई कळ कळीने  म्हणतात.
        " आनंदीबाई आता त्याला इलाज नाही आहे काळजावर दगड ठेवायला शिका. मी नदी पलीकडच्या पेंडसेची  मुलगी अनुराधा महादेव साठी पहिली आहे. मुलगी गुणाची आहेच आणि नाकी डोली हि व्यवस्तीत आहे " दामोदरपंत.
        " पण महादेवला विचारलेत का?"
        " तुम्हाला  काय वाटते तो माझ्या शब्दाबाहेर जाईल?.दामोदरपंत
        " तसे नाही, पण त्याच्या आयुष्यात येणारी व्यक्ती त्याच्या मनासारखी असावी असे मला वाटते."
        " हो ते तर आहेच पण त्याला नाही आवडणार असे मला नाही वाटत."दामोदरपंत
              संध्याकाळ होते. महादेव घरी येतो हात-पाय धुवून देवाला दिवाबत्ती करू लागतो. आनंदीबाई त्याच्या लग्नाची बातमी त्याला देतात. महादेव कोणतेही आढे- वेढे न घेता होकार देतो. मुलगी पाहण्याचा कार्य क्रम होतो.दोघांच्या पत्रिका जुळतात. लग्नाची तारीख ठरते. सारे काही सुरळीत होते. काही महिने निघून जातात. लग्न पार पडते. नवीन सुनबाई घरी येते. दामोदर पंत महादेव साठी शेतावर एक छोटेसे घर बांधतात. पण त्यांना पक्की खात्री असते दामोदर आपल्याला सहजा-सहजी सोडून जाणार नाही. कोणत्या कारणाने त्याला आपल्यापासून दूर करावे याचा ते रोज विचार करत असतात. पण एक दिवस तो दिवस येतो अंबाजी आता कोणाचेच ऐकत नसे. त्यात त्याला जुगाराचे नाद लागलेला असतो. एक दिवस तो घरातील देवार्यातील चांदीचा गणपती जुगारात लावतो. सकाळी महादेव आंघोळ करून देवाची पूजा करायला जातो तेव्हा त्याला देवार्यात गणपती नसतो हे समजते. तो अम्बजीने लांबवला असेल याची त्याला खात्री असते. तो तडक उठतो आणि साखरझोपेत असणाऱ्या अम्बजीला जागवतो.
          " अंब्या उठ." महादेव
          " काय आहे, सारे माझ्या जीवनातील हिरावून घेतलेस आता झोप हि हिरावून घ्यायची इच्छा आहे काय " अंबाजी  डोळे चोळत बोलतो.
          " देव्ह्र्यातील गणपती कुठे आहे? " महादेव.
           " मला काय माहित?"
           " हे बघ अंब्या मला सांग तो कोणत्या सोनाराकडे विकलास मी सोडवून आणेन. आणि बाबांना कळूही देणार नाही ." महादेव .
            " हे पहा मला माहित नाही पहिलेच सांगतो आहे " अंबाजी
            " हे पहा अंब्या आज पर्यंत मी तुझे सारे गुन्हे माफ करत आलो पण जर तुझ्या घाणेरड्या जुगाराच्या नादापायी आजोबांनी बाबांना दिलेला गणपती  तू विकला असशील तर मी तुला माफ नाही करणार पहिलेच सांगून ठेवतो आहे." महादेव.
            "ये शहाण्या मला माफ करणारा कोण रे तू? तुझा माझ्याशी संबंध काय इतके वर्ष आमचा आश्रित राहून, माझे हक्क चोरून मला चोर म्हणतोस." अंबाजी रागाने म्हणतो.
             "अंब्या तोंड सांभाळून बोल. मी तुझा मोठा भाऊ आहे.
            " हे बघ खोटी नाती लावू नकोस. आणि गणपती मीच घेतला आणि तो विकला नाही सरळ जुगारात लावला . कारण मला पाहायचे होते ज्या देवाला तुम्ही दिवस-रात्र पुजता तो देव पणाला लावल्या नंतर स्वत्ताला तरी वाचवू शकतो का. पण नाही तो देव सुद्धा स्वत्ताला नाही वाचवू शकला तो देव मला काय वाचवणार?" अंबाजी.
           " तू गणपती जुगारात लावलास?" महादेव रागाने म्हणतो.
           " हो , आणि हरलोही. बाबांना सांगणार आहेस ? ....जा सांग मला काही फरक नाही पडत." अंबाजी बेफिक्रीने म्हणतो आणि महादेव त्याच्या कानाखाली मारतो. मग अंबाजी त्याच्या सदर्याची बाही पकडतो मग महादेव हि त्याची बाही पकडतो त्यांचा चाललेले भांडणाच्या आवाजाने आनंदीबाई धावत येतात दोघांना बाजूला करतात. अनुराधा हि येते. ती महादेवला बाजूला करते.
क्रमश ...............
         

Friday 9 March 2012

पान नं ८ वरून पुढे...........................

       काही वर्ष महादेव आईला नकळत विसरला होता. आता तो आनंदीबाईनाच आपली आई मानत असे. पण आज अचानक दामोदार्पन्तानी त्याच्या हातात जानकीचे पत्र देवून जुन्या आठवणी उकरून काढल्या होत्या. आईचे नाव परत नाही काढणार म्हणणारा महादेव हळूच जानकीचा पत्र उघडतो काही मिनिटे वाचतो डोळ्यात हळूच धारा लागतात. पुन्हा ते पत्र व्यवस्तीत गुंडाळून ठेवतो. आणि बाहेर निघून जातो. दरवाज्याच्या आडून दामोदर पंत त्याच्या प्रत्तेक हालचालीकडे लक्ष ठेवून असतात. तो बाहेर निघून का गेला हे त्यांना माहित असते इतक्यात आनंदीबाई आतून महादेवला हाक मारतात दामोदरपंत तिला तो घरी नाही आहे हे सांगतात.
      " कुठे गेला आता तर होता इथे?" आनंदीबाई माजघरात येत विचारतात.
      " नदीवर " दामोदरपंत.
      " आता या वेळी कशाला गेला नदीवर ? "
      " तुला माहित आहे ना कधी त्याच्या मनाच्या विरोधात काही झाले कि तो नदीवर जातो." दामोदरपंत तिला समजावत म्हणतात.
       " तुम्ही काही बोललात का त्याला ?" आनंदीबाई काळजीने बोलतात.
       " नाही हो, त्याच्या आईने दिलेले पत्र त्याच्या हातात दिले." दामोदरपंत
       " मग त्या पत्रात काही त्याच्या मानाविरोधात लिहिले होते का? "
       " आता ते मला कसे माहित असणार?, मी कुठे ते वाचले होते त्याच्या आईची इच्छा होती ते पत्र फक्त महादेव नेच वाचावे. पण नक्की काहीतरी त्याच्या मनाच्या विरोधात असेल किवा तिची आठवण आली असेल त्याला आणि कितीही झाले तरी आपण त्याचे खरे आई-बाबा नाही आहोत." दामोदरपंत.
     " पण आपण त्याला आपल्या पोटाच्या पोरासारखे वाढवले आहे ना ,अम्बाजीपेक्षा जास्त प्रेम केले आपण त्याच्यावर आपल्या पोटाचा पोर नसला म्हणून काय झाले पोटाच्या पोरापेक्षा जास्त प्रेम केले आपण त्याच्यावर मग आपले त्याच्यावर काहीच हक्क नाही ?" आनंदीबाई असे म्हणतात आणि बाहेर खूप वेळ त्या दोघांचे बोलणे ऐकणारा अंबाजी अचानक आतमध्ये येतो.
     " लोक खूप सांगायची हा महादेव तुझा खरा भाऊ नाही आहे , पण मला ते तुमच्या तोंडातून ऐकायचे होते , वा बाबा तो तुमचा खरा मुलगा नसूनही प्रत्तेक गोष्ट पहिली त्याला मिळत असे , प्रत्तेक वेळी त्याचे ऐकून मला तुम्ही शिक्षा करत असत.........." बाहेरून माजघरात येत अंबाजी म्हणतो.
      " पोरा, आम्ही  तुला कधीच अंतर नाही, आणि तो एक अनाथ होता........." आनंदीबाई त्याची समजूत काढत बोलतात
      " जगात महादेव एकटाच अनाथ आहे का? कित्तेक मुल अनाथ असतात साऱ्यांना तुम्ही माझे भाऊ म्हणून आणाल का ?" अंबाजी
      " प्रत्तेक गरीबावर दया करणे हे आपले धर्म आहे पोरा." कधी नव्हे ते दामोदरपंत आज अम्बजीला समजावण्याचा प्रयत्न करतात पण अंबाजी कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो. रोज दामोदार्पन्ताना घाबरणारा अंबाजी आज त्यांच्या समोर उभा राहून त्यांना सवाल जवाब करत होता काय होत आहे हे आनंदीबाई नाही कळत नव्हते.
     " वा बाबा तुम्हाला आतःवते आहे लहानपणी मी एका जखमी मांजराला घरी आणले होते तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात ' जगात प्रत्तेक दुर्बल घटकाचा अंत होणे हा सृष्टीचा नियम आहे. आणि या मांजराच्या पिल्लू हा जखमी आहे म्हणून त्याचा अंत जवळ आहे तू सृष्ठीच्या नियमात ढवळा ढवळ करू नको हे जेथे मिळाले आहे तेथे सोडून ये. हीच गोष्ट महादेवला का लागू झाली नाही बाबा.? "
       " त्या मांजराच्या पोटात खोल जखम झाली होती ते जगणे शक्य नव्हते अंबाजी म्हणून मी म्हणालो." दामोदरपंत त्याला समजावत सांगतात.
       " बाबा , आई तुम्ही त्याला आपला मुलगा मानत असाल पण मी त्याला माझा भाऊ  कधीच मानला नाही आणि मानणार हि नाही .हि काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि हो वेळ पडल्यास मी त्याचा बदला जरूर घेईन."
  अंबाजी असे म्हणतो आणि आनंदीबाई त्याच्या खड्कन कानाखाली मारतात. दामोदरपंत तिथेच सुम्भाने विणलेल्या बादल्यावर बसतात अंबाजी रागाने बाहेर निघून जातो.
क्रमश..............

Thursday 1 March 2012

पान नं ७ वरून पुढे...........................

            महादेव दामोदर पंतांच्या हातातील पत्र घेतो. त्याला वाचायला अडचण होऊ नये म्हणून दामोदरपंत माजघरात निघून जातात. महादेवला आईची आठवण कधी आली नाही असे नाही. खूप वेळा त्याने आपल्या आईला शोधण्याचा प्रयत्न केला. आई लहानपणी म्हणाली होती " महादेव तुला माझी आठवण आली कि नदीवर ये मी तुला नदीवर नक्की भेटेन." महादेव खूप वेळा नदीवर जायचा खूप वेळा त्याने जानकीला शोधण्याचे प्रयत्न केले पण त्याला कधीच जानकी भेटली नाही. आईच्या आठवणीने तो रात्री एकटाच कुशीत रडत बसायचा. एक दिवस बाजूला झोपलेल्या आनंदीबाईना महादेवच्या हुंदक्यांचा आवाज आला त्यांना उमगले महादेव ला आईची आठवण येत आहे
           " पोरा महादेवा , आईची आठवण येत आहे होय." आनंदीबाई त्याच्या डोक्यावर हात फिरवत बोलतात.
            " नाही मोठ्या आई ." महादेव आपले डोळे पुसत बोलतो.
           " म्हणजे तू मला आई नाही मानत ना? " आनंदीबाई
           " असा कधी म्हणालो मी ?" महादेव.
           " मग माझ्या प्रेमात काय कमी पडले पोरा जे तुला आपल्या आईची आठवण आली." आनंदीबाई असे म्हणताच महादेव आपली कुस बदलून आनंदीबाईना मिठी मारतो.
          " नाही मोठ्या आई मला तुम्ही माझ्या खऱ्या आईपेक्षा श्रेष्ठ आहात. मला जर कुणी तुम्ही आणि माझी आई यातील एकाची निवड करायला सांगितली तर मी तुमची निवड करेन." महादेव.
           " मग मला मोठ्या आई न म्हणता फक्त 'आई' म्हण पाहू " आनंदीबाई.
           " आई ." असे म्हणून आनंदी बाई ना बिलगतो.
         ती रात्र निघून जाते महादेव सकाळी उठतो देवाची पूजा करतो. आज तो मनाशी ठरवतो आज आईला काही झाले तरी शोधून काढायचे. त्यासाठी काही करायला लागले तरी चालेल पण आज ती नाही भेटली तर तिला कायमचे विसरायचे. तो नदीकाठावर जातो सारा नदीकाठ पिंजून काढतो पण त्याला तो मिळत नाही. तो आपल्या स्वत्ताच्या गावात जातो. घरी पाहतो तर जिथे त्याचे घर होते ते पडले होते मध्ये असणारा लाकडाचा खं मात्र उभा होता. त्यावर एक मधमाशीचे पोळे होते.आपल्या घराची अशी अवस्था का झाली असावी हे त्याला उमगत नाही. तो घाबरत- घाबरत थोडे दूर असणाऱ्या जोश्याना आई बद्दल काहीतरी माहित असेल म्हणून तेथे जातो. त्याला पाहून अंगणात खेळत असणारा जोश्यांचा मुलगा गजानन धावत त्याच्या जवळ येतो.
          "महादेव  कुठे गेला होतास ? किती दिवस मी तुझी खेळायला वाट पाहतो आहे." गजानन
          " तू माझ्या आईला पाहिलीस कुठे?" महादेव.
          " नाही, तू गेल्यानंतर काही दिवस ती होती पण मग कुठे गेली ती माहीतच नाही." गजानन.
एवढ्यात जोशी काकू बाहेर येतात. महादेव ला पाहून त्यांची तळ- पायातील आग मस्तकात जाते.
        " गजानन तुला किती वेळा सांगितले त्या पांढऱ्या पायाच्या मुलाबरोबर खेळू नको म्हणून."
         " काकू मी खेळायला नाही आईला शोधायला आलो आहे. तुम्हाला माहित आहे का माझी आई कुठे आहे."महादेव विनवणी करत बोलतो.
         " बापाला खाल्लीस तर खाल्लीस आता आईला पण खाल्लीस वाटते." जोशी काकू काय बोलल्या त्या महादेवला समजले पण त्यांच्याकडून आपल्याला समाधानकारक उत्तर मिळणार नाही हे त्याला माहित होते म्हणून अजून पण उतारा होण्याअगोदर आपण इथून निघून गेलेले बरे म्हणून तो तेथून निघून जातो. हताश होऊन घराकडे निघतो.रस्त्यात त्याला दामोदरपंत भेटतात.
        " बाबा, तुम्ही इकडे? " महादेव आश्चर्याने विचारतो
        " काय करू पोरा तुझ्या आईने तू रात्रीची सारी हकीगत सांगितली. आज दुपारी तू जेवायला नाही आलास आम्हाला दोघांना खूप काळजी वाटत होती म्हणून मी सारा गाव पालथा घातला तेथे तू नाही भेटलास म्हणून वाटले तू नक्की तुझ्या घरी गेला असशील म्हणून इकडे आलो."
       " बाबा कुठे गेली असेल आई? " महादेव
       " जिथे पण असेल तेथून तिला तुझी आठवण नक्की येत असेल." दामोदरपंत
       " मग ती मला भेटायला का नाही येत. तिला माहित नाही का मी तिची किती आठवण काढत असेन?" महादेव रडत बोलतो.
       " जगातील साऱ्या आईंना आपल्या मुलांची आठवण येते पोरा." दामोदरपंत त्याची समजूत काढत बोलतात.
       " मग ती मला का नाही भेटायला येत.बाबा ?"
       " तिची काहीतरी मजबुरी असेल." दामोदरपंत.
       " मग आज पासून मीही ठरवतो यापुढे मी तिला कधीच शोधणार नाही आणि कधीच तिची आठवण हि काढणार नाही ......कधीच नाही " महादेव दामोदर पंताना बिलगतो. दामोदर पंत त्याचे डोळे पुसतात. महादेव न बोलता त्यांच्या मागे मागे घराची वाट चालू लागतो
क्रमश.............
      
  

Tuesday 28 February 2012

पान नं ६ वरून पुढे...........................

        रात्री जेवणाची वेळ असते. आनंदीबाई केळीच्या पानावर सर्वाना जेवण वाढतात. महादेव आणि अंबाजी माज घरात बसलेले असतात. आनंदीबाई जेवायला हाक मारतात. दोघे हाथ धुवून जेवायला बसतात. एवढ्यात बाहेरून दामोदरपंत येतात. अम्बजीला जेवताना पाहून ते खवळतात.
            " याला जेवायला कोणी वाढला?" दामोदरपंत अम्बजीकडे बोट दाखवत विचारतात. अंबाजी समजून चुकतो आता आपल्याला जेवण तर मिळणार नाही पण पोटभर मार नक्की मिळणार आहे तो दोन मोठ मोठे घास मारतो ते पाहून दामोदरपंत पुढे होतात. त्याच्या पुढ्यातील जेवणाचे पान काढून घेतात आणि बाहेर असलेल्या कुत्र्याला टाकतात.
            " अहो काय करता आहात त्याने काय केले आहे?" आनंदीबाई गोंधळून विचारतात .
            " तोंड दाखवायला जागा ठेवली नाही आहे त्याने. चोरी केली आहे माझ्या बटव्यातील २० होण् काढले आहेत त्याने." दामोदरपंत.
           " ते पैसे मी नववारी घेण्यासाठी काढले होते. मला विचारायचे." आनंदीबाई अम्बजीला वाचवण्याच्या प्रयत्नात बोलतात.
           " आज तुमचे पुत्र प्रेम खुपच ओतू जात आहे. खोटे बोलण्याची काही हद्द असते.खरे काय आहे हे मला समजले आहे या नालायाकाने फक्त पैसेच नाही चोरले आहेत तर त्या पैश्याचा जुगार हि खेळला आहे हा आणि आज जर तुम्ही त्याला पाठीशी घातलेत तर पुढे पाछतावण्याची वेळ येईल आपल्यावर " दामोदर पंत.
          " काय जुगार........" आनंदीबाई
          " हो नालायक जुगार खेळला त्या पैश्याचा  "दामोदरपंत.
          " अरे देवा......." आनंदीबाई.
          " आता याला उद्या दुपारचे जेवणही देवू नका नाहीतर माझ्याशी गाठ आहे ."
अंबाजी तेथून लगेच बाहेर पडतो कारण जेवण तर गेले आता मार हि पडतील हे त्याला चांगले माहित असते महादेव नि बाबांना सांगितले त्या महादेवाला मी कधीच माफ करायचे नाही हा विचार पक्का करतो. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याचा सूड घ्यायचा  हे तो पक्के मनाशी ठरवतो.आज घरात जायचे नाही कारण आज जर आपण घरी गेलो तर आपली काही धडगत नाही म्हणून तो पाटलाच्या गोठ्यात झोपतो.
          सकाळ होते पाटलाचा गडी म्हादू   गोठा झाडायला येतो गोठ्यात तो अम्बजीला झोपलेला पाहून त्याला आश्चर्य होतो.
           " अम्बजीपंत आज गोठ्यात सत्यनारायण सांगता व्हय वाटते." अम्बजीला हलवून उठवतो.
           " काल  माझ्या बाबांनी माझा सत्यनारायण केला. म्हणून इथे झोपायला लागले. " डोळे चोळत अंबाजी म्हादू ला सांगतो.
           "आता काय केलेत नवीन भानगड?" म्हादू.
           " काही नाही रे थोडे पैसे घेतले म्हणून रात्री जेवण नाही दिले." अंबाजी म्हादू ला सांगतो आणि तेवढ्यात महादेव पाटलांच्या वाड्यात येतो त्याला पाहून अंबाजी निघून जाऊ लागतो
           " अंब्या कुठे निघालास?" महादेव.
           " तुला काय करायचे आहे आणि तू कोण मला विचारणारा ?" अंबाजी
           "तुझा मोठा भाऊ ठावूक नाही आहे होय तुला " महादेव
           " मला कोणी मोठा भाऊ नाही आहे. "
           " असे तू म्हटलेस तरी मी मानणार आहे का? " महादेव.
           " काम काय आहे ते सांग आणि निग इथून " अंबाजी रागाने म्हणतो.
           " आईने तुला शोधून आणायला सांगितली आहे आणि बाबा दूरच्या गावात उपचारासाठी गेले आहेत ते उद्याच येतील चल रात्री जेवलास नाही  आहेस " महादेव त्याचा हात पकडतो अंबाजी त्याचा हात झटकून टाकतो
          "बाबांना मी पैसे चोरले असे का सांगितलेस?" अंबाजी
          " कारण बाबांनी मला शप्पथ घातली होती.म्हणून सांगावेच लागले. " महादेव
          " आणि मी घातलेली शपथ , तिचे काहीच नाही ?" अंबाजी.
          " बाबांची शपथ मी नाही मोडू शकलो " महादेव.
          " मी उपाशी राहिलो रात्रभर त्याचा काय ?" अंबाजी
          " आईने साजूक तुपातील मऊ भात  केला आहे ठीक आहे तू नसशील येत तर मी जातो. " महादेव असे म्हणून चालू लागतो.
           " ये थांब , सारा मऊ भात  एकटा खायचा विचार आहे वाटते तुझा. " असे म्हणून अंबाजी त्याच्यासोबत चालू लागतो.
           हळू हळू दिवस निघून जातात अंबाजी १५ वर्षाचा तर महादेव २० वर्षाचा होतो. दोघांच्या लग्नाची वेळ जवळ येते दामोदर पंताना जानकीने दिलेल्या पत्राची आठवण होते. लग्ना अगोदर ते पत्र महादेवला  द्यायचे असते. खूप वेळा त्या पत्रात काय लिहिले आहे याची उसुक्ता त्यांना असते खूप वेळा ते वाचण्याचा मोह हि त्यांना होतो पण त्यांना ते पत्र वाचण्याची हिम्मत होत नाही. एकदा संध्याकाळी बाहेर नारळाच्या कात्यापासून सुंभ वळणाऱ्या महादेव ला आवाज देवून माजघरात बोलावतात.
         " मला बोलावलेत बाबा ." महादेव.
          " हो"
        " काही महात्व्हाचे काम होते का ?" महादेव
        " हो महात्व्हाचेच काम होते. तुझे लग्नाचे वय निघून जात आहे मला ते तू १२ वर्ष्याचा असतानाच करायला हवे होते पण एका कोड्यामुळे लांबवले ते लाम्बवालेच " दामोदरपंत
        " कसला कोडा ?"
        तुझ्या आईने तुझ्यासाठी एक पत्र लिहून ठेवले आहे. ते तू वयात आल्यावर तुझ्या लग्नाच्या आधी तुझ्या हाती द्यावे असे सांगितले होते." दामोदरपंत आपल्या बटव्यातील एक गुंडाळलेले पत्र काढून त्याला देतात.
क्रमश.................




पान नं ५ वरून पुढे...........................

       महादेव देवळाच्या पायऱ्या चढून देवळात प्रवेश करतो सर्वात प्रथम तो दामोदर पंतांच्या पायाला हात लावून  पाया पडतो. दामोदर पंत त्याला मधेच थांबवण्याचा एक असफल प्रयत्न करतात.
               " महादेव किती वेळा तुला सांगितले आहे माझ्या पाया पडायच्या अगोदर देवाच्या पाया पडत जा म्हणून." दामोदरपंत.
               " बाबा माता पित्याचे जागा देवाच्या जागी असते मग तुमच्या पाया पडलो काय आणि देवाच्या पाया पडलो काय शेवटी एकच नाही." महादेव देवळातील गणपतीच्या पाया पडत म्हणतो.
               " तुझ्यापुढे शब्दात जिंकणे मला शक्य नाही." दामोदरपंत त्याला आपल्या छातीशी कवटाळत म्हणतात.
               " बाबा शेवटी माझे गुरु तुम्हीच आहात, आणि गुरु असा एक डाव आपल्या शिष्याला शिकवत नाही जो ब्रम्हास्त्र असतो. " महादेव.
               " खरे आहे पण आज तू माझा गुरु निघालास धोंड्याच्या मुलीला असा कोणता पाला खायला दिलास ज्यामुळे ती मोठ्या विष बाधेबासून वाचली. तू माझापण गुरु निघालास."
               " बाबा मला सांगा एखादी विषारी वस्तू आपल्या पोटात गेल्यावर जर ती वेळेत बाहेर आली तर माणूस वाचू शकतो नाही. एकदा मी एका माकडाला पहिले तो कित्तेक वेळा अस्वस्त होऊन इकडे तिकडे उड्या मारत होता मग तो दोन झाडे सोडून एका झाडावर गेला त्या झाडाचा पाला खाल्ला मग काही वेळाने चक्क त्याने उलटी केली . आणि लगेच स्वस्थ झाला . मला लगेच समजले त्याने अशी काही वस्तू खाल्ली होती जी त्याला पचवणे अवघड झाली होती म्हणून ती वस्तू पोटातून उलटी मार्फत काढून टाकण्यासाठी त्याने तो पाला खाल्ला. आणि तोच पाला मी मंगलाला खायला दिला.बाबा तुम्हीच तर मला शिकवले आहे ना माणसापेक्षा जनावरांना झाड-पाल्याची माहिती जास्त असते. त्यांचे व्यवस्तीत निरीक्षण केल्याने आपल्याला खूप सारे औषधी सापडू शकते. " महादेव.
           " महादेवा एवढ्या कमी वयात तुला किती समज आहे रे."
           " बाबा माझ्याकडून एक चूक झाली आहे." महादेव.
           " चूक आणि तुझ्याकडून झाली असेल, मला नाही वाटत." दामोदर पंत.
           " पण माझ्याकडून ती झाली आहे बाबा, मी न विचारता तुमच्या बटव्यातील २० होण् घेतले."
           " अरे ते पैसे वाण्याला द्यायचे होते. नाहीतर तो जिन्नस नाही देणार यापुढे."दामोदरपंत.
           " माफ करा बाबा, पण मी ते  पैसे लवकरच तुम्हाला परत करेन."
           " मला सांग एवढ्या पैश्याची गरज तुला कशाला पडली?" दामोदर पंत.
           " तो डोंगरावरचा आदिवशी पाडा आहे ना तिथल्या एका आदिवाश्याच्या मुलीच्या लग्नाला पैसे कमी पडत होते म्हणून त्याला मदत करण्यासाठी काढले."महादेव.
           " बर केलास पोरा आपल्या पेक्षा त्या गरिबाला त्याची गरज होती. आणि पैसा काय आज ना उद्या आपण कामावूच" असे म्हणून दामोदर पंत देवापुढे असणारा प्रसाद महादेवला द्यायला उचलतात.......
           " महादेव तू माझ्या बटव्यातील पैसे कधी काढलेस?" दामोदरपंत.
           " अ..न ....परवा ....रानात वनौषधी आणायला गेलो त्या दिवशी."महादेव अडखळत बोलतो.
           " पोरा देवाच्या दरबारात तरी खोटे बोलू नकोस मला सांग अम्बजीने ते पैसे काय केले." दामोदरपंत
           " नाही बाबा ते पैसे अम्बजीने नाही मी काढले तुम्हाला............." महादेव.
           " महादेव तू मला म्हणालास ना तुम्ही माझे गुरु आहात आणि गुरु असा एक डाव असतो जो आपल्या शिष्याला कधी शिकवत नाही. आणि मी हि तो डाव तुला नाही शिकवला आहे. कोणता डाव माहित आहे .......खोटे बोलण्याचा डाव जो मी तुला कधीच शिकवला नाही. आणि त्यामुळेच तू व्यवस्तीत खोटे बोलू शकत नाहीस . मला माहित आहे ते पैसे तू नाही माझ्या बटव्यातून काढलेस अम्बजीने काढले आहेत आणि मला हे हि माहित आहे त्याने त्या पैश्याचे काय केले. " दामोदरपंत.
          " पण तुम्हाला कसे समजले ते पैसे मी नाही अम्बजीने घेतले." महादेव आश्यार्याने विचारतो.
          " कारण ते पैसे मी माझ्या बटव्यात परवा नाही काल ठेवले होते. आणि काल तर तू पूर्ण दिवस आदिवशी पाड्यात होतास. राहिली गोष्ट मला न विचारात पैसे घेण्याची  असे तू कधीच करणार नाहीस माझ्या परवानगीशिवाय . मला तुझ्यावर पूर्ण भरवसा आहे. पण तू अम्बजीला पाठीशी घालून त्याला मदत नाही करत आहेस चुकून वाईट दिशेला जाण्यास मदत करत आहेस. अंबाजी पेक्षा पैसे नक्कीच मोठे नाहीत पण त्याने कोणत्या कारणासाठी वापरले हे पाहणे जरुरी आहे. मला तुझ्याकडून खरे ऐकायचे आहे कृपया माझा विश्वासघात करू नकोस." दामोदरपंत त्याचे दोन्ही खांद्यावर हात ठेवत बोलतात. न राहून महादेव अम्बजीने पैसे कोणत्या कारणासाठी वापरले हे सांगून टाकतो.

Sunday 26 February 2012

पान नं ४ वरून पुढे........................

    संध्याकाळी महादेव घरी परततो. आणलेली औषधी देवापुढे ठेवतो. आनंदीबाई चहा देतात.
          " महादेव यांनी तुला देवळात बोलावली आहे." संतीबाई रिकामा चहाचा कप परत घेत म्हणतात.
          " ठीक आहे आई मग मी निघतो त्या निम्मित्ताने सांज आरतीही मिळेल." महादेव असे म्हणून देवळांकडे चालू लागतो. रस्त्यात त्याला अंबाजी भेटतो.
         " काय रे अंब्या कुठे निघाला आहेस धावत धावत?" महादेव.
        " दादा मला थोडे पैसे पाहिजे होते."
        " कशाला? " महादेव.
        " तू देणार आहेस कि नाही ते सांग."
        " तुला किती आणि कशाला पैसे हवे आहेत ते सांग तरच मी देईन" महादेव.
        " सांगतो पण मला वचन दे तू बाबांना सांगणार नाहीस "
        " अंब्या आता तू काय नवीन भानगड केली आहेस."
        " दादा पहिले तू वचन दे."
        " ठीक आहे नाही सांगणार आता सांग." महादेव.
        " मला २० होण् हवे आहेत."
       " एवढे पैसे ? एवडे पैसे माझ्याकडे नाही आहेत आणि एवढे पैसे तुला कशाला हवे आहेत. "महादेव.
       " दादा मी जुगारात हरलो. " अंबाजी खाली मान घालून म्हणाला.
       " तू जुगार खेळलास? "
       " त्याचे काय आहे बाजूच्या गावात जत्रा भरणार आहे उद्या म्हणून मी बाबांच्या बटव्यातील २० होण् काढले मला वाटले हे पैसे जुगारात लावून दुप्पट करेन आणि मग ते पैसे बाबांच्या किशात ठेवून  वरच्या पैश्यात जत्रा फिरीन." अंबाजी .
       " तू बाबांच्या किशातील पैसे चोरलेस, आणि तुला काय वाटले जुगारात तू जिंकशील ?" महादेव रागाने म्हणाला
        " या अगोदर हि मी एकदा असे केले होते त्यावेळी जिंकलो होतो." अंबाजी.
        " जुगारात प्रत्तेक वेळी नाही जिकू शकत कारण ते पैसे कोणाच्यातरी कास्थाचे असतात. त्या माणसाची हाय असते." महादेव.
         " दादा काहीतरी कर नाहीतर आज बाबा माझी पाठ सोलून काढतील मला वाचव दादा परत मी असे नाही करणार." अंबाजी विनवणी करू लागला.
         " अरे पण मी काय करू शकतो माझ्याकडे फक्त ५ होण् आहेत बाकीचे होण् कुठून आणू?" महादेव.
         " तुझ्याकडे तेवढे पैसे नसतील तर माझ्याकडे २ उपाय आहेत." अंबाजी.
         " मग ते उपाय तूच का नाही करू शकत ?" महादेव.
         " कारण ते उपाय फक्त तूच करू शकतोस ." अंबाजी.
          " ठीक आहे सांग लवकर नाहीतर माझी सांज आरती चुकेल मला माहित आहे तुझ्या डोक्यात घानेरडेच उपाय असणार." महादेव.
         " पहिला उपाय ...........तुझ्याकडचे ५ होण् आपण परत जुगारात लावू या कदाचित आपल्या नशिबात जीत असेल." अंबाजी.
         " अंब्या तुझे डोके ठिकाणावर आहे कारे मी माझे पैसे जुगारात लावेन हे तू म्हणूच कसे शकतोस?" महादेव रागाने त्याच्यावर ओरडतो.
         " मग दुसरा उपाय तो तुझ्या सिद्धांतात बसतो. ........" अंबाजी.
          " आता सांगतोस कि जावू मी."
        " तू बाबांना सांग ना मला काही काम पडले म्हणून तुम्ही नव्हतात तेव्हा त्यातले २० होण् मी घेतले एका गरजू गरीब माणसाला मदत करायला . ते तुला काही नाही बोलणार  आणि तुझे ५ होण् हि वाचतील " अंबाजी.
        " अंब्या तुला काय वाटते असे मी करेन.?" महादेव.
         " वाटते नाही मला खात्री आहे तू माझ्यासाठी देव आहेस आणि आज तुझा हा भक्त तुला पाण्यात ठेवत आहे मग तू तुझ्या भक्ताची नक्की मदत करणार?" अंबाजी.
        " मला तू पाण्यात ठेवली आहेस ?" महादेव.
         " हो बघ ना तू एका पाण्याने साचलेल्या डबक्यात उभा आहेस." अंबाजी त्याला खाली बोट दाखवत सांगतो. महादेव खाली पाहतो तर खरेच त्याच्या पायाखाली एक पाण्याने भरलेले छोटेशे डबके असते. तो थोडा बाजूला होतो.
          " दादा करशील ना रे माझी मदत?" अंबाजी केविलवाणा होऊन बोलतो आणि महादेवालाही त्याला नाही म्हणवत नाही.
          " ठीक आहे पण तू मला वचन दिले आहेस परत तू जुगार खेळणार नाहीस." महादेव.
          " तुझी शपथ , नाही खेळणार  "
          " आता माझी शपथ घेवून मला मारणार आहेस का जा घरी आई चहासाठी तुझी वाट पाहते आहे ? " असे म्हणून महादेव मंदिराची वाट धरतो. थोड्या वेळातच तो मंदिरात पोचतो. मंदिरात सांज आरती नुकतीच संपलेली असते.सारे गावकरी देवळातील गणपतीचे दर्शन घेवून निघून जात असतात.
क्रमश ...........................
                                                                                                                                                      पान नं ५

Friday 24 February 2012

पान न ३ वरून पुढे.........

                दामोदर पंत सारा गाव शोधून काढतात. पण जानकीचा काही पत्ता लागत नाही.ते  तिच्या घरीही शोधतात पण ते तिला शोधण्यास ते अपयशी ठरतात.  शेवटी हताश होऊन ते घरी परततात. घडलेली सारी हकीगत ते आनंदी बाई ना सांगतात. दुसऱ्या दिवशी ते गावातील नदीकाठ पुन्हा पालथा पण तिला शोधण्यास ते अपयशी ठरतात.
              काही महिन्यांनी  दामोदर पंताना पुत्र रत्न होते. मुलाचा नाव अंबाजी ठेवतात. अंबाजी आणि महादेव एका घरात वाढू लागतात.  अम्बजीचे अति लाड झाल्याने तो फार खट्याळ होतो पण त्याउलट महादेव अधिकाअधिक समजूतदार होऊ लागतो. महादेव प्रत्तेक वेळी आपल्या आवडीना मुरड घालून आपल्या हिस्श्यातील प्रत्तेक वस्तू अम्बजीला देत असे. दामोदर पंत आणि आनंदी बाईनी महादेव हा आपला मुलगा नाही हे अम्बजीला कळू नये म्हणून योग्य ती दक्षता घेतात. 
              महादेव आता १२ वर्षाचा झाला होता. आणि अंबाजी ८ वर्षाचा  महादेव आपला जास्तीत जास्त वेळ दामोदर पंताना वन औषधी जंगलातून आणून देण्यासाठी घालवत असे. कोणत्या डोंगरात कोणता औषध मिळेल हे त्याला चांगले माहित होते. आता तो एकटा जंगलात जात असे. जंगलातील आदिवशी पाडे त्याला चांगले ओळखत. सारे आदिवाशी त्याला दामोदर पंतांचा उत्तर अधिकारी म्हणून पहात त्याला मान देत असत.
             दामोदर पंत हे ब्राह्मण असल्याने ते सहसा कोणाच्या घरी काहीही खात नसत ते फट एखाद्या आदीवाशी च्या झोपडीत चहा घेत असत. आपला पाणी मात्र ते नदी किवा ओढ्यातील पीत असत. पण महादेव तसा नव्हता. तो कोणाच्या हि घरी जेवत असे रात्र- रात्र मुक्काम करत असे. पण कुणाकडे फुकटचे खायचे नाही हा त्याचा नियम. कोणते काम नसेल तर त्या आदिवाश्याचे गोठा झाडून द्यायलाही तो कमी करत नसे.
             एकदा एक आदिवशी पसाभर धान्य घेवून दामोदर पंतांच्या घरी आला.
               "राम राम वैद्य बुवा "
                " राम राम , कसा काय आलास धोंड्या " दामोदरपंत.
                " काय सांगू , काळ तीसंच्यानी लय मोती आफत आली व्हती "
                " माझी पोर मंगला तीन धोत्र्याचा बी खाल्ली कि हो " धोंड्या.
                " अरे देवा मग वाचली कि नाही " दामोदर पंत काळजीत म्हणाले.
                " अहो म्हध्या असल्यावर ती मारणार हाय व्हय "
                " पण त्या विषारी फळावर कायच उपाय नाही आहे धोंड्या असा असते तर कित्तेक जनावरांचे प्राण
                 मी वाचवले नसते का जे चुकून धोत्र्यचे बी खातात त्या " दामोदर पंत.
                " मला म्हयीत हाय वैद्य बुवा पण म्हध्यान कसलाश्या पाला आणला तो वाटून तिला पाजला आणि  
                 तीन ४ /५ वांत्या केल्या आणि झाली नव्ह ठणठणीत " धोंड्या
               " अरे पण मला असला कुठलाच पाला माहित नाही मग महादेव ला कसा माहित असेल ." दामोदरपंत
                आचार्याने म्हणाले.
               " आता ते म्हध्यालाच विचारा.आणि हे पसाभर धान्य ठेवा नाही म्हणू नका नाहीतर माझ्यासारख्या
               गरिबाला वायट वाटल " धोंड्या पाठीवरचे बोचके दामोदर पंताना देत म्हणाला.
याला नको म्हणून हा ऐकणार नाही हे दामोदर पंताना चांगले माहित होते म्हणून त्यांनी नकार न देताच ठेवून घेतले.     " धोंड्या महादेव कुठे आहे आता?" दामोदरपंत
               " आज म्या त्याला सकलच धनगराच्या वाड्यात झाड-लोट करताना बगीताला  मी गावात जातो
              हाय येतोस काय विचरला तर बा ला सांगा तीसंचानी येईन घराला म्हणून " धोंड्या. दामोदर पंतानी
              आनंदीला हाक मारून चहा ठेवायला सांगितली .
              " वैद्य बुवा चाय नग  कसला वैनिना तरास देताय" धोंड्या संकोचित होऊन म्हणाला.
            " धोंड्या चहा  तर तुला प्यायलाच लागेल कारण यावेळी मी तुझा ऐकणार नाही "
चहा पान झाल्यावर धोंड्या आपल्या घराचा रस्ता धरतो.
क्रामश ...............
                                                                                                                                            पान नं ०३

Thursday 23 February 2012

पान २ वरुण पुढे .......

लहानगा महादेव घरी आला. घरी येताच त्याने आपल्या हातातील दोन्ही पत्रे दामोदर पंतांकडे दिली. त्यातील एक पत्र दामोदर पंतांसाठी होते तर दुसऱ्या पत्रावर लिहिले होते पहिले पत्र वाचल्याशिवाय हे पत्र उघडू नये. दामोदर पंतानी पहिले पत्र उघडले.
 नमस्कार ,
मी जानकी माझी पूर्ण माहिती न समजून घेता आपण माझ्या मुलाला भिक्षुकी शिकवायचे कबुल केलेत माणूस इतका साधा आणि भोला असू शकतो याचा अनुभव मला पहिल्यांदा . आमच्या गावात तुमची कीर्ती मी ऐकून होते. तुम्हाला कोडे पडले असेल ना मी लिहू कशी शकते म्हणून? माझे  श्रीधरपंत यांचा संस्कृतवर चांगला प्रभाव होता त्यांना वाटे स्त्रियांनी हि शिकले पाहिजे. त्यांना जुन्या चाली रिती अजिबात मान्य नव्हत्या पण ते नास्तिक नव्हते. ते म्हणायचे जगात देव आहे कि नाही हे मी सांगू शकत नाही पण माणसाला जगायला संस्कार आवशक असतात आणि हे संस्कार तेव्हाच घडतात जेव्हा माणूस कुणा ना कुणाला तरी घाबरत असतो आणि जगात असा एकच नाव आहे ज्याला माणूस घाबरून संस्कारी बनतो आणि तो म्हणजे देव. माझ्या मुलाला मी भिक्षुकी शिकवेन कारण त्यामुळे त्याला समाजात इज्जत आणि देवाची भीती या दोन्ही गोष्ठी यामधून मिळतील.त्यांनी मला लिहायला शिकवले आणि म्हणाले जर आपल्याला मुलगी झाली कि तिलाही शिकवू पण देवाने त्यांना जास्त काल जगू दिले नाही. त्यांनी  मला लिहायला शिकवले याचा मला कधी फायदा झाला नाही पण आज त्या लेखणीचा शेवटचा प्रयोग करायचा मी ठरवले आहे. यापुढे मी महादेवला आणि तुम्हाला कधी भेटणार नाही. कारण मी आत्महत्या करायचे ठरवले आहे . तुम्हाला वाटत असेल मी कमजोर मनाची आहे पण तसे नाही आहे. जीवनात जगायला कष्ट पडतात म्हणून मी आत्महत्या नाही करत आहे त्याला मोठे कारण आहे जे मी जिवंत असताना नाही सांगू शकत  पण एका कोड्यात टाकून मेले तर कदाचित माझा आत्मा शांत होणार नाही
              माझे पती कोणत्या आजाराने मेले नाहीत तर गावातील सावकाराने त्यांना विषबाधा करून मारले. कारण त्या सावकाराचा माझ्या सौंदर्यावर डोळा होता. मी पती मेल्यानंतर केशवपन केले कदाचित त्यामुळे सावकाराच्या पाशातून मी सुटेन पण तरीही त्या नराधमाने मला सोडली नाही पती ज्या दिवशी निवर्तले त्याच रात्री सावकाराने माझ्यावर बलात्कार केला . मला गावात कुठेच काम मिळणार नाही याची दक्षता घेतली त्याला वाटले असे केल्यावर मी त्याच्या तुकड्यावर जगेन त्याची रखेल बनेन पण मी नाही ऐकले. कुणाशी वाच्यता केलीस तर तुझ्या नावार्याप्रमाणे तुझ्या मुलालाही मारेन अशी धमकी दिली. मी त्याचे अत्याचार आज पर्यंत सहन करत आले मी त्या सावकारापासून ३ महिन्याची गर्भवती आहे. यापुढे जिवंत राहिली तर जग माझ्यावर थुन्केल माझ्या मुलाची काळजी घ्या लाड करा असे नाही म्हणत आहे पण एक आश्रीत म्हणून भाकर जरूर दया मी तुमचे उपकार जन्म्हभर नाही विसरणार .
            दुसरे पत्र महादेव साठी आहे ते पत्र त्याला तो जाणता झाला कि दया माझी विनंती आहे ते पत्र फक्त महादेव साठीच आहे ते दुसऱ्या कुणाच्या हातात पडणार नाही हि माझी शेवटची इच्छा पूर्ण करा . तुमचे पांग मी या जन्म्हन नाही फेडू शकणार पण पुढच्या जन्मी मी देवाकडे तुमच्या घरी गाय बनवून फेडावे म्हणून विनंती करेन  बस पत्र पुरे करते
                                                                                                                                      जानकी
पत्र संपताच दामोदर पंत भानावर येतात. "महादेव तुझी आई कुठे आहे?"
               " मला इथेच बाहेर सोडून घरी जा म्हणून सांगून गेली " महादेव
               " अरे तुला सांगितले का कुठे जाते म्हणून ?"
               " नाही " महादेव
              "अहो लवकर माझी पगडी द्या खूप मोठा अनार्थ होणार आहे." दामोदर पंत आनंदि बाई ना ओरडत सांगतात.
              " काय झाले " आनंदी बाई पगडी घेवून येत विचारतात .
              " सांगायला वेळ नाही मी आल्यावर सांगतो " दामोदरपंत धावत धावत घराच्या बाहेर पडतात.
क्रमश ..............

Wednesday 22 February 2012

              दामोदरपंत महादेवला घेवून आपल्या घराकडे आले.
              " कोणचा हा मुलगा ?" आनंदीबाई
               " अहो  ते जोशी आहेत ना  त्यांच्या शेजाऱ्याचा आहे. याचे वडील नाही आहेत त्याच्या आईने भिक्षुकी शिकायला आपल्याकडे पाठवले आहे." दामोदरपंत
               " किती गोड आहे ना ! " आनंदीबाई.
               " लवकरच आपल्यालाही असेच गोड मुल होणार आहे." दामोदरपंत.
               " चला,  तुमचे आपले काहीतरीच." आनंदीबाई
               " अहो लाजता काय तयारी करा नव्या पाहुण्याच्या आगमनाची " दामोदरपंत.
दिवसामागून दिवस जावू लागले महादेव दामोदर पंतांच्या घरी मिळून मिसळून गेला. तीन महिने झाले अचानक सकाळी सकाळी जानकी महादेव ला भेटायला आली. दामोदर जानकीला पाहताच कडकडून बिलगला. जानकीच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या. दोघा आई मुलाचे प्रेम पाहून दामोदरपंत आणि आनंदी बाई स्थब्ध झाले. " मी याला थोडे बाहेर घेवून जाऊ " जानकी
                 " जानकीबाई मुलगा तुमचाच आहे त्यात परवानगी कसली मागता. " दामोदरपंत.
                 " पण आता तो तुमच्या पदरात टाकला आहे ना " जानकी
                 "मी चहा ठेवला आहे पहिला चहा प्या आणि नंतर जा." आनंदी बाई असे म्हणून आंत स्वयंपाक घरात गेल्या.
                 " जानकीबाई उदरनिर्वाहासाठी काही दुसरे काम मिळाले कि नाही ?" दामोदरपंत.
                  " हो , आता सारे प्रश्न सुटतील  काही दिवसाने." जानकी
                  " कोणते काम मिळाले आहे? " दामोदरपंत
                   " एका घरात भांडी घासायचे काम मिळाले आहे. " जानकी
                  " मी तुम्हाला मदत केली तर चालेल का ?" दामोदरपंत.
                  " नको, अगोदरच तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली मी दबली आहे अजून एक उपकार केलात तर कोठून फेडू मी तसेही मी माझ्या छोट्याश्या जीवनात खुश आहे." जानकी असे म्हणाली आणि आनंदी चहा घेवून आली. चहापान झाले. जानकी महादेव ला घेवून बाहेर गेली.
                  " आई आपण कुठे चाललो आहोत ?" महादेव
                  " तुझ्या आवडत्या ठिकाणी नदीवर. " जानकी
                  " नदीवर  वा , " दामोदर खुश झाला त्याला नदीवरच्या काठावर बसून नदीत दगड मारायला खूप आवडायचे आज हि तो मनोमाक्त नदीच्या पत्रात दगड मारणार होता.
                  " महादेव  आता यापुढे कधी माझी आठवण झाली तर नदीवर ये मी तुला नदीवरच भेटेन." जानकी चालत चालत म्हणाली.
                  " मग मी रोज येईन नदीवर बाबा मला घेवून येतील." महादेव .
                  " बाबा कोण बाबा ? " जानकी थांबत म्हणाली.
                  " तेच ज्यांच्याकडे तू मला राहायला पाठवली आहेस." महादेव
                  " तुला त्यांना बाबा म्हणायला कोणी सांगितले ?" जानकी
                  " त्यांनीच " महादेव
                  " आणि आनंदीबाईना काय हक मारतोस?" जानकी
                  " मोठी आई " महादेव.
जानकीच्या डोळ्यात दामोदर पंतांच्या कुटुंबाने दाखवलेल्या उदार्तेबद्दल अश्रू आले.
                  " महादेव त्या दोघांचे मन दुखावेल असे काही करू नकोस " जानकी म्हणाली.
              महादेवला ती काय म्हणते आहे हे त्याला समजले नाही तो आज नदीवर आई सोबत मानामोक्त खेळला साधारण दुपारच्या वेळेस ती  महादेवला सोडायला परत निघाली. पण घराच्या काही अंतरावर आल्यावर ती थांबली साडीच्या पदरात ठेवलेले दोन पत्र काढून तिने महादेव च्या हातात दिले.
                 " पोरा हे पत्र दामोदर पंताना दे " जानकी
                 " आई तू नाही येत  घरी ." महादेव
                 " नाही , तू जा आणि लक्षात ठेव यापुढे कधी भेटायचे झाले तर नदीवर ये " जानकीच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या. तिने त्याला कडकडून मिठी मारली.  दामोदर घराकडे निघून गेला पण यावेळी ती तो घराकडे पोहचेल याची वाट पहात नाही बसली ती तडक निघाली तिने मनाशी काही कठोर निर्णय घेतले होते त्याची लगेचच अंबलबजावणी करायची होती.

भाग पहिला -आणि दुर्दैव ओढवले ......

           १८५७ ला म्हैसूरचा नवाब हैदर आली याचा मृत्यू झाला आमी त्याच्या जागी त्याचा शूर पुत्र टिपू आला टिपू गादिवर बसला आणि येथूनच हैद्राबाद सारख्या बहुसंख्य हिंदू असलेल्या संस्थानात हिंदुच्या दुर्दैवाला सुरुवात झाली टिपू गादिवर बसला आणि गादिवर बसल्यावर लगेचच   त्याने स्वत्ताला सुलतान घोषितकेल.. सुलतान बनताच आपले पहिले कर्तव्य म्हणजे जे मुसलमान नाही आहेत त्यांना बाटवून मुसलमान बनवणे जे विरोध करतील त्यांचे शिरकाण करणे त्याच्या बायकांवर ,अल्प वयीन मुलींवर बलात्कार करणे.हे काम टिपू आनंदाने करू लागला .त्यात त्याला राक्षशी आनंद मिळत होता.पण याची झळ मैसूर सारख्या बहुसंख्य हिंदू असणाऱ्या संस्थानाला लागली.४० वर्स्यापुर्वी मैसूरच्या एका छोट्याश्या  गावात दामोदर पंतांचे कुटुंब आले ते कुटुंब हि य आगीमध्ये होरपळले. 
                      दामोदरपंत हे एक कोकणस्थ ब्राह्मण होते. ते निष्णांत वैद्य होते. २५  वर्ष्यापुर्वी   म्हैसूर मधील एका सावकाराने  त्यांची कीर्ती ऐकून आपल्या मुलाच्या उपचारासाठी कोकणातून इथे आणले. मुलगा बरा झाल्यानंतर त्या सावकाराने त्यांना  राहायला घर बांधून दिले. गावातील गणपतीच्या मंदिरात पूजा करण्यासाठी त्यांची नेमणूक केली. इथेच त्यांना अंबाजी नावाचे गोंडस मुल झाले होते. दामोदरपंत यांना गावात खूप मान होता. लोक त्यांना कशाचीही कमी पडू देत नसत पण त्याचा फायदा त्यांनी कधी उचलला नाही. घराची परस्थिती बेताची होती. पिढीजात वैद्यगिरीवर त्यांचे घर चालत असे. पण त्यांनी कधी याकडे व्यवसाय म्हणून पहिले नाही. गावातील कित्तेक गरीब लोकांवर ते विनामुल्य उपचार करत असत. त्यंच्या अश्या धोरणामुळे बायको आनंदीबाई कधी कधी खूप रागावे. पण आपल्या नवऱ्याचे कार्यय किती थोर आहे याची तिला कल्पना होती म्हणून ती लटक्या रागाशिवाय काही करत नसे. 
                   अंबाजी आता वयात आला होता गेल्याच वर्षी त्यांनी त्याचा  लग्न बाजूच्या गावातील लक्ष्मी शि लावला होता. गावात कामधंदा नाही आणि अम्बजीला देवळातील पूजेत स्वारश्य नसल्याने तो पुण्याला एका सावकाराकडे कारकुनाच्या कामासाठी निघून गेला. दुसरा मुलगा महादेव मात्र तिथेच राहत होता. पण गेल्या सहा महिन्यापूर्वीच दामोदर पंतानी त्याला त्याचा कुटुंब घेवून वेगळे राहायला सांगितले होते.
                  महादेव हा त्यांना मुलगा नव्हता. २० वर्ष्यापुर्वी बाजूच्या  गावातील जोश्यांकडे सत्यनारायण सांगायला गेले होते. सत्यनारायणाची पूजा सांगताना बाहेर वरांड्यात एक ५ वर्षाचे मुल तक लाऊन ती पूजा ऐकत होते. एका ५ वर्षाचे मुल तन ,मन , लावून पूजा ऐकतो आहे हे पाहून त्यांना आश्यर्य झाले त्यांनी पूजा संपल्यावर त्या मुलाबद्दल जोश्यांकडे चौकशी केली. " कोणाचे आहे हो ते मुल ?"
         "बाजूला एक विधवा राहते जानकी काही वर्ष्यापुर्वी तिचे पती  निवर्तले. भिक्षा मागून जगते बिचारी तिचे आहे हे मुल मुलगा फार हुशार आहे " जोशी .
       " तो घरात का येत नाही ?"दामोदरपंत.
       " आमच्या श्रीमतीना त्याचा राग येतो, " जोशी.
        " त्या मुलाने काय केल आहे पण " दामोदरपंत .
       " अहो हा जन्मला आणि सहा महिन्यातच याचे वडील वारले आमच्या यांना वाटते कि या मुलगा अपशकुनी आहे याच्यामुळे आपल्या घरातही अपशकून होईल आणि बायाकांपुढे आपले काय चालते आहे होय." जोशी
 सारे कार्यक्रम संपले तसे दामोदरपंत जाऊ लागले. तसा बाजूच्या घरातून तो मुलगा धावत आला. मागोमाग त्याची आई आली. " याने भिक्षुकी शिकावी असे आमच्या यांची खूप इच्छा होती . ते निवर्तले आणि एक स्वप्नच होऊन राहिले आहे  , माझी तेवढी ऐपत नाही तुम्ही शिकवाल?" 
            " का नाही शिकवणार ? मी याला माझ्यासोबत घेवून गेलो तर चालेल तुम्हाला ?" दामोदरपंत .
           " ठीक आहे न्या तुम्ही त्याला ."
           " तुम्हाला केव्हाही भेटायची इच्छा झाली तर या घरी  मी याला भिक्षुकी शिकाविनच पण वैद्य कला हि शिकवीन ."
           " लई उपकार होतील तुमचे " ती हात जोडत म्हणाली.
           " उपकार करणारा मी कोण बाई सर्व ते सर्व वरच्याच्या हातात मी फक्त एक निम्मित आहे. नाव काय बाळा तुझे "
           " महादेव " क्षणाचाही विलंब न करता महादेव म्हणाला.
           " येणार माझ्यासोबत ?" दामोदरपंत.
           " हो " महादेव.
           " चला जानकीबाई मी येतो. तुम्हाला मुलाला भेटायची इच्छा झाली कि या घरी." दामोदरपंत निघून गेले जानकी ते दोघे नजरेआड होईपर्यंत पहात होती. एकुलत्या एक मुलाला दूर जाताना पाहून तिची घालमेल होत होती पण आपल्या पतीच्या इच्छे साठी तिने आपल्या पुत्र प्रेमाला मुरड घातली होती.
क्रमश ...............पुढील भाग उद्या