" आई आज याने माझ्या कानाखाली मारली. या अश्रीताची आता इथपर्यंत मजल गेली आहे."अंबाजी.
" अंबाजी तोंड सांभाळून बोल." आनंदीबाई रागाने म्हणतात.
" हो बरोबर आहे आता हा आश्रीत नाही आहे मी आश्रीत आहे या घरात. ठीक आहे आज संध्याकाळ पर्यंत हा राहील या घरात किवा मी जर तुला वाटत असेल मी या घरात राहावे तर आज संध्याकाल्पर्यात हा या घरातून निघून गेला पाहिजे नाहीतर या घरात मी परत कधीच पाऊल ठेवणार नाही सांगून ठेवतो." असे म्हणून अंबाजी बाहेर निघून जातो.
" काय करावे अश्या अवगुणी पोराचे तेच समजात नाही. " असे म्हणून आनंदीबाई सुद्धा आतमध्ये जातात.
" चला अनुराधा बाई आपल्याला आता निघायची तयारी करायची आहे." महादेव.
" कुठे?" अनुराधा आश्चर्याने विचारते.
" या घरात आज आपला शेवटचा दिवस . माझ्यामुळे अम्बजीला वाटते कि त्याचे हक्क मला मिळतात आणि त्याचे वाईट व्यसनांकडे वळण्याचे कारणही तेच आहे. जर आपण इथे राहिलो तर तो अजून वाईट व्यसनांच्या आहारी जाईल . .... चला तयारी करा. " महादेव.
" पण कुठे जायचे? " अनुराधा.
" बाजूच्या गावात माझे घर आहे पडक्या अवस्थेत आज तेथे जावून साधी झोपडी बांधू आणि नंतर सावकाश पक्के घर बांधू ." महादेव.
दुपारची वेळ असते दामोदरपंत देवळातून जेवायला घरी येतात. दुपारी सारे जेवायला बसतात. महादेव आपण घर सोडून जात आहोत याची त्यांना कल्पना देतो.
" मला न विचारता निर्णय घेतलास पण माझ्या स्वप्नांचे काय?" दामोदरपंत जेवता जेवता विचारतात.
" बाबा तुमचे कोणतेही स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी वाट्टेल त्या प्रकारची किंमत द्यायला तयार आहे "
" माझ्याने आता मंदिरातल्या पूजेची धावपळ तसेच जंगलात जावून वन औषधी आणणे झेपत नाही ती कामे तू माझ्या मागे करावीस असे मला वाटते कारण अंबाजी कडून त्या गोष्टीची अपेक्षा मी करतच नाही." दामोदरपंत.
" पण बाबा , मी घरातून जात आहे तुमच्यापासून नाही दूर जात आहे." महादेव
" तू बाजूच्या गावात जाणार ४ मैलाच्या अंतरावर तेथून येणार कधी परत जाणार कधी ? त्यापेक्षा आपल्या शेतावरच्या घरात का नाही राहत?" दामोदरपंत.
महादेवाला हि त्यांचे विचार पटतात तो शेतावरच्या घरात राहायला राजी होतो. संध्याकाळी तो आणि अनुराधा शेतावरच्या घरात निघून जातात. बघता बघता वर्ष निघून जाते दामोदरपंत अम्बजीचे हि लग्न करून देतात. अंबाजी हि काही प्रमाणात सुधारतो. गावात कमवायची व्यवस्था नसल्याने तो पुण्याला निघून जातो. महादेव रोज सकाळी उठून गणपतीच्या मंदिरात पूजा करणे आणि पूजा आटोपली कि वन औषधी आणण्यासाठी जंगलात जात असे कोणत्या आदिवशी पाड्यावर जर त्याला मुक्काम करायचा असेल तर तो अनुराधाला अगोदरच सांगून ठेवत असे मग अनुराधा दामोदार्पन्तांकडे राहायला जात असे.
जरी महादेव आणि अम्बजीचे जमत नसले तरी अंबाजीची बायको लक्ष्मी आणि अनुराधेच खूप चांगले जमत असेकधी कधी त्यांच्यामधले नाते पाहून आनंदीबाईना वाटत असे खरेच असे जर अंबाजी आणि महादेव राहिले असते तर किती बरे झाले असते. सारे काही सुरळीत चालले होते. पण हि वादळापूर्वीची शांतता होती यानंतर दामोदरपंतच्या कुटुंबात जे वादळ घोंघावणार होते त्याची कल्पना विधात्यानेही केली नसेल.
क्रमश ...............................

No comments:
Post a Comment