"अहो रोज तुम्हाला घाबरणारा हा पोर आज तुम्हाला सवाल जवाब करतो आणि तुम्ही नुसते पहात राहता" आनंदीबाई बादाल्यावर हताश बसलेल्या दामोदरपंताना म्हणतात.
" अहो आपल्या पायातील कोल्हापुरी चप्पल मुलाच्या पायात होऊ लागल्यावर त्याला धाक देवू नये तर समजावून सांगावे असे आमचे आजोबा सांगायचे.माझ्या वडिलांना" दामोदरपंत
" तुम्हाला नाही वाटत अंबाजी हाताबाहेर जावू लागला आहे. समजावून सांगण्याच्या पलीकडे " आनंदीबाई
" यावर उपाय आहे " दामोदरपंत.
" मला नाही वाटत त्याच्यावर कोणताही उपाय लागू होईल." आनंदीबाई.
"वेळीच त्याच्या गळ्यात लोडणे घालणे हाच त्याच्यावर उपाय आहे." दामोदरपंत
"म्हणजे त्याचे लग्न करावे असे म्हणायचे आहे का तुम्हाला?" आनंदीबाई
" हो, पण त्याअगोदर महादेव चे लग्न करणे आवश्यक आहे. आता आपण किती दिवस जगणार आपल्या मागे या दोघांचे जमणे कठीण आहे . म्हणून यावर एकच उपाय महादेवला या घरापासून वेगळे करणे." दामोदरपंत.
" हे पहा, महादेव माझा मुलगा नसला तरी मी पोटाच्या पोराप्रमाणे वाढवली आहे तो माझ्या नजरेचा दूर कसे करू शकता तुम्ही" आनंदीबाई कळ कळीने म्हणतात.
" आनंदीबाई आता त्याला इलाज नाही आहे काळजावर दगड ठेवायला शिका. मी नदी पलीकडच्या पेंडसेची मुलगी अनुराधा महादेव साठी पहिली आहे. मुलगी गुणाची आहेच आणि नाकी डोली हि व्यवस्तीत आहे " दामोदरपंत.
" पण महादेवला विचारलेत का?"
" तुम्हाला काय वाटते तो माझ्या शब्दाबाहेर जाईल?.दामोदरपंत
" तसे नाही, पण त्याच्या आयुष्यात येणारी व्यक्ती त्याच्या मनासारखी असावी असे मला वाटते."
" हो ते तर आहेच पण त्याला नाही आवडणार असे मला नाही वाटत."दामोदरपंत
संध्याकाळ होते. महादेव घरी येतो हात-पाय धुवून देवाला दिवाबत्ती करू लागतो. आनंदीबाई त्याच्या लग्नाची बातमी त्याला देतात. महादेव कोणतेही आढे- वेढे न घेता होकार देतो. मुलगी पाहण्याचा कार्य क्रम होतो.दोघांच्या पत्रिका जुळतात. लग्नाची तारीख ठरते. सारे काही सुरळीत होते. काही महिने निघून जातात. लग्न पार पडते. नवीन सुनबाई घरी येते. दामोदर पंत महादेव साठी शेतावर एक छोटेसे घर बांधतात. पण त्यांना पक्की खात्री असते दामोदर आपल्याला सहजा-सहजी सोडून जाणार नाही. कोणत्या कारणाने त्याला आपल्यापासून दूर करावे याचा ते रोज विचार करत असतात. पण एक दिवस तो दिवस येतो अंबाजी आता कोणाचेच ऐकत नसे. त्यात त्याला जुगाराचे नाद लागलेला असतो. एक दिवस तो घरातील देवार्यातील चांदीचा गणपती जुगारात लावतो. सकाळी महादेव आंघोळ करून देवाची पूजा करायला जातो तेव्हा त्याला देवार्यात गणपती नसतो हे समजते. तो अम्बजीने लांबवला असेल याची त्याला खात्री असते. तो तडक उठतो आणि साखरझोपेत असणाऱ्या अम्बजीला जागवतो.
" अंब्या उठ." महादेव
" काय आहे, सारे माझ्या जीवनातील हिरावून घेतलेस आता झोप हि हिरावून घ्यायची इच्छा आहे काय " अंबाजी डोळे चोळत बोलतो.
" देव्ह्र्यातील गणपती कुठे आहे? " महादेव.
" मला काय माहित?"
" हे बघ अंब्या मला सांग तो कोणत्या सोनाराकडे विकलास मी सोडवून आणेन. आणि बाबांना कळूही देणार नाही ." महादेव .
" हे पहा मला माहित नाही पहिलेच सांगतो आहे " अंबाजी
" हे पहा अंब्या आज पर्यंत मी तुझे सारे गुन्हे माफ करत आलो पण जर तुझ्या घाणेरड्या जुगाराच्या नादापायी आजोबांनी बाबांना दिलेला गणपती तू विकला असशील तर मी तुला माफ नाही करणार पहिलेच सांगून ठेवतो आहे." महादेव.
"ये शहाण्या मला माफ करणारा कोण रे तू? तुझा माझ्याशी संबंध काय इतके वर्ष आमचा आश्रित राहून, माझे हक्क चोरून मला चोर म्हणतोस." अंबाजी रागाने म्हणतो.
"अंब्या तोंड सांभाळून बोल. मी तुझा मोठा भाऊ आहे.
" हे बघ खोटी नाती लावू नकोस. आणि गणपती मीच घेतला आणि तो विकला नाही सरळ जुगारात लावला . कारण मला पाहायचे होते ज्या देवाला तुम्ही दिवस-रात्र पुजता तो देव पणाला लावल्या नंतर स्वत्ताला तरी वाचवू शकतो का. पण नाही तो देव सुद्धा स्वत्ताला नाही वाचवू शकला तो देव मला काय वाचवणार?" अंबाजी.
" तू गणपती जुगारात लावलास?" महादेव रागाने म्हणतो.
" हो , आणि हरलोही. बाबांना सांगणार आहेस ? ....जा सांग मला काही फरक नाही पडत." अंबाजी बेफिक्रीने म्हणतो आणि महादेव त्याच्या कानाखाली मारतो. मग अंबाजी त्याच्या सदर्याची बाही पकडतो मग महादेव हि त्याची बाही पकडतो त्यांचा चाललेले भांडणाच्या आवाजाने आनंदीबाई धावत येतात दोघांना बाजूला करतात. अनुराधा हि येते. ती महादेवला बाजूला करते.
क्रमश ...............

No comments:
Post a Comment