Tuesday 20 March 2012

पान नं १२ वरून पुढे...........................

        " आज पासून तुम्ही मुसलमान झालात वैद्य मिया| " अब्दुल हसत म्हणतो.
        " गोमांस खाल्ले म्हणजे मुसलमान झालो असे कोणी सांगितले अब्दुल?" दामोदरपंत.
        " मुसलमान झाला नसाल पण लवकरच होणार आहात." अब्दुल.
        " कश्यावरून मी मुसलमान होईन? मी हिंदू आहे आणि हिंदूच राहीन."दामोदरपंत.
        " अहो वैद्यजी जरी असे तुम्ही मानता.  पण मला सांगा तुमचेच हिंदू बांधव परत तुम्हाला आपल्या धर्मात घेतील का. आता तुमचा धर्म संपला तुम्ही धर्म भ्रष्ट आहात...... धर्म भ्रष्ट! आणि धर्म भ्रष्टला हिंदू धर्माची दारे  बंद असतात हे तुम्हाला चांगलेच माहित आहे वैध मिया| " अब्दुल.
         " या गलत फैमित राहू नकोस अब्दुल तुला माहित नसेल शिवाजी महाराज्यानी नेताजी पालकरांना शुद्ध करून परत धर्मात घेतले होते." दामोदरपंत.
         " शिवाजी महाराज वा चांगला दाखला दिलात पण त्याच शिवाजी महाराज्याच्या राज्याभिषेकाला तुमच्याच ब्राम्हणांनी विरोध केला होता हे विसरलात वैद्यजी " अब्दुल हसत म्हणतो.
         " साऱ्या ब्राम्हणांनी नाही कर्मठ ब्राम्हणांनी अब्दुल !" दामोदरपंत.
         " मग आता पाहू चांगले ब्राह्मण तुम्हाला परत हिंदू धर्मात घेतात का ते "अब्दुल.
         " पहात रहा अब्दुल मी तुला परत हिंदू धर्मात जाऊन दाखवतोच." दामोदर पंत
         " असे करताना तुमचा मृत शरीर नदीच्या पत्रात मिळूदे नको म्हणजे झाले . आणि असे करण्यात तुम्ही यशस्वी झालात तर मी स्वत्त हिंदू धर्म स्वीकारेन." अब्दुल.
        "बाकी परिवार किधर है इसका" एक  सैनिक विचारतो.
        " अरे बात करते वक्त ये तो याद हि नाही राहा. सारा घर कि तलाशी लो| " अब्दुल हुकुम देतो बाकीचे शिपाई घर शोधू लागतात आतल्या खोलीत आनंदीबाई भेटतात दोन  सैनिक तिला पकडून माजघरात घेवून येतात. तिला पाहून दामोदरपंतांच्या कपाळाला आट्या पडतात ते मनातच म्हणतात संपले सारे आता. शिपाई तिलाही गोमांस भरवतात. थोडा वेळ शोधा शोध करून सारे नराधम निघून जातात. दामोदरपंत तिथेच कोपऱ्यात बसतात.
         " तुम्हाला मागच्या दाराने जायला सांगितले होते ना?" दामोदरपंत.
         " तुम्हाला अश्या अवस्थेत सोडून कशी जाऊ शकते?" आनंदीबाई .
        " चला , घर सफ करा गावात कोणालाही काही समजून देवू नका. काही झालेले नाही आहे. मी थोडे बाहेर पाहून येतो. गावात नक्की काय परस्थिती आहे ते पाहून येतो." दामोदर पंत असे म्हणून बाहेर पडतात. तोंडात गोमासाची तुरट चव अजूनही जात नसते. मनात आत्महत्येचा विचार येतो पण मुलांच्या विचाराने ते लांबवतात. आपण बाटलो असलो म्हणून काय झाले मुले तर  धर्मात आहेत. आता ती आपल्या पायावर उभी आहेत आपल्याला  आता मुलांसाठी नाही आपल्या सहचारणी आपल्या बायकोसाठी जगायचे आहे कारण आपल्याशिवाय ती अजिबात जगणार नाही
क्रमश .........................
        
 

No comments:

Post a Comment