महादेव देवळाच्या पायऱ्या चढून देवळात प्रवेश करतो सर्वात प्रथम तो दामोदर पंतांच्या पायाला हात लावून पाया पडतो. दामोदर पंत त्याला मधेच थांबवण्याचा एक असफल प्रयत्न करतात.
" महादेव किती वेळा तुला सांगितले आहे माझ्या पाया पडायच्या अगोदर देवाच्या पाया पडत जा म्हणून." दामोदरपंत.
" बाबा माता पित्याचे जागा देवाच्या जागी असते मग तुमच्या पाया पडलो काय आणि देवाच्या पाया पडलो काय शेवटी एकच नाही." महादेव देवळातील गणपतीच्या पाया पडत म्हणतो.
" तुझ्यापुढे शब्दात जिंकणे मला शक्य नाही." दामोदरपंत त्याला आपल्या छातीशी कवटाळत म्हणतात.
" बाबा शेवटी माझे गुरु तुम्हीच आहात, आणि गुरु असा एक डाव आपल्या शिष्याला शिकवत नाही जो ब्रम्हास्त्र असतो. " महादेव.
" खरे आहे पण आज तू माझा गुरु निघालास धोंड्याच्या मुलीला असा कोणता पाला खायला दिलास ज्यामुळे ती मोठ्या विष बाधेबासून वाचली. तू माझापण गुरु निघालास."
" बाबा मला सांगा एखादी विषारी वस्तू आपल्या पोटात गेल्यावर जर ती वेळेत बाहेर आली तर माणूस वाचू शकतो नाही. एकदा मी एका माकडाला पहिले तो कित्तेक वेळा अस्वस्त होऊन इकडे तिकडे उड्या मारत होता मग तो दोन झाडे सोडून एका झाडावर गेला त्या झाडाचा पाला खाल्ला मग काही वेळाने चक्क त्याने उलटी केली . आणि लगेच स्वस्थ झाला . मला लगेच समजले त्याने अशी काही वस्तू खाल्ली होती जी त्याला पचवणे अवघड झाली होती म्हणून ती वस्तू पोटातून उलटी मार्फत काढून टाकण्यासाठी त्याने तो पाला खाल्ला. आणि तोच पाला मी मंगलाला खायला दिला.बाबा तुम्हीच तर मला शिकवले आहे ना माणसापेक्षा जनावरांना झाड-पाल्याची माहिती जास्त असते. त्यांचे व्यवस्तीत निरीक्षण केल्याने आपल्याला खूप सारे औषधी सापडू शकते. " महादेव.
" महादेवा एवढ्या कमी वयात तुला किती समज आहे रे."
" बाबा माझ्याकडून एक चूक झाली आहे." महादेव.
" चूक आणि तुझ्याकडून झाली असेल, मला नाही वाटत." दामोदर पंत.
" पण माझ्याकडून ती झाली आहे बाबा, मी न विचारता तुमच्या बटव्यातील २० होण् घेतले."
" अरे ते पैसे वाण्याला द्यायचे होते. नाहीतर तो जिन्नस नाही देणार यापुढे."दामोदरपंत.
" माफ करा बाबा, पण मी ते पैसे लवकरच तुम्हाला परत करेन."
" मला सांग एवढ्या पैश्याची गरज तुला कशाला पडली?" दामोदर पंत.
" तो डोंगरावरचा आदिवशी पाडा आहे ना तिथल्या एका आदिवाश्याच्या मुलीच्या लग्नाला पैसे कमी पडत होते म्हणून त्याला मदत करण्यासाठी काढले."महादेव.
" बर केलास पोरा आपल्या पेक्षा त्या गरिबाला त्याची गरज होती. आणि पैसा काय आज ना उद्या आपण कामावूच" असे म्हणून दामोदर पंत देवापुढे असणारा प्रसाद महादेवला द्यायला उचलतात.......
" महादेव तू माझ्या बटव्यातील पैसे कधी काढलेस?" दामोदरपंत.
" अ..न ....परवा ....रानात वनौषधी आणायला गेलो त्या दिवशी."महादेव अडखळत बोलतो.
" पोरा देवाच्या दरबारात तरी खोटे बोलू नकोस मला सांग अम्बजीने ते पैसे काय केले." दामोदरपंत
" नाही बाबा ते पैसे अम्बजीने नाही मी काढले तुम्हाला............." महादेव.
" महादेव तू मला म्हणालास ना तुम्ही माझे गुरु आहात आणि गुरु असा एक डाव असतो जो आपल्या शिष्याला कधी शिकवत नाही. आणि मी हि तो डाव तुला नाही शिकवला आहे. कोणता डाव माहित आहे .......खोटे बोलण्याचा डाव जो मी तुला कधीच शिकवला नाही. आणि त्यामुळेच तू व्यवस्तीत खोटे बोलू शकत नाहीस . मला माहित आहे ते पैसे तू नाही माझ्या बटव्यातून काढलेस अम्बजीने काढले आहेत आणि मला हे हि माहित आहे त्याने त्या पैश्याचे काय केले. " दामोदरपंत.
" पण तुम्हाला कसे समजले ते पैसे मी नाही अम्बजीने घेतले." महादेव आश्यार्याने विचारतो.
" कारण ते पैसे मी माझ्या बटव्यात परवा नाही काल ठेवले होते. आणि काल तर तू पूर्ण दिवस आदिवशी पाड्यात होतास. राहिली गोष्ट मला न विचारात पैसे घेण्याची असे तू कधीच करणार नाहीस माझ्या परवानगीशिवाय . मला तुझ्यावर पूर्ण भरवसा आहे. पण तू अम्बजीला पाठीशी घालून त्याला मदत नाही करत आहेस चुकून वाईट दिशेला जाण्यास मदत करत आहेस. अंबाजी पेक्षा पैसे नक्कीच मोठे नाहीत पण त्याने कोणत्या कारणासाठी वापरले हे पाहणे जरुरी आहे. मला तुझ्याकडून खरे ऐकायचे आहे कृपया माझा विश्वासघात करू नकोस." दामोदरपंत त्याचे दोन्ही खांद्यावर हात ठेवत बोलतात. न राहून महादेव अम्बजीने पैसे कोणत्या कारणासाठी वापरले हे सांगून टाकतो.

No comments:
Post a Comment