रात्री जेवणाची वेळ असते. आनंदीबाई केळीच्या पानावर सर्वाना जेवण वाढतात. महादेव आणि अंबाजी माज घरात बसलेले असतात. आनंदीबाई जेवायला हाक मारतात. दोघे हाथ धुवून जेवायला बसतात. एवढ्यात बाहेरून दामोदरपंत येतात. अम्बजीला जेवताना पाहून ते खवळतात.
" याला जेवायला कोणी वाढला?" दामोदरपंत अम्बजीकडे बोट दाखवत विचारतात. अंबाजी समजून चुकतो आता आपल्याला जेवण तर मिळणार नाही पण पोटभर मार नक्की मिळणार आहे तो दोन मोठ मोठे घास मारतो ते पाहून दामोदरपंत पुढे होतात. त्याच्या पुढ्यातील जेवणाचे पान काढून घेतात आणि बाहेर असलेल्या कुत्र्याला टाकतात.
" अहो काय करता आहात त्याने काय केले आहे?" आनंदीबाई गोंधळून विचारतात .
" तोंड दाखवायला जागा ठेवली नाही आहे त्याने. चोरी केली आहे माझ्या बटव्यातील २० होण् काढले आहेत त्याने." दामोदरपंत.
" ते पैसे मी नववारी घेण्यासाठी काढले होते. मला विचारायचे." आनंदीबाई अम्बजीला वाचवण्याच्या प्रयत्नात बोलतात.
" आज तुमचे पुत्र प्रेम खुपच ओतू जात आहे. खोटे बोलण्याची काही हद्द असते.खरे काय आहे हे मला समजले आहे या नालायाकाने फक्त पैसेच नाही चोरले आहेत तर त्या पैश्याचा जुगार हि खेळला आहे हा आणि आज जर तुम्ही त्याला पाठीशी घातलेत तर पुढे पाछतावण्याची वेळ येईल आपल्यावर " दामोदर पंत.
" काय जुगार........" आनंदीबाई
" हो नालायक जुगार खेळला त्या पैश्याचा "दामोदरपंत.
" अरे देवा......." आनंदीबाई.
" आता याला उद्या दुपारचे जेवणही देवू नका नाहीतर माझ्याशी गाठ आहे ."
अंबाजी तेथून लगेच बाहेर पडतो कारण जेवण तर गेले आता मार हि पडतील हे त्याला चांगले माहित असते महादेव नि बाबांना सांगितले त्या महादेवाला मी कधीच माफ करायचे नाही हा विचार पक्का करतो. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याचा सूड घ्यायचा हे तो पक्के मनाशी ठरवतो.आज घरात जायचे नाही कारण आज जर आपण घरी गेलो तर आपली काही धडगत नाही म्हणून तो पाटलाच्या गोठ्यात झोपतो.
सकाळ होते पाटलाचा गडी म्हादू गोठा झाडायला येतो गोठ्यात तो अम्बजीला झोपलेला पाहून त्याला आश्चर्य होतो.
" अम्बजीपंत आज गोठ्यात सत्यनारायण सांगता व्हय वाटते." अम्बजीला हलवून उठवतो.
" काल माझ्या बाबांनी माझा सत्यनारायण केला. म्हणून इथे झोपायला लागले. " डोळे चोळत अंबाजी म्हादू ला सांगतो.
"आता काय केलेत नवीन भानगड?" म्हादू.
" काही नाही रे थोडे पैसे घेतले म्हणून रात्री जेवण नाही दिले." अंबाजी म्हादू ला सांगतो आणि तेवढ्यात महादेव पाटलांच्या वाड्यात येतो त्याला पाहून अंबाजी निघून जाऊ लागतो
" अंब्या कुठे निघालास?" महादेव.
" तुला काय करायचे आहे आणि तू कोण मला विचारणारा ?" अंबाजी
"तुझा मोठा भाऊ ठावूक नाही आहे होय तुला " महादेव
" मला कोणी मोठा भाऊ नाही आहे. "
" असे तू म्हटलेस तरी मी मानणार आहे का? " महादेव.
" काम काय आहे ते सांग आणि निग इथून " अंबाजी रागाने म्हणतो.
" आईने तुला शोधून आणायला सांगितली आहे आणि बाबा दूरच्या गावात उपचारासाठी गेले आहेत ते उद्याच येतील चल रात्री जेवलास नाही आहेस " महादेव त्याचा हात पकडतो अंबाजी त्याचा हात झटकून टाकतो
"बाबांना मी पैसे चोरले असे का सांगितलेस?" अंबाजी
" कारण बाबांनी मला शप्पथ घातली होती.म्हणून सांगावेच लागले. " महादेव
" आणि मी घातलेली शपथ , तिचे काहीच नाही ?" अंबाजी.
" बाबांची शपथ मी नाही मोडू शकलो " महादेव.
" मी उपाशी राहिलो रात्रभर त्याचा काय ?" अंबाजी
" आईने साजूक तुपातील मऊ भात केला आहे ठीक आहे तू नसशील येत तर मी जातो. " महादेव असे म्हणून चालू लागतो.
" ये थांब , सारा मऊ भात एकटा खायचा विचार आहे वाटते तुझा. " असे म्हणून अंबाजी त्याच्यासोबत चालू लागतो.
हळू हळू दिवस निघून जातात अंबाजी १५ वर्षाचा तर महादेव २० वर्षाचा होतो. दोघांच्या लग्नाची वेळ जवळ येते दामोदर पंताना जानकीने दिलेल्या पत्राची आठवण होते. लग्ना अगोदर ते पत्र महादेवला द्यायचे असते. खूप वेळा त्या पत्रात काय लिहिले आहे याची उसुक्ता त्यांना असते खूप वेळा ते वाचण्याचा मोह हि त्यांना होतो पण त्यांना ते पत्र वाचण्याची हिम्मत होत नाही. एकदा संध्याकाळी बाहेर नारळाच्या कात्यापासून सुंभ वळणाऱ्या महादेव ला आवाज देवून माजघरात बोलावतात.
" मला बोलावलेत बाबा ." महादेव.
" हो"
" काही महात्व्हाचे काम होते का ?" महादेव
" हो महात्व्हाचेच काम होते. तुझे लग्नाचे वय निघून जात आहे मला ते तू १२ वर्ष्याचा असतानाच करायला हवे होते पण एका कोड्यामुळे लांबवले ते लाम्बवालेच " दामोदरपंत
" कसला कोडा ?"
तुझ्या आईने तुझ्यासाठी एक पत्र लिहून ठेवले आहे. ते तू वयात आल्यावर तुझ्या लग्नाच्या आधी तुझ्या हाती द्यावे असे सांगितले होते." दामोदरपंत आपल्या बटव्यातील एक गुंडाळलेले पत्र काढून त्याला देतात.
क्रमश.................

This comment has been removed by the author.
ReplyDelete