संध्याकाळी महादेव घरी परततो. आणलेली औषधी देवापुढे ठेवतो. आनंदीबाई चहा देतात.
" महादेव यांनी तुला देवळात बोलावली आहे." संतीबाई रिकामा चहाचा कप परत घेत म्हणतात.
" ठीक आहे आई मग मी निघतो त्या निम्मित्ताने सांज आरतीही मिळेल." महादेव असे म्हणून देवळांकडे चालू लागतो. रस्त्यात त्याला अंबाजी भेटतो.
" काय रे अंब्या कुठे निघाला आहेस धावत धावत?" महादेव.
" दादा मला थोडे पैसे पाहिजे होते."
" कशाला? " महादेव.
" तू देणार आहेस कि नाही ते सांग."
" तुला किती आणि कशाला पैसे हवे आहेत ते सांग तरच मी देईन" महादेव.
" सांगतो पण मला वचन दे तू बाबांना सांगणार नाहीस "
" अंब्या आता तू काय नवीन भानगड केली आहेस."
" दादा पहिले तू वचन दे."
" ठीक आहे नाही सांगणार आता सांग." महादेव.
" मला २० होण् हवे आहेत."
" एवढे पैसे ? एवडे पैसे माझ्याकडे नाही आहेत आणि एवढे पैसे तुला कशाला हवे आहेत. "महादेव.
" दादा मी जुगारात हरलो. " अंबाजी खाली मान घालून म्हणाला.
" तू जुगार खेळलास? "
" त्याचे काय आहे बाजूच्या गावात जत्रा भरणार आहे उद्या म्हणून मी बाबांच्या बटव्यातील २० होण् काढले मला वाटले हे पैसे जुगारात लावून दुप्पट करेन आणि मग ते पैसे बाबांच्या किशात ठेवून वरच्या पैश्यात जत्रा फिरीन." अंबाजी .
" तू बाबांच्या किशातील पैसे चोरलेस, आणि तुला काय वाटले जुगारात तू जिंकशील ?" महादेव रागाने म्हणाला
" या अगोदर हि मी एकदा असे केले होते त्यावेळी जिंकलो होतो." अंबाजी.
" जुगारात प्रत्तेक वेळी नाही जिकू शकत कारण ते पैसे कोणाच्यातरी कास्थाचे असतात. त्या माणसाची हाय असते." महादेव.
" दादा काहीतरी कर नाहीतर आज बाबा माझी पाठ सोलून काढतील मला वाचव दादा परत मी असे नाही करणार." अंबाजी विनवणी करू लागला.
" अरे पण मी काय करू शकतो माझ्याकडे फक्त ५ होण् आहेत बाकीचे होण् कुठून आणू?" महादेव.
" तुझ्याकडे तेवढे पैसे नसतील तर माझ्याकडे २ उपाय आहेत." अंबाजी.
" मग ते उपाय तूच का नाही करू शकत ?" महादेव.
" कारण ते उपाय फक्त तूच करू शकतोस ." अंबाजी.
" ठीक आहे सांग लवकर नाहीतर माझी सांज आरती चुकेल मला माहित आहे तुझ्या डोक्यात घानेरडेच उपाय असणार." महादेव.
" पहिला उपाय ...........तुझ्याकडचे ५ होण् आपण परत जुगारात लावू या कदाचित आपल्या नशिबात जीत असेल." अंबाजी.
" अंब्या तुझे डोके ठिकाणावर आहे कारे मी माझे पैसे जुगारात लावेन हे तू म्हणूच कसे शकतोस?" महादेव रागाने त्याच्यावर ओरडतो.
" मग दुसरा उपाय तो तुझ्या सिद्धांतात बसतो. ........" अंबाजी.
" आता सांगतोस कि जावू मी."
" तू बाबांना सांग ना मला काही काम पडले म्हणून तुम्ही नव्हतात तेव्हा त्यातले २० होण् मी घेतले एका गरजू गरीब माणसाला मदत करायला . ते तुला काही नाही बोलणार आणि तुझे ५ होण् हि वाचतील " अंबाजी.
" अंब्या तुला काय वाटते असे मी करेन.?" महादेव.
" वाटते नाही मला खात्री आहे तू माझ्यासाठी देव आहेस आणि आज तुझा हा भक्त तुला पाण्यात ठेवत आहे मग तू तुझ्या भक्ताची नक्की मदत करणार?" अंबाजी.
" मला तू पाण्यात ठेवली आहेस ?" महादेव.
" हो बघ ना तू एका पाण्याने साचलेल्या डबक्यात उभा आहेस." अंबाजी त्याला खाली बोट दाखवत सांगतो. महादेव खाली पाहतो तर खरेच त्याच्या पायाखाली एक पाण्याने भरलेले छोटेशे डबके असते. तो थोडा बाजूला होतो.
" दादा करशील ना रे माझी मदत?" अंबाजी केविलवाणा होऊन बोलतो आणि महादेवालाही त्याला नाही म्हणवत नाही.
" ठीक आहे पण तू मला वचन दिले आहेस परत तू जुगार खेळणार नाहीस." महादेव.
" तुझी शपथ , नाही खेळणार "
" आता माझी शपथ घेवून मला मारणार आहेस का जा घरी आई चहासाठी तुझी वाट पाहते आहे ? " असे म्हणून महादेव मंदिराची वाट धरतो. थोड्या वेळातच तो मंदिरात पोचतो. मंदिरात सांज आरती नुकतीच संपलेली असते.सारे गावकरी देवळातील गणपतीचे दर्शन घेवून निघून जात असतात.
क्रमश ...........................
पान नं ५

No comments:
Post a Comment