Tuesday, 15 May 2012

पान नंबर १७ वरून पुढे ......................................

" थांब महादेव, तरीही तू या घरात परत यायचे नाहीस !" दामोदरपंत त्याला थांबवत म्हणतात.
"म्हणजे अजूनही तुमचा माझ्यावरचा राग गेला नाही आहे ना?" महादेव.
" नाही पोरा, माझ्या काही अपेक्षा आहेत तुझ्याकडून आपल्या गणपतीच्या मंदिराच्या पुजेची सारी सूत्रे आता तुला सांभाळायची आहेत आणि तू जर परत या घरात आलास तर तुही बाटगा आहेस असे सारे गाववाले म्हणतील आणि तुला देवळात पूजा करून दिली जाणार नाही या दामोदर पंताने सांभाळलेला वारसा तुला पुढे न्यायाचा आहे." दामोदरपंत आपल्या डोळ्यातील पाणी पुसत बोलतात.
" बाबा तुम्हाला विसरणे अशक्य आहे तुम्हाला विसरणे म्हणजे विठ्ठलाच्या भक्तांच्या मन मानी साठी विठ्ठलाला विसरणे आणि हे कसे शक्य आहे?" महादेव
" पण हि या विठ्ठलाची इच्छा आहे असे समज"दामोदरपंत.
महादेव काही न बोलता निघून जातो. बाहेर जाताना त्याच्या मनात विचार येतो लहानपणी आपले वडील कसे होते ते आपण पहिले नाही आपली आई आपल्याला इथे सोडून निघून गेली. पण आईचे छत्र हरवले असे कधी वाटले नाही. पण आज खरोखर आई वडील हरवल्यासारखे वाटू लागले. इकडे गावात हळू हळू लोक परत येवू लागली. कोणाची जनावरे दावणीला बांधलेल्या अवस्थेतच कापली होती त्यांची सडून दुर्गंधी येत होती. गावात दर 10 पावलांवर  माणसांचा किवा जनावरांचे मृत शरीरे पाहायला मिळत होती. महादेव रस्त्याने घराकडे चालू लागतो. अचानक त्याला काही लोक नदीच्या पलीकडे जाण्यासाठी जमा झालेले आढळतात. एकाला  ते कुठे चालले आहेत हे समजण्यासाठी त्यातल्या एकाला हाक मारतो.
" काय रे यशवंत कुठे चाललात ?" महादेव
" काय सांगू नशिबाचे भोग पारवा बातावाबातावी झाली मी आणि माझी साव्भाग्यावती  तावडीत सापडली. मला बतावली आणि तिला ओढून नेली त्या राक्षसांनी.
आज बापान घर बाहेर काढली. म्हणे तू इथ राहिलास तर आम्हालाही गावातील लोक बाटगे म्हणतील . आज समाजाला टिपू सुलतानांनी नदी पलीकडे रहायची आणि खायची व्यवस्था केली आहे म्हणून चाललो आहे " यशवंत बोलत असताच त्याच्या डोळ्यातील आसवे टपकन खाली पडली.
क्रमश..........................

Sunday, 22 April 2012

पान नंबर १५ वरून पुढे ................

"पण महादेव असा काही करेल यावर माझा अजिबात विस्वास बसत नाही ." आनंदीबाई.
" या हाताने अग्नी द्यायचे  सोडून मुठ माती देवून आलो आहे आनंदीबाई, आणि याला फक्त आणि फक्त जबाबदार महादेव आहे." दामोदरपंत हताश होऊन खाटेवर बसतात आनंदीबाई त्यांचे सात्वन करू लागतात इतक्यात दारावर टक- टक होते. आनंदीबाई डोळ्यातील अश्रू पुसून कोण आहे म्हणून विचारतात
" आई मी महादेव दरवाजा खोल आई "
आनंदीबाई दरवाजा खोलायला निघतात इतक्यात दामोदरपंत त्यांना थांबवतात.
"आता कशाला आला आहे अजून काय शिल्लक राहिले आहे का?" दामोदरपंत.
" बाबा ,अगोदर दरवाजा उघडा मी सांगतो सगळे." महादेव बाहेरून विनवू लागतो.
" तू काय सांगणार आहेस हे मला पक्के ठावूक आहे आता तू इथे आम्हाला आमच्या हालावर ठेवून निघून गेलास तर खूप उपकार होतील." दामोदरपंत
" अहो पण तो काय म्हणतो आहे ते एकून तर घेवू या " आनंदीबाई विनवणी करतात.
" आम्हाला नदीवर खूप ऐकवला आता तुम्हाला ऐकायची इच्छा असेल तर जरूर ऐका."
" बाबा, कृपा करून दरवाजा उघडा मला तुमच्याशी बोलायचे आहे." महादेव विनंती करू लागतो.
" अहो उघडा  ना कदाचित त्याला महात्व्हाचे बोलायचे असेल."आनंदीबाई .
" उघडा दरवाजा पण शेवटचा या पुढे त्याला या हाराचे दरवाजा बंद असेल ." दामोदरपंत परवानगी तर देतात पण दरवाजाकडे पाठ फिरवतात आनंदी बाई दरवाजा उघडतात महादेव केळीच्या पानात जेवणाची झाकलेली दोन ताटे घेवून आत येतो. ताटे khali कोपर्यात ठेवून पाठमोऱ्या दामोदार्पन्तांचे आणि आनंदी बाईंचे पाया पडतो.

" बाबा , मला माहित आहे आज तुम्ही माझ्यावर रागावला असाल आणि आज झालेल्या प्रकाराबद्दल तुम्ही मला कधीच माफ करणार नाही. पण प्रत्तेक आरोपीला आपली बाजू मांडण्याचा दरबारात अधिकार असतो मीही माझी बाजू मांडतो कदाचित तुम्ही मला माफ करालाही. काल  झालेला प्रकार मला समाजाला तसा मी लगेचच परत निघालो रस्त्यात आपल्या घराची परस्थिती समजली मला माहित होते काळाच्या दिवशी तुम्ही दोघांनी काही खाल्ले नसेल म्हणून पहिला शेतावरच्या घरात जाऊन मऊ भात बनवला पण इतक्यात लोक नदीच्या दिशेने धाव पळ करत असल्याचे समजले रस्त्यातून जाणाऱ्या मोरोपंतांची भेट घडली त्यांनी सांगितले तुम्ही म्हणे नदीवर अधर्म करायला जात आहात तुम्हाला रोखण्यासाठी ते भट वाडीतील काही ब्राम्हणांना घेवून तुम्हाला दगडाने मारण्यासाठी जात आहे असे सांगितले जर मी तुम्हला रोखले नसते तर सार्या ब्राम्हणांनी तुम्हाला दगडाने ठेचून मारले आसते आणि हे drushya मी कसे पाहू शकलो असतो बाबा ? वाहिनी तर या जगातून निघून गेली होती पण तुम्ही मला हवे होतात लहानपणी सक्ख्या बापाला गमावली होती आता परत त्याचे दुक्ख नाही आहे पण ज्याने पाळले पोसले ज्याची जागा माझ्या ह्रिदयात देवाची आहे त्याचे मृत्यू हे डोळे कसे काय पाहू शकतात बाबा ?"

"मी तुम्हाला म्हटले होते ना आपला महादेव असे करूच शकत नाही " आनंदीबाई महादेवच्या तोंडावर हात फिरवत म्हणतात.

" निघतो बाबा संध्याकाळी परत येईन सोबत जेवण घेवून आलो आहे कृपया जेवून घ्यावे आणि परस्थितीला तिच्या हालावर सोडा कारण प्रत्येक दुख नंतर सुख ह येतातच म्हणून माणसाने सुखाची अपेक्षा न करता दुक्खाचा सामना करावा असे तुम्हीच मला सांगितले होते ना?" असे म्हणून महादेव जाऊ लागतो
क्रमश .......................................

Thursday, 5 April 2012

पान नं १४ वरून पुढे ..................

             सकाळी दामोदर पंत उठतात अचानक आपले  कोपर्यात ठेवलेली काठी उचलून बाहेर जाऊ लागतात आनंदी बाई ते पाहतात आनंदी बाईना माहित असते कि कुठे लांबचा प्रवासासाठी दामोदरपंत चालले आहेत नाहीतर ते कधी काठी वापरत नाहीत. अंगणात पायरीच्या खाली ठेवलेले कोल्हापुरी चप्पल पायात सरकवतात एवढ्यात आनंदी बाई त्यांना थांबवतात.
        " कुठे चाललात ? "
        " सून बाईंच्या गावी जावून येतो पाहतो पोर व्यवस्थित घरी पोचली कि नाही. " दामोदरपंत असे म्हणून निघतात.
      " लवकर या मला एकटीला घर खायला उठेल नाहीतर." आनंदीबाई.
      " हो सून बीची खुशाली पाहून लगेचच घराचा रस्ता पकडेन कारण आता आपण धर्म भ्रष्ट  पाणीही मिळणार नाही त्या घरात ."दामोदरपंत असे म्हणतात आणि आनंदी बाईंच्या डोळ्यातील अश्रू टपकन गालावर ओघळतात.
     " अहो आता आपल्या काळजावर दगड ठेवायला लागणार आहे अजून खूप काही सहन करायचे डोळे पुसा आता "
               दामोदरपंत निघून जातात.  दुपार निघून जाते संध्याकाळचे वेध लागतात पण दामोदरपंत परत येत नाहीत. आता मात्र आनंदी बाई चा धीर सुटू लागतो आत्ता पर्यंत तर दामोदरपंत परत यायला हवे होते  आनंदी बाई घरातून अंगणाकडे फेर्या मारून दामोदार्पन्तांची वाट पाहू लागतात अचानक दामोदरपंत येतात त्यांना पाहून आनंदी बाईंचे जीव भांड्यात पडतो.
      " भेटली सून बाई ?  कशी आहे व्यवस्थित घरी पोचली आहे ना ?" आनंदी बाई दोन वेळा विचारतात पण दामोदर पंतांच्या तोंडातून कोणतेच वाक्य निघत नाही ते सरळ अंगणात चप्पल काढून घरात प्रवेश करतात अंगातील सदरा काढून खुंटीवर टांगतात. सुम्भाने विणलेल्या बादाल्यावर बसतात आनंदीबाई स्वयंपाक घरात जाऊन पाणी घेवून येतात पाण्याने भरलेला गाडगा दामोदरपंतांच्या हातात देवून परत विचारतात
     " सुनबाई मिळाली का ?" पाण्याचा एक घोट घेत ते तांब्या जमिनीवर ठेवतात.
     "हा प्रश्न तुम्ही नाही विचारलात तर बरे होईल आणि ऐकायचे असेल तर काळजावर दगड ठेवा मग सांगतो. दामोदरपंत
   " माझे मन मी कधीच मारले आहे आता फक्त त्या जागी दगड भरला आहे ज्याच्यावर कसलाच परिणाम होणार नाही काय घडले ते व्यवस्तीत सांगा.
   " हो मिळाली , पण तिच्या माहेरी नव्हे कृष्णेच्या काठावर निर्वस्त्र  पडली होती ज्या वयात मुलांचे संसार पाहायचे होते त्या वयात नको ते पाहायला लागले." दामोदरपंत .
     " काय झाले ते व्यवस्तीत सांगाल का ?" आनंदीबाई.
     " सकाळी मी सून बाईंच्या गावी निघालो पण वाटले असे पारवसे सोयार्यांकडे जाने योग्य नाही नदीवर आंघोळ करून जावे म्हणून नदीच्या मार्गाकडे वळलो नदीवर गेलो तर सगळीकडे मुर्दे पडले होते कोल्ही कुत्री  मेलेल्या माणसाचा मांस ओरबाडून खात होती. उबळ यावी असे दृश्य होते. नदीच्या काठी मुर्द्यांचा खच पडला होता. आपला शील भ्रष्ट होऊ नये म्हणून हजारो स्त्रियांनी नदीचे उदार जवळ केले होते. अचानक माझी नजर एका स्त्रीच्या मृत देहाकडे गेली अंगावर एकही वस्त्र नवते ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून आपली सुनबाई होती. माझ्या अंगावरचे उपरणे काढून मी ते तिच्या अंगावर घातले. आणि मृत देहाला अग्नी देण्यासाठी लाकडांचा बंदोबस्त करण्यासाठी गावात सदुकडे आलो मी लाकडे घेवून नदीवर अंतिम क्रियेची तयारी करताच होतो इतक्यात आपला त्याला विरोध करायला गावकर्यांना घेवून आपला महादेव आला."दामोदर पंत .
" आपला महादेव ....?"
" हो आपला महादेव . " दामोदरपंत .
"नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल आपला महादेव असे नाही करू शकत." आनंदी बाई.
" आनंदीबाई गैरसमज दुसर्यांनी सांगितल्यावर होतो आपल्या डोळ्यांनी पाहिलेली घटना आणि कानांनी ऐकलेल्या घटना खर्या असतात." दामोदरपंत
" मला नाही वाटत तो महादेव असेल तो माझा मुलगा नसला म्हणून काय झाले त्याला मी माझ्या पोटाच्या मुलाप्रमाणे वाढवले आहे.एक वेळ अम्बजीवर विश्वास नाही ठेवणार पण महादेव असे अरेल असे म्हणाल तर मला नाही पटत. " आनंदीबाई .
" तुम्हाला तुमच्या नवऱ्यावर विश्वास आहे ना?" दामोदरपंत.
क्रमश ...............................

Friday, 30 March 2012

पान नं १३ वरून पुढे...........................

              दामोदर पंत गावात येतात पण रोज गजबजलेले गाव आज सुनसान वाटत होते. जागो- जागी घरे जाळली गेली होती. गावात कुठे कुत्रेही दिसत नव्हते. दिसत होती फक्त प्रेते. माणसांची आणि जनावरांची पण कोणाही ओळखू येत नव्हते. कारण कुणाच्याही धडावर मस्तक शिल्लक नव्हते. असह्य माणसांचे शीर कापून ते नराधम कधीच निघून गेले होते. एका झोपडीतून दामोदर पंताना एका स्त्रीचे रडणे ऐकू येत होते. पण पुढे जाऊन तिची विचार पूस करायची हिम्मत होत नव्हती. दामोदरपंत तडक मंदिरात जातात मंदिर एकदम व्यवस्तीत आहे हे पाहून त्यांना थोडे बरे वाटते ते मंदिराच्या पायऱ्या चढणार इतक्यात त्यांना आपला धर्म भ्रष्ट झाले आहे त्यामुळे देव हि बाटेल हा विचार मनात येतो अगोदर आपण आपली शुद्धी करून घेवू मग मंदिरात जावू असे ठरवतात.दामोदर पंत आपल्या शेतावर असलेल्या महादेव च्या घराकडे निघतात त्यांना माहित असते महादेव आणि सुनबाई नाही आहेत पण घर व्यवस्तीत आहे ना ते पाहू या म्हणून तिकडे निघतात. महादेव चे  घर व्यवस्तीत आहे हे पाहून त्यांचा जीव भांड्यात पडतो.
           दामोदरपंत घराकडे परत फिरतात. गावातील साऱ्या लोकांचे संसार उद्वस्थ झाले होते. जे जंगलात पळाले ते वाचले पण सारे नशीबवान नव्हते अनेक हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले एवढे होऊनही थाबले नाही त्यांना पकडून बंदी बनवून टिपू च्या कुंटणखाण्यात बंदिस्त करण्यात आले यातून नाबालिक मुली सुद्धा सुटल्या नाहीत. गोठ्यात बांधलेली जनावावरांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. गावाचा तो नजरा पाहून दामोदर पंताना काय करावे तेच समाजात नव्हते. पण गावातील ती सारी परस्थिती त्यांनी घरी येवून आनंदी बाईना सांगितली. रात्री कोणीही जेवले नाही  रात्रभर आनंदीबाई गप्प बसल्या होत्या त्यांना महित होते जर आपण रडलो तर दामोदर पंतानाचा आत्मविश्वास डगमगेल रात्री त्यांचा डोळा कधी लागला ते त्यांनाच समजले नाही.
              दुसऱ्या दिवशी आपल्या गावावर आलेल्या संकटाची बातमी महादेव ला समजते तो तडक गावाकडे निघतो. आपल्या परिवाराला कोणतीही इजा होऊ नये म्हणून वाटेत येत असताना तो देवाकडे प्रार्थना करत असतो. वाटेत त्याला गावातला विठ्ठल भेटतो. घडलेली हकीगत सविस्तर सांगतो. दामोदरपंत आणि आनंदीबाई व्यवस्तीत आहेत हे ऐकून त्याला बरे वाटते पण त्यांचा धर्म भ्रष्ट झाला आहे हे ऐकून तो तिथेच मटकन खाली बसतो. थोड्या वेळाने तो परत गावाची वाट पकडतो.
क्रमश ...............

Tuesday, 20 March 2012

पान नं १२ वरून पुढे...........................

        " आज पासून तुम्ही मुसलमान झालात वैद्य मिया| " अब्दुल हसत म्हणतो.
        " गोमांस खाल्ले म्हणजे मुसलमान झालो असे कोणी सांगितले अब्दुल?" दामोदरपंत.
        " मुसलमान झाला नसाल पण लवकरच होणार आहात." अब्दुल.
        " कश्यावरून मी मुसलमान होईन? मी हिंदू आहे आणि हिंदूच राहीन."दामोदरपंत.
        " अहो वैद्यजी जरी असे तुम्ही मानता.  पण मला सांगा तुमचेच हिंदू बांधव परत तुम्हाला आपल्या धर्मात घेतील का. आता तुमचा धर्म संपला तुम्ही धर्म भ्रष्ट आहात...... धर्म भ्रष्ट! आणि धर्म भ्रष्टला हिंदू धर्माची दारे  बंद असतात हे तुम्हाला चांगलेच माहित आहे वैध मिया| " अब्दुल.
         " या गलत फैमित राहू नकोस अब्दुल तुला माहित नसेल शिवाजी महाराज्यानी नेताजी पालकरांना शुद्ध करून परत धर्मात घेतले होते." दामोदरपंत.
         " शिवाजी महाराज वा चांगला दाखला दिलात पण त्याच शिवाजी महाराज्याच्या राज्याभिषेकाला तुमच्याच ब्राम्हणांनी विरोध केला होता हे विसरलात वैद्यजी " अब्दुल हसत म्हणतो.
         " साऱ्या ब्राम्हणांनी नाही कर्मठ ब्राम्हणांनी अब्दुल !" दामोदरपंत.
         " मग आता पाहू चांगले ब्राह्मण तुम्हाला परत हिंदू धर्मात घेतात का ते "अब्दुल.
         " पहात रहा अब्दुल मी तुला परत हिंदू धर्मात जाऊन दाखवतोच." दामोदर पंत
         " असे करताना तुमचा मृत शरीर नदीच्या पत्रात मिळूदे नको म्हणजे झाले . आणि असे करण्यात तुम्ही यशस्वी झालात तर मी स्वत्त हिंदू धर्म स्वीकारेन." अब्दुल.
        "बाकी परिवार किधर है इसका" एक  सैनिक विचारतो.
        " अरे बात करते वक्त ये तो याद हि नाही राहा. सारा घर कि तलाशी लो| " अब्दुल हुकुम देतो बाकीचे शिपाई घर शोधू लागतात आतल्या खोलीत आनंदीबाई भेटतात दोन  सैनिक तिला पकडून माजघरात घेवून येतात. तिला पाहून दामोदरपंतांच्या कपाळाला आट्या पडतात ते मनातच म्हणतात संपले सारे आता. शिपाई तिलाही गोमांस भरवतात. थोडा वेळ शोधा शोध करून सारे नराधम निघून जातात. दामोदरपंत तिथेच कोपऱ्यात बसतात.
         " तुम्हाला मागच्या दाराने जायला सांगितले होते ना?" दामोदरपंत.
         " तुम्हाला अश्या अवस्थेत सोडून कशी जाऊ शकते?" आनंदीबाई .
        " चला , घर सफ करा गावात कोणालाही काही समजून देवू नका. काही झालेले नाही आहे. मी थोडे बाहेर पाहून येतो. गावात नक्की काय परस्थिती आहे ते पाहून येतो." दामोदर पंत असे म्हणून बाहेर पडतात. तोंडात गोमासाची तुरट चव अजूनही जात नसते. मनात आत्महत्येचा विचार येतो पण मुलांच्या विचाराने ते लांबवतात. आपण बाटलो असलो म्हणून काय झाले मुले तर  धर्मात आहेत. आता ती आपल्या पायावर उभी आहेत आपल्याला  आता मुलांसाठी नाही आपल्या सहचारणी आपल्या बायकोसाठी जगायचे आहे कारण आपल्याशिवाय ती अजिबात जगणार नाही
क्रमश .........................
        
 

Friday, 16 March 2012

पान नं ११ वरून पुढे...........................

                                                           आभाळ कोसळते.
          ( वाचकांना विनंती आहे कि या कादंबरीचा उद्देश कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा अजिबात उद्देश नाही हे परत सांगतो आहे त्या काळी कोणत्या परस्तीतीत ओढवली होती आणि आपल्या हिंदू लोकांनी कोणती चूक केली ज्याची फळे आज हि आपण भोगत आहोत हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे. अश्या चुका आपल्या हातून परत होऊ नयेत हाच या कादंबरीचा मुळ उद्देश आहे )
सकाळी सकाळी दामोदरपंत मंदिरातील गणपतीच्या पूजेसाठी तयारी करत असतात. अनुराधा सात महिन्याची गरोदर असते. तिला बाळंतपणाला तिचे आई वडील घेवून जातात. सोबत १-२ दिवस महादेव ने हि यावे असे तिच्या वडिलांना वाटत असते. ते त्याला आपले मनोगत सांगतात मग महादेव हि त्यांचे मन नाही मोडत. अंगणात लक्ष्मी सडा काढत असते अचानक ती समोर काहीतरी पाहते आणि धावत घराच्या आतमध्ये जाते दरवाज्याचे अडसर लावते आणि जोरात दामोदार्पन्ताना हाक मारते.  काय झाले हे पाहायला दामोदर पंत आणि आनंदीबाई माजघरात येतात.
      " काय झाले पोरी ?" दामोदरपंत.
      " बाबा, बाहेर सुलतानाचे शिपाई आलेत त्यांच्या हातात गाईचे कापलेले मुंडके आहे." लक्ष्मी घाबरून सांगते.
     " काय?" आनंदीबाई.
     " हो आई, आणि हातात तलवारी आहेत ते मला पाहून आपल्या घराकडे धावले. आई- बाबा काहीतरी अपशकून होणार आहे." लक्ष्मी.
     " आनंदी तुम्ही सुनबाई ला घेवून निघा मागच्या दरवाज्याने मी पाहतो." दामोदर.
     " अहो, तुम्हीही चला ना ." आनंदीबाई.
     " माझे ऐका सून बाईला घेवून निघा नाहीतर सुनबाई चे काही बरे वाईट झाले तर अम्बजीला काय जवाब देणार आहात " दामोदरपंत.
    " बाबा तुम्हीहि चला ना !" लक्ष्मी.
    " पोरी तुम्ही दोघी निघा. जर आपण तिघेही पळालो तर पकडले जाऊ तुम्ही पळा मी त्यांना इथे काही काळ थांबवून ठेवतो." दामोदरपंत तिला समजावतात.आणि दरवाज्यावर टक टक होते बहिरून आवाज येतो
     " हम सुलतान के शिपाई है दरवाजा खोलो नाही तो तोड देंगे , और अंदर किसीको जिंदा नाही छोडेंगे "
     " पळा लवकर मी तुमच्या दोघींच्या पाया पडतो." दामोदरपंत विनवणी करतात. आता यांना समजावून काही उपयोग नाही हे समजून आनंदीबाई लक्ष्मी ला घेवून मागच्या दाराने पळतात. येवढा वेळ कोणी दरवाजा खोलत नाही म्हणून बाहेर असणारे शिपाई कमकुवत दरवाजा एका फटक्यात तोडतात. बाहेरून २०-२५ सैनिक नंग्या तलवारी घेवून आत घुसतात. काही सैनिकांच्या हातात चामड्याच्या पिशव्या असतात एक -दोन सैनिकांकडे गाईची ताजी कापलेली मुंडकी असतात.
         आत येणारा त्यांचा म्होरक्या दामोदार्पन्ताना पाहून साऱ्यांना थांबवतो.
           " अरे ये तो वैद्यजी है ,"
          " काय झाले आणि तुम्ही लोक हे सारे .........." दामोदरपंत त्यांच्याकडे भेदरून विचारतात.
         " काही नाही वैद्याजी आज खूप आनंदाचा दिवस आहे काल आमचे युवराज टिपू गादिवर बसले आणि त्यांनी घोषणा केली कि सारे हैद्राबाद संस्थान को मुसलमान करेंगे. हमारे राज्य के हित के लिये आपको मुसलमान बनना पडेगा वैध्यजी" त्यांचा म्होरक्या सांगतो इतक्यात एक सानिक ओरडतो. " इसे मार डालो सर् कलम करो इसका ."
        " खामोश .अगर ये मुसलमान बनने के लिये राजी है तो हम छोड देंगे|" म्होरक्या ओरडतो.
        " पर ये बुढ्ढा हमारे किस काम का ये हमारे इस्लाम बढानेके कोई काम नाही आयेगा इसकी उमर हो चुकी है आप को मालूम है ना सुलतान ने हमे एक सर् कलम करनेके बदलेमे ५ रुपयेका इनाम राखा है|" दुसरा शिपाई म्हणतो.
       " ये हमारे काम आयेंगे, ये बहुत बडे वैद्य है , और अच्चे वैद्य कि इस्लाम को जरुरत है मिया " म्होरक्या म्हणतो.
       " पण मी मुसलमान नाही बनणार ." दामोदरपंत रागाने म्हणतात आणि साऱ्या सैनिकांमधून अल्ला हो अकबरच्या घोषणा दम-दुमतात सारे शिपाई मारायला धावतात पण म्होरक्या त्यांना थांबवतो.
       " हे पहा वैद्य जी एके काही वर्ष्यापुर्वी तुम्ही माझे जीव वाचवले होतेत त्यामुळे अजून पर्यंत मी थांबलो आहे. नाहीतर अजूनपर्यंत तुमचे मुंडके धडावेगळे केले असते. इस्लाम कहता है कोई अगर तुम्हारी जान बचाये तो एक बार उसको माफ करके उसकी जान बक्ष दो  इसलिये मै आपको मारना नाही चाहता|" म्होरक्या.
      " अब्दुल एक वेळ जेव्हा मी कुणावर उपचार करतो ते अजिबात विसरत नाही आणि कुणी उपकार केले तर तेही अजिबात विसरत नाही. पण तुला मी केलेले उपकार दिसले पण त्या मुक्या जनावरांनी केलेले उपकार नाही दिसले ज्या गाईंचे तुम्ही मुंडके छाटले आहे त्या गाईच्या कुलाने कधीतरी तुला दुध पाजले असेल त्या गाईच्या कुळातील गाईने पाडसाला जन्मह दिला असेल जे पाडस मोठे होवून नांगर ओढून तुला दोन वेळेचे जेवण देते त्या गाईचे उपकार विसरून तिची तुम्ही कत्तल करता इस्लाम च्या नावावर तुमच्या देवा विषयी मला जास्त माहिती नाही पण  तो हि साक्षात खाली आला तरी तुमचे हे कृत्य पाहून लाजेने मान खाली घालेल." दामोदरपंत आपल्या डोळ्यातील आसू पुसत बोलतात.
      " और एक लब्ज बी जादा निकाला तो जबान काट के कुत्तेको खिला दुंगा|" अब्दुल रागाने बोलतो. साऱ्या घरात शांतता पसरते " देख क्या रहे हो इसको गो मांस खिला दो." अब्दुल हुकुम देतो.
      "या पेक्षा मला मारून टाका ." दामोदरपंतअसे म्हणतात पण त्या अगोदर २-३ सैनिक त्यांना पकडतात एक सैनिक कातडी पिसावितील गोमांस काढून दामोदर पंतांच्या तोंडात घालतो. उग्रस तुरट चव जिभेला लागते दामोदरपंत उलटी  करतात.
क्रमश...........................
       

Saturday, 10 March 2012

पान नं १० वरून पुढे...........................

          " आई आज याने माझ्या कानाखाली मारली. या अश्रीताची आता इथपर्यंत मजल गेली आहे."अंबाजी.
          " अंबाजी तोंड सांभाळून बोल." आनंदीबाई रागाने म्हणतात.
          " हो बरोबर आहे आता हा आश्रीत नाही आहे मी आश्रीत आहे या घरात. ठीक आहे आज संध्याकाळ पर्यंत हा राहील या घरात किवा मी जर तुला वाटत असेल मी या घरात राहावे तर आज संध्याकाल्पर्यात  हा या घरातून निघून गेला पाहिजे नाहीतर या घरात मी परत कधीच पाऊल ठेवणार नाही सांगून ठेवतो." असे म्हणून अंबाजी बाहेर निघून जातो.
          " काय करावे अश्या अवगुणी पोराचे तेच समजात नाही. " असे म्हणून आनंदीबाई सुद्धा आतमध्ये जातात.
          " चला अनुराधा बाई आपल्याला आता निघायची तयारी करायची आहे." महादेव.
          " कुठे?" अनुराधा आश्चर्याने विचारते.
          " या घरात आज आपला शेवटचा दिवस . माझ्यामुळे अम्बजीला वाटते कि त्याचे हक्क मला मिळतात आणि त्याचे वाईट व्यसनांकडे वळण्याचे कारणही तेच आहे. जर आपण इथे राहिलो तर तो अजून वाईट व्यसनांच्या आहारी जाईल . .... चला तयारी करा. " महादेव.
         " पण कुठे जायचे? " अनुराधा.
         " बाजूच्या गावात माझे घर आहे पडक्या अवस्थेत आज तेथे जावून साधी झोपडी बांधू आणि नंतर सावकाश पक्के घर बांधू ." महादेव.
               दुपारची वेळ असते दामोदरपंत देवळातून जेवायला घरी येतात. दुपारी सारे जेवायला बसतात. महादेव आपण घर सोडून जात आहोत याची त्यांना कल्पना देतो.
         " मला न विचारता निर्णय घेतलास पण माझ्या स्वप्नांचे काय?" दामोदरपंत जेवता जेवता विचारतात.
         " बाबा तुमचे कोणतेही स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी वाट्टेल त्या प्रकारची  किंमत द्यायला तयार  आहे "
         " माझ्याने आता मंदिरातल्या पूजेची धावपळ तसेच जंगलात जावून वन औषधी आणणे झेपत नाही ती कामे तू माझ्या मागे करावीस असे मला वाटते कारण अंबाजी कडून त्या गोष्टीची अपेक्षा मी करतच नाही." दामोदरपंत.
         " पण बाबा , मी घरातून जात आहे तुमच्यापासून नाही दूर जात आहे." महादेव
         " तू बाजूच्या गावात जाणार ४ मैलाच्या अंतरावर तेथून येणार कधी परत जाणार कधी ? त्यापेक्षा आपल्या शेतावरच्या घरात का नाही राहत?" दामोदरपंत.
महादेवाला हि त्यांचे विचार  पटतात  तो शेतावरच्या घरात राहायला राजी होतो. संध्याकाळी तो आणि अनुराधा शेतावरच्या घरात निघून जातात. बघता बघता वर्ष निघून जाते दामोदरपंत अम्बजीचे हि लग्न करून देतात. अंबाजी हि काही प्रमाणात सुधारतो. गावात कमवायची व्यवस्था नसल्याने तो पुण्याला निघून जातो. महादेव रोज सकाळी उठून गणपतीच्या मंदिरात पूजा करणे आणि पूजा आटोपली कि वन औषधी आणण्यासाठी जंगलात जात असे कोणत्या आदिवशी पाड्यावर जर त्याला मुक्काम करायचा असेल तर तो अनुराधाला अगोदरच सांगून ठेवत असे मग अनुराधा दामोदार्पन्तांकडे राहायला जात असे.
            जरी महादेव आणि अम्बजीचे जमत नसले तरी अंबाजीची बायको लक्ष्मी आणि अनुराधेच खूप चांगले जमत असेकधी कधी त्यांच्यामधले नाते पाहून आनंदीबाईना वाटत असे खरेच असे जर अंबाजी आणि महादेव राहिले असते तर किती बरे झाले असते. सारे काही सुरळीत चालले होते. पण हि वादळापूर्वीची शांतता होती यानंतर दामोदरपंतच्या कुटुंबात जे वादळ घोंघावणार होते त्याची कल्पना विधात्यानेही केली नसेल.
क्रमश ...............................