Thursday 23 February 2012

पान २ वरुण पुढे .......

लहानगा महादेव घरी आला. घरी येताच त्याने आपल्या हातातील दोन्ही पत्रे दामोदर पंतांकडे दिली. त्यातील एक पत्र दामोदर पंतांसाठी होते तर दुसऱ्या पत्रावर लिहिले होते पहिले पत्र वाचल्याशिवाय हे पत्र उघडू नये. दामोदर पंतानी पहिले पत्र उघडले.
 नमस्कार ,
मी जानकी माझी पूर्ण माहिती न समजून घेता आपण माझ्या मुलाला भिक्षुकी शिकवायचे कबुल केलेत माणूस इतका साधा आणि भोला असू शकतो याचा अनुभव मला पहिल्यांदा . आमच्या गावात तुमची कीर्ती मी ऐकून होते. तुम्हाला कोडे पडले असेल ना मी लिहू कशी शकते म्हणून? माझे  श्रीधरपंत यांचा संस्कृतवर चांगला प्रभाव होता त्यांना वाटे स्त्रियांनी हि शिकले पाहिजे. त्यांना जुन्या चाली रिती अजिबात मान्य नव्हत्या पण ते नास्तिक नव्हते. ते म्हणायचे जगात देव आहे कि नाही हे मी सांगू शकत नाही पण माणसाला जगायला संस्कार आवशक असतात आणि हे संस्कार तेव्हाच घडतात जेव्हा माणूस कुणा ना कुणाला तरी घाबरत असतो आणि जगात असा एकच नाव आहे ज्याला माणूस घाबरून संस्कारी बनतो आणि तो म्हणजे देव. माझ्या मुलाला मी भिक्षुकी शिकवेन कारण त्यामुळे त्याला समाजात इज्जत आणि देवाची भीती या दोन्ही गोष्ठी यामधून मिळतील.त्यांनी मला लिहायला शिकवले आणि म्हणाले जर आपल्याला मुलगी झाली कि तिलाही शिकवू पण देवाने त्यांना जास्त काल जगू दिले नाही. त्यांनी  मला लिहायला शिकवले याचा मला कधी फायदा झाला नाही पण आज त्या लेखणीचा शेवटचा प्रयोग करायचा मी ठरवले आहे. यापुढे मी महादेवला आणि तुम्हाला कधी भेटणार नाही. कारण मी आत्महत्या करायचे ठरवले आहे . तुम्हाला वाटत असेल मी कमजोर मनाची आहे पण तसे नाही आहे. जीवनात जगायला कष्ट पडतात म्हणून मी आत्महत्या नाही करत आहे त्याला मोठे कारण आहे जे मी जिवंत असताना नाही सांगू शकत  पण एका कोड्यात टाकून मेले तर कदाचित माझा आत्मा शांत होणार नाही
              माझे पती कोणत्या आजाराने मेले नाहीत तर गावातील सावकाराने त्यांना विषबाधा करून मारले. कारण त्या सावकाराचा माझ्या सौंदर्यावर डोळा होता. मी पती मेल्यानंतर केशवपन केले कदाचित त्यामुळे सावकाराच्या पाशातून मी सुटेन पण तरीही त्या नराधमाने मला सोडली नाही पती ज्या दिवशी निवर्तले त्याच रात्री सावकाराने माझ्यावर बलात्कार केला . मला गावात कुठेच काम मिळणार नाही याची दक्षता घेतली त्याला वाटले असे केल्यावर मी त्याच्या तुकड्यावर जगेन त्याची रखेल बनेन पण मी नाही ऐकले. कुणाशी वाच्यता केलीस तर तुझ्या नावार्याप्रमाणे तुझ्या मुलालाही मारेन अशी धमकी दिली. मी त्याचे अत्याचार आज पर्यंत सहन करत आले मी त्या सावकारापासून ३ महिन्याची गर्भवती आहे. यापुढे जिवंत राहिली तर जग माझ्यावर थुन्केल माझ्या मुलाची काळजी घ्या लाड करा असे नाही म्हणत आहे पण एक आश्रीत म्हणून भाकर जरूर दया मी तुमचे उपकार जन्म्हभर नाही विसरणार .
            दुसरे पत्र महादेव साठी आहे ते पत्र त्याला तो जाणता झाला कि दया माझी विनंती आहे ते पत्र फक्त महादेव साठीच आहे ते दुसऱ्या कुणाच्या हातात पडणार नाही हि माझी शेवटची इच्छा पूर्ण करा . तुमचे पांग मी या जन्म्हन नाही फेडू शकणार पण पुढच्या जन्मी मी देवाकडे तुमच्या घरी गाय बनवून फेडावे म्हणून विनंती करेन  बस पत्र पुरे करते
                                                                                                                                      जानकी
पत्र संपताच दामोदर पंत भानावर येतात. "महादेव तुझी आई कुठे आहे?"
               " मला इथेच बाहेर सोडून घरी जा म्हणून सांगून गेली " महादेव
               " अरे तुला सांगितले का कुठे जाते म्हणून ?"
               " नाही " महादेव
              "अहो लवकर माझी पगडी द्या खूप मोठा अनार्थ होणार आहे." दामोदर पंत आनंदि बाई ना ओरडत सांगतात.
              " काय झाले " आनंदी बाई पगडी घेवून येत विचारतात .
              " सांगायला वेळ नाही मी आल्यावर सांगतो " दामोदरपंत धावत धावत घराच्या बाहेर पडतात.
क्रमश ..............

No comments:

Post a Comment