Wednesday 22 February 2012

              दामोदरपंत महादेवला घेवून आपल्या घराकडे आले.
              " कोणचा हा मुलगा ?" आनंदीबाई
               " अहो  ते जोशी आहेत ना  त्यांच्या शेजाऱ्याचा आहे. याचे वडील नाही आहेत त्याच्या आईने भिक्षुकी शिकायला आपल्याकडे पाठवले आहे." दामोदरपंत
               " किती गोड आहे ना ! " आनंदीबाई.
               " लवकरच आपल्यालाही असेच गोड मुल होणार आहे." दामोदरपंत.
               " चला,  तुमचे आपले काहीतरीच." आनंदीबाई
               " अहो लाजता काय तयारी करा नव्या पाहुण्याच्या आगमनाची " दामोदरपंत.
दिवसामागून दिवस जावू लागले महादेव दामोदर पंतांच्या घरी मिळून मिसळून गेला. तीन महिने झाले अचानक सकाळी सकाळी जानकी महादेव ला भेटायला आली. दामोदर जानकीला पाहताच कडकडून बिलगला. जानकीच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या. दोघा आई मुलाचे प्रेम पाहून दामोदरपंत आणि आनंदी बाई स्थब्ध झाले. " मी याला थोडे बाहेर घेवून जाऊ " जानकी
                 " जानकीबाई मुलगा तुमचाच आहे त्यात परवानगी कसली मागता. " दामोदरपंत.
                 " पण आता तो तुमच्या पदरात टाकला आहे ना " जानकी
                 "मी चहा ठेवला आहे पहिला चहा प्या आणि नंतर जा." आनंदी बाई असे म्हणून आंत स्वयंपाक घरात गेल्या.
                 " जानकीबाई उदरनिर्वाहासाठी काही दुसरे काम मिळाले कि नाही ?" दामोदरपंत.
                  " हो , आता सारे प्रश्न सुटतील  काही दिवसाने." जानकी
                  " कोणते काम मिळाले आहे? " दामोदरपंत
                   " एका घरात भांडी घासायचे काम मिळाले आहे. " जानकी
                  " मी तुम्हाला मदत केली तर चालेल का ?" दामोदरपंत.
                  " नको, अगोदरच तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली मी दबली आहे अजून एक उपकार केलात तर कोठून फेडू मी तसेही मी माझ्या छोट्याश्या जीवनात खुश आहे." जानकी असे म्हणाली आणि आनंदी चहा घेवून आली. चहापान झाले. जानकी महादेव ला घेवून बाहेर गेली.
                  " आई आपण कुठे चाललो आहोत ?" महादेव
                  " तुझ्या आवडत्या ठिकाणी नदीवर. " जानकी
                  " नदीवर  वा , " दामोदर खुश झाला त्याला नदीवरच्या काठावर बसून नदीत दगड मारायला खूप आवडायचे आज हि तो मनोमाक्त नदीच्या पत्रात दगड मारणार होता.
                  " महादेव  आता यापुढे कधी माझी आठवण झाली तर नदीवर ये मी तुला नदीवरच भेटेन." जानकी चालत चालत म्हणाली.
                  " मग मी रोज येईन नदीवर बाबा मला घेवून येतील." महादेव .
                  " बाबा कोण बाबा ? " जानकी थांबत म्हणाली.
                  " तेच ज्यांच्याकडे तू मला राहायला पाठवली आहेस." महादेव
                  " तुला त्यांना बाबा म्हणायला कोणी सांगितले ?" जानकी
                  " त्यांनीच " महादेव
                  " आणि आनंदीबाईना काय हक मारतोस?" जानकी
                  " मोठी आई " महादेव.
जानकीच्या डोळ्यात दामोदर पंतांच्या कुटुंबाने दाखवलेल्या उदार्तेबद्दल अश्रू आले.
                  " महादेव त्या दोघांचे मन दुखावेल असे काही करू नकोस " जानकी म्हणाली.
              महादेवला ती काय म्हणते आहे हे त्याला समजले नाही तो आज नदीवर आई सोबत मानामोक्त खेळला साधारण दुपारच्या वेळेस ती  महादेवला सोडायला परत निघाली. पण घराच्या काही अंतरावर आल्यावर ती थांबली साडीच्या पदरात ठेवलेले दोन पत्र काढून तिने महादेव च्या हातात दिले.
                 " पोरा हे पत्र दामोदर पंताना दे " जानकी
                 " आई तू नाही येत  घरी ." महादेव
                 " नाही , तू जा आणि लक्षात ठेव यापुढे कधी भेटायचे झाले तर नदीवर ये " जानकीच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या. तिने त्याला कडकडून मिठी मारली.  दामोदर घराकडे निघून गेला पण यावेळी ती तो घराकडे पोहचेल याची वाट पहात नाही बसली ती तडक निघाली तिने मनाशी काही कठोर निर्णय घेतले होते त्याची लगेचच अंबलबजावणी करायची होती.

No comments:

Post a Comment